मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने

636 वचने · 252 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जे डोळे अंध आहेत, ते उघडणारे आणि बंदीशाळेत आहेत, त्यांना सोडविणारे अंधारात बसलेल्यांची सुटका करणारे असे करेन.

  2. मी स्वतः शपथ वाहिली आहे, माझ्या मुखाने संपूर्ण प्रामाणिकपणाने हे शब्द उच्चारले आहेत ते हे शब्द आहेत, जे कधीही रद्द केले जाणार नाहीतः प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; आणि प्रत्येक जीभ माझ्या नावाने शपथ घेईल.

  3. ते म्हणतात, “याकोबाच्या कुळांना पुनर्स्थापित करणे आणि माझ्या अवशिष्ट इस्राएलच्या लोकांना परत आणणे, हे करण्यासाठी माझा सेवक होणे, हे काम फारच लहानसे आहे, तर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत माझे तारण पोचवावे यासाठी मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश व्हावा असेही करेन.”

  4. याहवेह असे म्हणतात: “माझ्या कृपेच्या समयी मी तुम्हाला उत्तर देईन, आणि तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य करेन; मी तुमचे संगोपन करेन आणि तुम्हाला सर्व लोकांसाठी एक करार असे करेन, जेणेकरून, तुमची भूमी पुनर्स्थापित होईल, आणि ओसाड वतने पुन्हा तुमच्या स्वाधीन होतील,

  5. याहवेह घोषणा करतात, “आणि आता माझ्याकडे काय राहिले आहे? माझ्या लोकांना विनामूल्य नेण्यात आले आहे, आणि जे त्यांच्यावर सत्ता गाजवितात ते त्यांचा उपहास करतात,” याहवेह घोषणा करतात, “संपूर्ण दिवसभर माझ्या नावाची सतत निंदा करण्यात येते.

  6. पर्वतावरून शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत, जे आनंददायी वार्ता आणतात, जे शांतीची घोषणा करतात, जे शुभ संदेश आणतात, जे तारणाची घोषणा करतात, जे सीयोनास म्हणतात, “तुमचे परमेश्वर राज्य करतात!”

  7. निघा, निघा, इथून बाहेर पडा! अपवित्र वस्तूला स्पर्श करू नका! तुम्ही जे याहवेहच्या मंदिरातील पात्रांची नेआण करता, इथून बाहेर पडा व स्वतःला शुद्ध करा.

  8. परंतु तुम्हाला इथून पलायन करावे लागणार नाही वा घाईने निघावे लागणार नाही; कारण याहवेह तुमच्यापुढे जातील, आणि इस्राएलचे परमेश्वर तुमचे पाठीराखे असतील.

  9. यास्तव तो अनेक राष्ट्रांवर शिंपडेल, आणि त्याच्यामुळे राजे आपले मुख बंद करतील. कारण त्यांना पूर्वी कधी कोणी जे सांगितले नव्हते, ते आता बघतील, आणि ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.

  10. आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?

  11. तरी देखील त्याने आमचे दुःख स्वतःवर घेतले, आणि आमचे क्लेश वाहिले, आम्हाला मात्र वाटले की परमेश्वरानेच त्याला ही शिक्षा दिली, त्यांनीच दुःखी केले व ही पीडा दिली.

  12. परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला, तो आमच्या पापामुळे चिरडला गेला; आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच्यावर आली, आणि त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले.

  13. त्याला छळले व जाचले, तरीही त्याने आपले मुख उघडले नाही; वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.

  14. अत्याचार करून, दोषी ठरविल्यावर ते त्याला जिवे मारण्यासाठी घेऊन गेले. तरी त्याच्या पिढीतून कोणी विरोध केला? कारण तो जिवंताच्या भूमीवरून काढून टाकण्यात आला; माझ्या लोकांच्या अपराधांसाठी त्याला शिक्षा देण्यात आली.

  15. दुष्ट माणसांच्या सोबत त्याला कबर नेमून देण्यात आली, आणि श्रीमंताच्या कबरेमध्ये पुरण्यात आले, परंतु त्याने काहीही हिंसा केली नव्हती, आणि त्याच्या मुखात कोणतेही कपट नव्हते.

  16. म्हणूनच महान लोकांसह मी त्याला वतन देईन, आणि अनेक सामर्थ्यशाली लोकांसह लूट वाटून घेईल. कारण त्याने आपले जीवन मरेपर्यंत ओतले, आणि अपराधी लोकांत त्याची गणना झाली. त्याने अनेकांचा पापाचा भार वाहिला, आणि पाप्यांसाठी मध्यस्थी केली.

  17. “हे वांझ स्त्रिये, तू जी कधीही प्रसवली नाही; उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर, कारण विवाहित स्त्रीपेक्षा, तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही, त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,” असे याहवेह म्हणतात.

  18. तुझ्या सर्व लेकरांना याहवेह शिकवतील, व त्यांना मोठी शांती प्राप्त होईल.

  19. माझे ऐका आणि मजकडे या; लक्ष द्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन, माझ्या विश्वासू प्रीतीचे वचन मी दावीदाला दिलेले आहे.

  20. अशांना मी माझ्या पवित्र पर्वतावर आणेन आणि माझ्या प्रार्थना मंदिरामध्ये त्यांना आनंदित करेन. त्यांच्या होमार्पणे व अर्पणांचा माझ्या वेदीवर स्वीकार केला जाईल; कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर असे म्हणतील.”

  21. पाप करावयाला त्यांचे पाय धाव घेतात; निर्दोषाचा रक्तपात करण्यास ते चपळ असतात. ते दुष्ट योजनेचा पाठपुरावा करतात; हिंसात्मक कृत्यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,

  22. आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही; त्यांच्या वाटेवर न्याय नसतो. त्यांनी ते मार्ग वाकडे करून टाकले आहेत; त्यांच्यासोबत चालणाऱ्या कोणासही शांतीचा अनुभव येत नाही.

  23. “याकोबातील ज्या लोकांनी आपल्या पापाबद्दल पश्चात्ताप केला आहे, सीयोनात त्यांचा उद्धारक येईल,” अशी याहवेह घोषणा करतात.

  24. याहवेह म्हणतात, “माझ्याबाबतीत म्हणाल, तर त्यांच्याशी केलेला हा माझा करार आहे. माझा पवित्र आत्मा जो तुमच्यावर आहे, तो तुमचा त्याग करणार नाही आणि माझे वचन जे मी तुमच्या मुखात घातले आहे, ते सदोदित तुमच्या ओठांवर, तुमच्या संततीच्या ओठांवर आणि त्यांच्या वंशजांच्या ओठांवर; आतापासून आणि सदासर्वकाळ राहील,” असे याहवेह म्हणतात.

  25. सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी याहवेहने माझा अभिषेक केला आहे. भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी, कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.