circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 2 शमुवेल २४:६सुमारे इ.स.पू. १०१७
नंतर ते गिलआद व तहतीम होदशी या प्रांतात गेले व तिथून दान यअनकडून वळसा घेऊन सीदोनकडे गेले.
- 2 शमुवेल २४:७सुमारे इ.स.पू. १०१७
नंतर ते सोरच्या किल्ल्याकडे आणि हिव्वी व कनानी यांच्या सर्व नगरांकडे व शेवटी ते यहूदीयाच्या नेगेवप्रांतातील बेअर-शेबापर्यंत गेले.
- 2 शमुवेल २४:८सुमारे इ.स.पू. १०१७
नऊ महिने वीस दिवस संपूर्ण देशात फिरल्यानंतर, ते यरुशलेमात परत आले.
- 2 शमुवेल २४:९सुमारे इ.स.पू. १०१७
योआबाने राजाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: इस्राएलमध्ये धनुर्धारी आठ लाख व यहूदीयामध्ये पाच लाख पुरुष होते.
- 2 शमुवेल २४:१०सुमारे इ.स.पू. १०१७
योद्धे पुरुषांची गणती केल्यानंतर दावीदाचे मन त्याला टोचू लागले आणि त्याने याहवेहला म्हटले, “मी जे केले ते करून मी पाप केले आहे. तर आता हे याहवेह, मी आपणास विनंती करतो की आपल्या सेवकाचा दोष दूर करा; मी मूर्खपणा केला आहे.”
- 2 शमुवेल २४:११सुमारे इ.स.पू. १०१७
दुसर्या दिवशी सकाळी दावीद उठण्यापूर्वी, दावीदाचा द्रष्टा, गाद संदेष्टा, याच्याकडे याहवेहचे वचन आले:
- 2 शमुवेल २४:१२सुमारे इ.स.पू. १०१७
“जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर, जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ”
- 2 शमुवेल २४:१३सुमारे इ.स.पू. १०१७
तेव्हा गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हटले, “तुमच्यासमोर देशभर तीन वर्षांचा दुष्काळ असावा? किंवा शत्रूकडून तुमचा पाठलाग होत असताना तीन महिने तुम्ही त्यांच्यापासून पळ काढावा? किंवा तुमच्या देशात तीन दिवस पीडा यावी? तर आता यावर विचार करून ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.”
- 2 शमुवेल २४:१४सुमारे इ.स.पू. १०१७
दावीदाने गादला म्हटले, “मी मोठ्या पेचात आहे. आपण याहवेहच्या हाती पडू, कारण त्यांची कृपा अपार आहे; परंतु मला मनुष्याच्या हातात पडू देऊ नको.”
- 2 शमुवेल २४:१५सुमारे इ.स.पू. १०१७
तेव्हा याहवेहने इस्राएल देशात त्या सकाळपासून नेमलेल्या वेळेपर्यंत मरी पाठवली आणि दानपासून बेअर-शेबापर्यंत सत्तर हजार लोक मरण पावले.
- 2 शमुवेल २४:१६सुमारे इ.स.पू. १०१७
जेव्हा यरुशलेमचा नाश करण्यासाठी दूताने आपला हात लांब केला, तेव्हा याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि लोकांचा नाश करणार्या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ होता.
- 2 शमुवेल २४:१७सुमारे इ.स.पू. १०१७
दावीदाने जेव्हा लोकांचा नाश करणार्या दूताला पाहिले, तो याहवेहला म्हणाला, “मी पाप केले आहे; जो मी मेंढपाळ, तो मी चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो.”
- 2 शमुवेल २४:१८सुमारे इ.स.पू. १०१७
त्या दिवशी गाद दावीदाकडे आला आणि त्याला म्हणाला, “जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध.”
- 2 शमुवेल २४:१९सुमारे इ.स.पू. १०१७
तेव्हा गादद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेनुसार दावीद वर गेला.
- 2 शमुवेल २४:२०सुमारे इ.स.पू. १०१७
राजा व त्याची माणसे आपल्याकडे येत आहेत असे जेव्हा अरवनाहने पाहिले, तेव्हा त्याने राजासमोर जाऊन भूमीकडे तोंड करून दंडवत घातले.
- 2 शमुवेल २४:२१सुमारे इ.स.पू. १०१७
अरवनाहने विचारले, “माझे स्वामी आपल्या सेवकाकडे का आले आहेत?” दावीदाने उत्तर दिले, “मी तुझे खळे विकत घेण्यासाठी आलो आहे, लोकांवर आलेली मरी थांबावी म्हणून याहवेहसाठी मी इथे वेदी बांधेन.”
- 2 शमुवेल २४:२२सुमारे इ.स.पू. १०१७
अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामींना मनास येईल ते त्यांनी घ्यावे व अर्पण करावे. हे पाहा होमार्पणासाठी बैल इकडे आहेत आणि लाकडासाठी मळणीची आऊते व बैलाचे जू येथे आहे.
- 2 शमुवेल २४:२३सुमारे इ.स.पू. १०१७
महाराज, अरवनाह हे सर्व राजाला देत आहे.” त्याचप्रमाणे अरवनाह हे सुद्धा म्हणाला, “याहवेह आपले परमेश्वर आपला स्वीकार करो.”
- 2 शमुवेल २४:२४सुमारे इ.स.पू. १०१७
परंतु राजा अरवनाहला म्हणाला, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. फुकट मिळालेले होमार्पण याहवेह माझ्या परमेश्वराला मी अर्पिणार नाही.” म्हणून दावीदाने जात्याचे खळे आणि बैल चांदीचे पन्नास शेकेल देऊन विकत घेतले.
- 2 शमुवेल २४:२५सुमारे इ.स.पू. १०१७
नंतर दावीदाने तिथे याहवेहप्रीत्यर्थ एक वेदी बांधली व होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पिली. तेव्हा दावीदाने देशाच्या वतीने केलेली प्रार्थना याहवेहने ऐकली आणि इस्राएलातील पीडा नाहीशी झाली.
- 1 इतिहास १०:१सुमारे इ.स.पू. १०५६
पलिष्ट्यांनी इस्राएलविरुद्ध युद्ध केले; इस्राएली लोक त्यांच्यापुढून पळून गेले, आणि गिलबोआ डोंगरावर पुष्कळजण मारले गेले.
- 1 इतिहास १०:२सुमारे इ.स.पू. १०५६
पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा आवेशाने पाठलाग केला आणि त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले.
- 1 इतिहास १०:३सुमारे इ.स.पू. १०५६
शौलाच्या सर्व बाजूंनी युद्ध भयंकर वाढत गेले आणि जेव्हा धनुर्धऱ्यांनी त्याला गाठले व त्याला जखमी केले.
- 1 इतिहास १०:४सुमारे इ.स.पू. १०५६
तेव्हा शौल त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती लोक येऊन माझी विटंबना करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक घाबरून गेला होता आणि तो तसे करेना; तेव्हा शौलाने त्याची स्वतःची तलवार घेतली आणि तिच्यावर तो पडला.
- 1 इतिहास १०:५सुमारे इ.स.पू. १०५६
जेव्हा शस्त्रवाहकाने पाहिले की शौल मरण पावला आहे, तेव्हा तो सुद्धा आपल्या तलवारीवर पडला आणि मरण पावला.