मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 शमुवेल २२:४६सुमारे इ.स.पू. १०१८

    त्या सर्वांचे धैर्य खचून गेले, ते त्यांच्या गडातून थरथर कापत बाहेर येतात.

  2. 2 शमुवेल २२:४७सुमारे इ.स.पू. १०१८

    “याहवेह जिवंत आहे! माझ्या खडकाची स्तुती असो! माझे परमेश्वर, खडक, माझे तारणकर्ता सर्वोच्च असोत!

  3. 2 शमुवेल २२:४८सुमारे इ.स.पू. १०१८

    परमेश्वरच आहेत, जे माझ्यासाठी सूड घेतात, ते राष्ट्रांना माझ्या अधीन करतात,

  4. 2 शमुवेल २२:४९सुमारे इ.स.पू. १०१८

    ते मला माझ्या वैर्‍यांपासून मुक्त करतात. तुम्ही मला माझ्या वैर्‍यांपेक्षा उंचावले आहे; हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले.

  5. 2 शमुवेल २२:५०सुमारे इ.स.पू. १०१८

    म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन; मी तुमच्या नावाची स्तुती गाईन.

  6. 2 शमुवेल २२:५१सुमारे इ.स.पू. १०१८

    “ते आपल्या राजाला महान विजय देतात; ते आपल्या अभिषिक्तावर, दावीदावर आणि त्याच्या वंशजांवरही सर्वदा कृपा करतात.”

  7. 2 शमुवेल २३:१सुमारे इ.स.पू. १०१५

    दावीदाचे शेवटचे शब्द हे आहेत: “इशायाचा पुत्र दावीदाचे प्रेरित शब्द, परात्पराने ज्याला उंच केले त्याचे हे शब्द, याकोबाच्या परमेश्वराद्वारे ज्याचा अभिषेक झाला, जो इस्राएलच्या गीतांचा नायक:

  8. 2 शमुवेल २३:२सुमारे इ.स.पू. १०१५

    “याहवेहचा आत्मा माझ्याद्वारे बोलला आहे; त्यांचे वचन माझ्या जिभेवर होते.

  9. 2 शमुवेल २३:३सुमारे इ.स.पू. १०१५

    इस्राएलचे परमेश्वर बोलले, इस्राएलच्या खडकाने मला म्हटले: ‘जेव्हा एखादा मनुष्य न्यायाने लोकांवर राज्य करतो, जेव्हा तो परमेश्वराचे भय बाळगून राज्य करतो,

  10. 2 शमुवेल २३:४सुमारे इ.स.पू. १०१५

    तो सूर्योदयाच्या प्रकाशासारखा निरभ्र पहाटेच्या प्रभेसारखा, पाऊसानंतरच्या तेजाप्रमाणे जे भूमीतून गवत उगवते त्याप्रमाणे आहे.’

  11. 2 शमुवेल २३:५सुमारे इ.स.पू. १०१५

    “जर माझे घराणे परमेश्वराशी सरळ नसते, तर खचितच त्यांनी माझ्याशी सर्वकाळचा करार, सर्वप्रकारे सुव्यवस्थित व निश्चित केला नसता, खचितच त्यांनी माझे तारण सफल करून माझी प्रत्येक आकांक्षा पूर्ण केली नसती.

  12. 2 शमुवेल २३:६सुमारे इ.स.पू. १०१५

    परंतु सर्व दुष्ट लोक काट्यांसारखे फेकले जातील, जे हाताने गोळा करता येत नाहीत.

  13. 2 शमुवेल २३:७सुमारे इ.स.पू. १०१५

    जे कोणी काट्यांना गोळा करतात ते लोखंडी साधन किंवा भाल्याचा दांडा वापरतात; ते जागीच भस्म केले जातात.”

  14. 2 शमुवेल २३:८सुमारे इ.स.पू. १०५५

    दावीदाच्या पराक्रमी योद्ध्यांची नावे ही: तहकेमोनचा योशेब-बश्शेबेथ तीन सेनापतींचा प्रमुख होता; त्याने भाला उगारून एका हल्ल्यात आठशे लोकांचा वध केला.

  15. 2 शमुवेल २३:९सुमारे इ.स.पू. १०५५

    त्याच्यानंतर अहोहचा रहिवासी दोदोचा पुत्र एलअज़ार होता. तो तीन पराक्रमी योद्ध्यांपैकी एक होता. पस-दम्मीम येथे युद्धासाठी एकत्र आलेल्या पलिष्ट्यांना टोमणे मारत जो दावीदाबरोबर होता. तेव्हा इस्राएल लोक माघारी गेले होते,

  16. 2 शमुवेल २३:१०सुमारे इ.स.पू. १०५५

    परंतु एलअज़ार युद्धभूमीवर राहून, त्याचा हात थकेपर्यंत व तलवारीला त्याचा हात चिकटून जाईपर्यंत त्याने पलिष्ट्यांना ठार मारले होते. त्या दिवशी याहवेहने त्यांना मोठा विजय प्राप्त करून दिला. सैन्य पुन्हा एलअज़ारकडे आले ते केवळ मेलेल्यांना लुटायला.

  17. 2 शमुवेल २३:११सुमारे इ.स.पू. १०५५

    त्याच्यानंतर अगी हरारी याचा पुत्र शम्माह होता. मसूरांनी भरलेले शेत असलेल्या एका ठिकाणी पलिष्टी एकत्र जमले तेव्हा इस्राएली सैन्याने पलिष्ट्यांपुढून पळ काढला होता.

  18. 2 शमुवेल २३:१२सुमारे इ.स.पू. १०५५

    परंतु शम्माह त्या शेताच्या मध्यभागी उभा राहिला, त्याचा बचाव त्यांनी केला आणि पलिष्ट्यांना मारून टाकले आणि याहवेहने त्या दिवशी मोठा विजय मिळवून दिला.

  19. 2 शमुवेल २३:१३सुमारे इ.स.पू. १०५५

    हंगामाच्या वेळी, जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्‍यात छावणी दिली होती, तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेकडे आले.

  20. 2 शमुवेल २३:१४सुमारे इ.स.पू. १०५५

    त्यावेळी दावीद गडावर होता आणि पलिष्टी सेना बेथलेहेम नगरात होती.

  21. 2 शमुवेल २३:१५सुमारे इ.स.पू. १०५५

    दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे असते!”

  22. 2 शमुवेल २३:१६सुमारे इ.स.पू. १०५५

    तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले.

  23. 2 शमुवेल २३:१७सुमारे इ.स.पू. १०५५

    दावीद म्हणाला, “मी असे करणे माझ्यापासून दूर असो, हे याहवेह! ज्या पुरुषांनी आपला जीव धोक्यात घालून आणले, त्यांचे ते रक्त नाही काय?” म्हणून दावीद ते पाणी प्याला नाही. अशी साहसी कामे त्या तीन पराक्रमी योद्ध्यांनी केली होती.

  24. 2 शमुवेल २३:१८सुमारे इ.स.पू. १०५५

    जेरुइयाहचा पुत्र योआबचा भाऊ अबीशाई हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे लोकांवर उगारून त्यांना मारून टाकले होते, म्हणून तो या तिघांप्रमाणेच प्रसिद्ध झाला होता.

  25. 2 शमुवेल २३:१९सुमारे इ.स.पू. १०५५

    या तिघांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला नाही काय? तो त्या तिघांचाही सेनापती झाला, जरी त्या तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही.