मुख्य मजकुरावर जा

circa 1406–1380 BC

Conquest of Canaan

Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.

658 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. यहोशुआ २४:२६सुमारे इ.स.पू. १४२७

    तेव्हा यहोशुआने या सर्व गोष्टींची नोंद परमेश्वराच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात केली. नंतर त्याने एक मोठी धोंड घेतली आणि याहवेहच्या पवित्रस्थानाजवळ एला वृक्षाखाली ठेवली.

  2. यहोशुआ २४:२७सुमारे इ.स.पू. १४२७

    नंतर यहोशुआ सर्व लोकांस म्हणाला, “पाहा, ही धोंड आपल्याविरुद्ध साक्ष असेल. याहवेह जे आपल्याशी बोलले तो प्रत्येक शब्द तिने ऐकला आहे. जर तुम्ही तुमच्या परमेश्वराबरोबर खरेपणाने राहिला नाहीत तर ती तुमच्याविरुद्ध साक्ष देईल.”

  3. यहोशुआ २४:२८सुमारे इ.स.पू. १४२७

    नंतर यहोशुआने त्या लोकांना आपआपल्या वतनास पाठवून दिले.

  4. यहोशुआ २४:२९सुमारे इ.स.पू. १४२७

    या गोष्टीनंतर, याहवेहचा सेवक नूनाचा पुत्र यहोशुआ वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला.

  5. यहोशुआ २४:३०सुमारे इ.स.पू. १४२७

    आणि त्यांनी त्याला गाश पर्वतांच्या उत्तरेला असलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह येथे त्याच्याच वतनभागात पुरले.

  6. यहोशुआ २४:३१सुमारे इ.स.पू. १४२७

    इस्राएली लोकांनी यहोशुआच्या सर्व आयुष्यात आणि त्याच्या मृत्यूनंतरही जे वडीलजन जिवंत राहिले आणि याहवेहने इस्राएलसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा ज्यांनी अनुभव घेतला, त्यांनी याहवेहची सेवा केली.

  7. यहोशुआ २४:३२सुमारे इ.स.पू. १४२७

    योसेफाच्या ज्या अस्थी इस्राएली लोकांनी इजिप्त येथून आणल्या होत्या, त्या शेखेम येथे जी जागा याकोबाने हमोराच्या पुत्रांकडून चांदीच्या शंभर नाण्यांस विकत घेतलेली होती तिथे पुरल्या. हे योसेफाच्या वंशजांचे वतन झाले.

  8. यहोशुआ २४:३३सुमारे इ.स.पू. १४२७

    अहरोनाचा पुत्र एलअज़ार मरण पावला आणि त्याला एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गिबियाह येथे पुरण्यात आले. जे त्याचा पुत्र फिनहासला वतन म्हणून देण्यात आले होते.