- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 1 इतिहास ११:१७सुमारे इ.स.पू. १०५५
दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे झाले असते!”
- 1 इतिहास ११:१८सुमारे इ.स.पू. १०५५
तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले.
- 1 इतिहास ११:१९सुमारे इ.स.पू. १०५५
त्याने म्हटले, “परमेश्वर न करो मला ते करावे लागेल. ज्या पुरुषांनी ते आपला जीव धोक्यात घालून आणले त्यांचे रक्त मी प्यावे काय?” कारण ते आणण्यासाठी त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घातला होता. त्यामुळे दावीद ते पाणी प्याला नाही. अशी साहसी कामे त्या तीन पराक्रमी योद्ध्यांनी केली होती.
- 1 इतिहास ११:२०सुमारे इ.स.पू. १०५५
योआबाचा भाऊ अबीशाई हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे लोकांविरुद्ध उगारून त्यांचा वध केला होता, म्हणून तो या तिघांप्रमाणेच प्रसिद्ध झाला होता.
- 1 इतिहास ११:२१सुमारे इ.स.पू. १०५५
या तिघांपेक्षा त्याला दुप्पट सन्मान दिला गेला आणि तो त्या तिघांचाही सेनापती झाला, जरी त्या तिघांमध्ये त्याची गणती केली नाही.
- 1 इतिहास ११:२२सुमारे इ.स.पू. १०५५
कबसेल येथील यहोयादाचा पुत्र बेनाइयाह एक शूर मनुष्य होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे हिमवर्षावाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले.
- 1 इतिहास ११:२३सुमारे इ.स.पू. १०५५
एकदा त्याने पाच हात उंचीच्या इजिप्ती मनुष्याला जिवे मारले होते. त्या इजिप्ती माणसाच्या हातात भाला होता, तरी बेनाइयाह केवळ आपली विणकर्याची काठी हातात घेऊन त्याच्याशी लढण्यास गेला. त्याने त्याचा भाला हिसकावून घेतला व त्याच्याच भाल्याने त्याला ठार मारले.
- 1 इतिहास ११:२४सुमारे इ.स.पू. १०५५
यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती.
- 1 इतिहास ११:२५सुमारे इ.स.पू. १०५५
इतर तीस जणांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला गेला, परंतु तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. आणि दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा अधिकारी म्हणून नेमले.
- 1 इतिहास ११:२६सुमारे इ.स.पू. १०५५
दावीदाचे पराक्रमी योद्धे हे होते: योआबाचा भाऊ असाहेल, बेथलेहेमकर दोदोचा पुत्र एलहानान,
- 1 इतिहास ११:२७सुमारे इ.स.पू. १०५५
हरोरचा शम्मोथ, पलोनी हेलेस,
- 1 इतिहास ११:२८सुमारे इ.स.पू. १०५५
तकोवा येथील इक्केशाचा पुत्र ईरा, अनाथोथचा अबिएजेर,
- 1 इतिहास ११:२९सुमारे इ.स.पू. १०५५
हुशाथचा सिब्बखय, अहोहचा ईलाय,
- 1 इतिहास ११:३०सुमारे इ.स.पू. १०५५
नटोफाथी माहाराई, नटोफाथी बाअनाहचा पुत्र हेलेद,
- 1 इतिहास ११:३१सुमारे इ.स.पू. १०५५
गिबियाहतील बिन्यामीन गोत्रातील रीबाईचा पुत्र इत्तय, पिराथोनचा बेनाइयाह,
- 1 इतिहास ११:३२सुमारे इ.स.पू. १०५५
गाशाच्या ओढ्याजवळचा हूरय, अर्बाथचा अबीएल,
- 1 इतिहास ११:३३सुमारे इ.स.पू. १०५५
बहरूमचा अजमावेथ, शालबोनचा एलीहबा,
- 1 इतिहास ११:३४सुमारे इ.स.पू. १०५५
गिजोन येथील हाशेमचे पुत्र, हरार येथील शागे याचा पुत्र योनाथान,
- 1 इतिहास ११:३५सुमारे इ.स.पू. १०५५
हरार येथील साखार याचा पुत्र अहीयाम, ऊरचा पुत्र एलिफाल,
- 1 इतिहास ११:३६सुमारे इ.स.पू. १०५५
मकेराथी हेफेर, पलोनी अहीयाह,
- 1 इतिहास ११:३७सुमारे इ.स.पू. १०५५
कर्मेलचा हेस्रो, एजबयाचा पुत्र नाराय,
- 1 इतिहास ११:३८सुमारे इ.स.पू. १०५५
नाथानाचा भाऊ योएल, हागरीचा पुत्र मिभार,
- 1 इतिहास ११:३९सुमारे इ.स.पू. १०५५
अम्मोनी सेलेक, जेरुइयाहचा पुत्र योआब याचा शस्त्रवाहक बैरोथचा नाहाराई,
- 1 इतिहास ११:४०सुमारे इ.स.पू. १०५५
इथ्री येथील ईरा, इथ्री येथील गारेब,
- 1 इतिहास ११:४१सुमारे इ.स.पू. १०५५
उरीयाह हिथी, अहलायाचा पुत्र जाबाद,