मुख्य मजकुरावर जा

circa 1406–1380 BC

Conquest of Canaan

Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.

658 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. यहोशुआ २२:१सुमारे इ.स.पू. १४४३

    नंतर यहोशुआने रऊबेन, गाद व मनश्शेहचे अर्धे गोत्र यांना बोलाविले

  2. यहोशुआ २२:२सुमारे इ.स.पू. १४४३

    आणि त्यांना म्हटले, “याहवेहचा सेवक मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही केले आहे आणि मी दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळली आहे.

  3. यहोशुआ २२:३सुमारे इ.स.पू. १४४३

    कारण पुष्कळ काळापासून—आजच्या दिवसापर्यंत—तुम्ही तुमच्या इस्राएली बांधवांना सोडले नाही, परंतु याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेले विशिष्ट कार्य तुम्ही पार पाडले आहे.

  4. यहोशुआ २२:४सुमारे इ.स.पू. १४४३

    आता याहवेह तुमच्या परमेश्वरांनी अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांना विसावा दिला आहे. तर आता यार्देनेच्या पलीकडे याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या प्रदेशातील तुमच्या घरी तुम्ही परत जा.

  5. यहोशुआ २२:५सुमारे इ.स.पू. १४४३

    परंतु याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या आज्ञा आणि नियमांचे काळजीपूर्वक पालन करा: याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागा आणि त्यांच्या नियमानुसार चला, याहवेहला धरून राहा व तुमच्या सर्व अंतःकरणाने आणि तुमच्या संपूर्ण जिवाने त्यांची सेवा करा.”

  6. यहोशुआ २२:६सुमारे इ.स.पू. १४४३

    तेव्हा यहोशुआने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांच्या घरी रवाना झाले.

  7. यहोशुआ २२:७सुमारे इ.स.पू. १४४३

    (मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला मोशेने बाशान प्रदेशात वतन दिले होते, तर यहोशुआने त्यांच्या दुसर्‍या अर्ध्या गोत्राला त्यांच्या सहइस्राएली लोकांबरोबर यार्देनेच्या पश्चिमेस वतन दिले होते.) जेव्हा यहोशुआने त्यांना घरी पाठवले, तेव्हा त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि तो म्हणाला,

  8. यहोशुआ २२:८सुमारे इ.स.पू. १४४३

    “तुमची मोठी संपत्ती घेऊन घरी जा—गुरांचा मोठा कळप, चांदी, सोने, कास्य आणि लोखंड आणि पुष्कळ वस्त्रे आणि तुमच्या शत्रूपासून मिळालेली लूट आपल्या इस्राएली बांधवांसह वाटून घ्या.”

  9. यहोशुआ २२:९सुमारे इ.स.पू. १४४३

    तेव्हा रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी गिलआद, जो प्रदेश त्यांना याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेकडून मिळाला होता, त्याकडे परत जाताना कनानातील शिलोह येथे इस्राएली लोकांचा निरोप घेतला.

  10. यहोशुआ २२:१०सुमारे इ.स.पू. १४४३

    जेव्हा ते कनान देशातील यार्देन जवळील गलीलोथ येथे आले तेव्हा रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी यार्देनजवळ एक खूप मोठी वेदी बांधली.

  11. यहोशुआ २२:११सुमारे इ.स.पू. १४४३

    आणि त्यांनी कनान देशाच्या सीमेवर यार्देन नदीजवळ जी इस्राएली लोकांची बाजू होती त्या गलीलोथ येथे रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी मोठी वेदी बांधली आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले,

  12. यहोशुआ २२:१२सुमारे इ.स.पू. १४४३

    तेव्हा सर्व इस्राएली मंडळी त्यांच्याशी युद्ध करावयाला शिलोह येथे एकत्र जमले.

  13. यहोशुआ २२:१३सुमारे इ.स.पू. १४४३

    म्हणून इस्राएली लोकांनी एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासला गिलआदाच्या प्रदेशाकडे रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे पाठविले.

  14. यहोशुआ २२:१४सुमारे इ.स.पू. १४४३

    त्याच्याबरोबर त्यांनी इस्राएलाच्या प्रत्येक गोत्रातून एक, जे इस्राएलच्या कुळांपैकी आपआपल्या पूर्वजांच्या दहा कुटुंबप्रमुख पुरुषांना पाठविले.

