मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 शमुवेल २१:१८सुमारे इ.स.पू. १०१८

    कालांतराने पलिष्ट्यांबरोबर गोब येथे पुन्हा दुसरे युद्ध झाले. त्यावेळेस हुशाथी सिब्बखय याने राफाह वंशातील साफ याला ठार मारले.

  2. 2 शमुवेल २१:१९सुमारे इ.स.पू. १०१८

    गोब येथे पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धामध्ये बेथलेहेम येथील याईरचा पुत्र एलहानान याने गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले ज्याच्या भाल्याची काठी विणकर्‍याच्या काठीसारखी होती.

  3. 2 शमुवेल २१:२०सुमारे इ.स.पू. १०१८

    आणखी दुसर्‍या एका युद्धात, जे गथ येथे झाले, त्यामध्ये प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता.

  4. 2 शमुवेल २१:२१सुमारे इ.स.पू. १०१८

    जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआहचा पुत्र योनाथानने त्याला मारून टाकले.

  5. 2 शमुवेल २१:२२सुमारे इ.स.पू. १०१८

    हे चार पुरुष गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीदाच्या आणि त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले.

  6. 2 शमुवेल २२:१सुमारे इ.स.पू. १०१८

    जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या हातातून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले.

  7. 2 शमुवेल २२:२सुमारे इ.स.पू. १०१८

    तो म्हणाला: “याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे आहेत;

  8. 2 शमुवेल २२:३सुमारे इ.स.पू. १०१८

    माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, तेच माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग आहे. ते माझे गड, माझे शरणस्थान आणि माझे तारणारे आहेत; हिंसक लोकांपासून याहवेह, तुम्ही मला वाचवितात.

  9. 2 शमुवेल २२:४सुमारे इ.स.पू. १०१८

    “स्तुतीस योग्य याहवेहचा, मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.

  10. 2 शमुवेल २२:५सुमारे इ.स.पू. १०१८

    मृत्यूच्या लाटांनी मला घेरले; नाशाच्या प्रवाहांनी मला बुडवून टाकले.

  11. 2 शमुवेल २२:६सुमारे इ.स.पू. १०१८

    मृतलोकाच्या दोर्‍यांनी मला सभोवती घेरले; मृत्यूचे भय मला सामोरे आले,

  12. 2 शमुवेल २२:७सुमारे इ.स.पू. १०१८

    “मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला; मी माझ्या परमेश्वराचा धावा केला. आणि त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली; माझा धावा त्यांच्या कानी पडला.

  13. 2 शमुवेल २२:८सुमारे इ.स.पू. १०१८

    तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, आकाशाचे पाये हादरले; याहवेहच्या क्रोधामुळे ते भयभीत झाले.

  14. 2 शमुवेल २२:९सुमारे इ.स.पू. १०१८

    त्यांच्या नाकपुड्यातून धूर निघाला; भस्म करणारा अग्नी त्यांच्या मुखातून निघाला, जळते निखारे त्यातून निघाले.

  15. 2 शमुवेल २२:१०सुमारे इ.स.पू. १०१८

    आकाशाला विभागून याहवेह खाली आले; घनदाट ढग त्यांच्या पायाखाली होते.

  16. 2 शमुवेल २२:११सुमारे इ.स.पू. १०१८

    करुबावर आरूढ होऊन ते उडून गेले; वार्‍याच्या पंखांवर त्यांनी भरारी मारली.

  17. 2 शमुवेल २२:१२सुमारे इ.स.पू. १०१८

    अंधकार, व आकाशातील काळे मेघ; यांचा त्यांनी आपल्या सभोवती मंडप केला आहे.

  18. 2 शमुवेल २२:१३सुमारे इ.स.पू. १०१८

    त्यांच्या तेजस्वी समक्षतेतून विजा लखलखल्या.

  19. 2 शमुवेल २२:१४सुमारे इ.स.पू. १०१८

    याहवेहने स्वर्गातून गर्जना केली; परात्पराच्या वाणीचा नाद झाला.

  20. 2 शमुवेल २२:१५सुमारे इ.स.पू. १०१८

    त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली, मोठ्या विजेच्या कडकडाटांनी त्यांना पळवून टाकले.

  21. 2 शमुवेल २२:१६सुमारे इ.स.पू. १०१८

    याहवेहच्या धमकीने त्यांच्या नाकपुड्यातील श्वासाच्या फुंकराने समुद्राचे तळ उघडकीस आले आणि पृथ्वीचे पाये उघडे पडले.

  22. 2 शमुवेल २२:१७सुमारे इ.स.पू. १०१८

    “वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले; खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले.

  23. 2 शमुवेल २२:१८सुमारे इ.स.पू. १०१८

    माझ्या बलवान शत्रूपासून माझे शत्रू जे माझ्यासाठी फार शक्तिमान होते, त्यांच्यापासून मला सोडविले.

  24. 2 शमुवेल २२:१९सुमारे इ.स.पू. १०१८

    माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले, परंतु याहवेह माझे आधार होते.

  25. 2 शमुवेल २२:२०सुमारे इ.स.पू. १०१८

    त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी आणले; त्यांनी मला सोडविले कारण त्यांना माझ्याठायी हर्ष होता.