- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 2 शमुवेल २२:२१सुमारे इ.स.पू. १०१८
“याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार माझ्याशी व्यवहार केला आहे; माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार त्यांनी मला प्रतिफळ दिले आहे.
- 2 शमुवेल २२:२२सुमारे इ.स.पू. १०१८
कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत; माझ्या परमेश्वरापासून दूर गेल्याचा दोष माझ्यावर नाही.
- 2 शमुवेल २२:२३सुमारे इ.स.पू. १०१८
त्यांचे सर्व नियम माझ्यासमोर आहेत; मी त्यांच्या आज्ञेपासून दूर वळलो नाही.
- 2 शमुवेल २२:२४सुमारे इ.स.पू. १०१८
मी त्यांच्यापुढे निर्दोष आहे आणि मी स्वतःला पापापासून दूर ठेवले आहे.
- 2 शमुवेल २२:२५सुमारे इ.स.पू. १०१८
याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार, त्यांच्या दृष्टीसमोर माझ्या शुद्धतेनुसार मला प्रतिफळ दिले आहे.
- 2 शमुवेल २२:२६सुमारे इ.स.पू. १०१८
“विश्वासणाऱ्यांशी तुम्ही विश्वासू आहात, व निर्दोषांशी तुम्ही निर्दोषतेने वागता,
- 2 शमुवेल २२:२७सुमारे इ.स.पू. १०१८
शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता, परंतु कुटिलांशी तुम्ही चतुरतेने वागता.
- 2 शमुवेल २२:२८सुमारे इ.स.पू. १०१८
नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, परंतु उन्मत्त लोकांवर नजर ठेवून तुम्ही त्यांचा अधःपात करतात.
- 2 शमुवेल २२:२९सुमारे इ.स.पू. १०१८
हे याहवेह, तुम्ही माझे दीप आहात; याहवेह माझ्या अंधाराचा प्रकाश करतात.
- 2 शमुवेल २२:३०सुमारे इ.स.पू. १०१८
तुमच्याच साहाय्याने मी सैन्यावर मात करू शकतो; माझ्या परमेश्वरामुळे मी गड चढू शकतो.
- 2 शमुवेल २२:३१सुमारे इ.स.पू. १०१८
“परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.
- 2 शमुवेल २२:३२सुमारे इ.स.पू. १०१८
याहवेहखेरीज दुसरा कोण परमेश्वर आहे? आणि आमच्या परमेश्वराशिवाय कोण खडक आहे?
- 2 शमुवेल २२:३३सुमारे इ.स.पू. १०१८
परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात, आणि माझे मार्ग सरळ ठेवतात.
- 2 शमुवेल २२:३४सुमारे इ.स.पू. १०१८
तेच माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतात; कड्यांच्या माथ्यांवरून तेच मला सुखरुपपणे नेतात.
- 2 शमुवेल २२:३५सुमारे इ.स.पू. १०१८
ते माझ्या हातांना युद्धासाठी प्रशिक्षित करतात; माझे हात कास्य धनुष्य वाकवितात.
- 2 शमुवेल २२:३६सुमारे इ.स.पू. १०१८
माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे; तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे.
- 2 शमुवेल २२:३७सुमारे इ.स.पू. १०१८
माझी पावले घसरू नयेत, म्हणून माझ्या पावलांसाठी तुम्ही विस्तृत मार्ग केला आहे.
- 2 शमुवेल २२:३८सुमारे इ.स.पू. १०१८
“मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला आणि त्यांचा नाश केला; त्यांचा नाश होईपर्यंत मी परतलो नाही.
- 2 शमुवेल २२:३९सुमारे इ.स.पू. १०१८
मी त्यांना पूर्णपणे तुडविले आणि ते उठू शकले नाही; ते माझ्या पायाखाली पडले.
- 2 शमुवेल २२:४०सुमारे इ.स.पू. १०१८
तुमच्या शक्तीने मला युद्धासाठी सुसज्ज केले; माझ्या शत्रूंना तुम्ही माझ्यासमोर लीन केले.
- 2 शमुवेल २२:४१सुमारे इ.स.पू. १०१८
तुम्ही माझ्या वैर्यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले, आणि मी माझ्या शत्रूंचा नाश केला.
- 2 शमुवेल २२:४२सुमारे इ.स.पू. १०१८
त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते; त्यांनी याहवेहचा धावा केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.
- 2 शमुवेल २२:४३सुमारे इ.स.पू. १०१८
पृथ्वीच्या धुळीप्रमाणे मी त्यांचा भुगा केला; रस्त्यावरील चिखलाप्रमाणे त्यांना मी कुटून आणि तुडवून टाकले.
- 2 शमुवेल २२:४४सुमारे इ.स.पू. १०१८
“लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली; राष्ट्रांचा प्रमुख म्हणून तुम्ही मला राखून ठेवले. ज्या लोकांची मला ओळख नव्हती ते आता माझी सेवा करतात,
- 2 शमुवेल २२:४५सुमारे इ.स.पू. १०१८
परदेशी माझ्यासमोर भीतीने वाकतात; माझे नाव ऐकताच ते माझी आज्ञा पाळतात.