  15. यहोशुआ २२:१५सुमारे इ.स.पू. १४४३

    जेव्हा ते गिलआद येथे रऊबेन, गाद, आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे गेले; आणि त्यांना म्हणाले:

  16. यहोशुआ २२:१६सुमारे इ.स.पू. १४४३

    “याहवेहची सर्व मंडळी असे म्हणते: ‘इस्राएलच्या परमेश्वराचा विश्वासघात तुम्ही कसा करू शकता? याहवेहविरुद्ध बंड करून तुम्ही स्वतःच वेदी बांधून त्यांच्यापासून दूर कसे जाऊ शकता?

  17. यहोशुआ २२:१७सुमारे इ.स.पू. १४४३

    पेओराचे पाप आमच्यासाठी पुरेसे नव्हते काय? याहवेहच्या समाजावर मरी पडली त्या पातकापासून आजपर्यंत आम्ही शुद्ध झालेलो नाही.

  18. यहोशुआ २२:१८सुमारे इ.स.पू. १४४३

    आणि आता तुम्ही याहवेहपासून दूर जात आहात काय? “ ‘जर तुम्ही आज याहवेहविरुद्ध बंड केले तर उद्या संपूर्ण इस्राएली समाजाविरुद्ध याहवेहचा राग पेटेल.

  19. यहोशुआ २२:१९सुमारे इ.स.पू. १४४३

    जर तुमच्या मालकीची जमीन अशुद्ध असेल, तर याहवेहच्या भूमीकडे या, ज्या ठिकाणी याहवेहचा निवासमंडप उभा आहे आणि ती भूमी आमच्याबरोबर वाटून घ्या. परंतु याहवेह आपल्या परमेश्वराच्या वेदीखेरीज आपल्यासाठी वेदी बांधून याहवेहविरुद्ध किंवा आमच्याविरुद्ध बंड करू नका.

  20. यहोशुआ २२:२०सुमारे इ.स.पू. १४४३

    जेरहाचा पुत्र आखान समर्पित वस्तूसंबंधी अविश्वासू राहिला, तेव्हा संपूर्ण इस्राएली लोकांवर क्रोध आला नाही काय? त्याच्या पातकामुळे मरण पावणारा तो केवळ एकटाच नव्हता.’ ”

  21. यहोशुआ २२:२१सुमारे इ.स.पू. १४४३

    तेव्हा रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी इस्राएलच्या कुटुंबप्रमुखांना उत्तर दिले:

  22. यहोशुआ २२:२२सुमारे इ.स.पू. १४४३

    “याहवेह जे सामर्थ्यशाली परमेश्वर आहेत! याहवेह जे सामर्थ्यशाली परमेश्वर आहेत! त्यांना माहीत आहे! आणि हे सर्व इस्राएलच्या लोकांना माहीत व्हावे! जर हे, याहवेहविरुद्ध बंड करण्यासाठी किंवा आज्ञाभंग असे असेल तर आज आम्हाला जिवंत सोडू नका.

  23. यहोशुआ २२:२३सुमारे इ.स.पू. १४४३

    जर याहवेहपासून दूर जाण्यासाठी, आणि होमार्पण आणि अन्नार्पण किंवा शांत्यर्पण त्यावर करावे म्हणून आम्ही आमची स्वतःची वेदी बांधली असेल तर याहवेह स्वतः त्याचा हिशोब आमच्याकडून घेवो.

  24. यहोशुआ २२:२४सुमारे इ.स.पू. १४४३

    “नाही! आम्ही या भयाने हे केले की जर कधी तुमच्या वंशजांनी आमच्या वंशजांना विचारले, ‘याहवेह इस्राएलच्या परमेश्वराशी तुमचा काय संबंध आहे?

  25. यहोशुआ २२:२५सुमारे इ.स.पू. १४४३

    आमच्या आणि तुमच्यामध्ये याहवेहने यार्देन नदीची सीमा ठेवली आहे. तुम्ही रऊबेनी आणि गाद लोकांनो! याहवेहमध्ये तुम्हाला वाटा नाही.’ तेव्हा तुमचे वंशज आमच्या वंशजांना याहवेहचे भय बाळगण्यास थांबवतील.