circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 2 शमुवेल २३:२०सुमारे इ.स.पू. १०५५
कबसेल येथील यहोयादाचा पुत्र बेनाइयाह एक शूर मनुष्य होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे हिमवर्षावाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले.
- 2 शमुवेल २३:२१सुमारे इ.स.पू. १०५५
त्याने एका बलाढ्य इजिप्ती मनुष्याला सुद्धा जिवे मारले होते. जरी त्या इजिप्ती माणसाच्या हातात भाला होता, बेनाइयाह केवळ आपली काठी हातात घेऊन त्याच्याशी लढण्यास गेला. त्याने त्याचा भाला हिसकावून घेतला व त्याच्याच भाल्याने त्याला मारून टाकले.
- 2 शमुवेल २३:२२सुमारे इ.स.पू. १०५५
यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती.
- 2 शमुवेल २३:२३सुमारे इ.स.पू. १०५५
इतर तीस जणांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला गेला, परंतु तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. आणि दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा अधिकारी म्हणून नेमले.
- 2 शमुवेल २३:२४सुमारे इ.स.पू. १०५५
तीस जण येणेप्रमाणे होते: योआबाचा भाऊ असाहेल, बेथलेहेमकर दोदोचा पुत्र एलहानान,
- 2 शमुवेल २३:२५सुमारे इ.स.पू. १०५५
हरोदी शम्माह, हरोदी एलीका,
- 2 शमुवेल २३:२६सुमारे इ.स.पू. १०५५
पालती हेलेस, तकोवा येथील इक्केशाचा पुत्र ईरा,
- 2 शमुवेल २३:२७सुमारे इ.स.पू. १०५५
अनाथोथचा अबिएजेर, हुशाथचा सिब्बखय,
- 2 शमुवेल २३:२८सुमारे इ.स.पू. १०५५
अहोह येथील सलमोन, नटोफाथी माहाराई,
- 2 शमुवेल २३:२९सुमारे इ.स.पू. १०५५
नटोफाथी बाअनाहचा पुत्र हेलेब, गिबियाहतील बिन्यामीन गोत्रातील रीबाईचा पुत्र इत्तई,
- 2 शमुवेल २३:३०सुमारे इ.स.पू. १०५५
पिराथोनचा बेनाइयाह, गाशाच्या ओढ्याजवळचा हिद्दै,
- 2 शमुवेल २३:३१सुमारे इ.स.पू. १०५५
अर्बाथचा अबी-अल्बोन, बहरहूमचा अजमावेथ,
- 2 शमुवेल २३:३२सुमारे इ.स.पू. १०५५
शालबोनचा एलीहबा, याशेनाचे पुत्र, योनाथान
- 2 शमुवेल २३:३३सुमारे इ.स.पू. १०५५
हरार येथील शम्माहचा पुत्र, हरार येथील शारारचा पुत्र अहीयाम,
- 2 शमुवेल २३:३४सुमारे इ.स.पू. १०५५
माकाथी अहसबैचा पुत्र एलिफेलेत, गिलोनी अहीथोफेलचा पुत्र एलीयाम,
- 2 शमुवेल २३:३५सुमारे इ.स.पू. १०५५
कर्मेलचा हेस्रो, अर्बी येथील पारई,
- 2 शमुवेल २३:३६सुमारे इ.स.पू. १०५५
सोबाह येथील हागरीचा पुत्र, नाथानचा पुत्र इगाल, गादी बानी;
- 2 शमुवेल २३:३७सुमारे इ.स.पू. १०५५
अम्मोनी सेलेक, बैरोथचा नाहाराई, जो जेरुइयाहचा पुत्र योआब याचा शस्त्रवाहक होता,
- 2 शमुवेल २३:३८सुमारे इ.स.पू. १०५५
इथ्री येथील ईरा, इथ्री येथील गारेब
- 2 शमुवेल २३:३९सुमारे इ.स.पू. १०५५
आणि उरीयाह हिथी.
- 2 शमुवेल २४:१सुमारे इ.स.पू. १०१७
इस्राएली लोकांविरुद्ध याहवेहचा कोप पुन्हा भडकला आणि त्यांनी दावीदाला चिथविले, “जा आणि इस्राएल व यहूदीयाची शिरगणती कर.”
- 2 शमुवेल २४:२सुमारे इ.स.पू. १०१७
म्हणून राजाने योआब व त्याच्या बरोबरच्या सेनापतींना सांगितले, “दानपासून बेअर-शेबापर्यंत इस्राएलच्या सर्व गोत्रांमधून फिरून, लढाऊ पुरुषांची नोंदणी करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.”
- 2 शमुवेल २४:३सुमारे इ.स.पू. १०१७
परंतु योआबाने राजाला उत्तर दिले, “याहवेह आपले परमेश्वर आपल्या सैन्यातील संख्या शंभरपटीने वाढवो आणि माझे स्वामी ते आपल्या डोळ्यांनी पाहो. परंतु गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात?”
- 2 शमुवेल २४:४सुमारे इ.स.पू. १०१७
तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; तेव्हा ते इस्राएलच्या लढाऊ पुरुषांची गणती करण्यासाठी राजापुढून निघून गेले.
- 2 शमुवेल २४:५सुमारे इ.स.पू. १०१७
यार्देन पार केल्यावर, त्यांनी अरोएर नगराच्या दक्षिणेकडील खोर्यात डेरा दिला, नंतर ते गादमधून जाऊन याजेरकडे गेले.