- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 2 शमुवेल २०:१९सुमारे इ.स.पू. १०२२
आम्ही शांतताप्रिय आणि इस्राएलचे विश्वासू लोक आहोत. तुम्ही इस्राएलातील मातृनगराचा नाश करण्याचा प्रयत्न का करीत आहात? याहवेहच्या वतनाचा तुम्ही का नाश करावा?”
- 2 शमुवेल २०:२०सुमारे इ.स.पू. १०२२
यावर योआबाने उत्तर दिले, “मी त्याचा नाश किंवा त्याचा विध्वंस करावा हे माझ्यापासून अगदी दूर असो.
- 2 शमुवेल २०:२१सुमारे इ.स.पू. १०२२
पण तसे काही नाही. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील एक मनुष्य, जो बिकरीचा पुत्र शबा याने दावीद राजाविरुद्ध आपला हात उगारला आहे. हा मनुष्य माझ्या स्वाधीन कर, म्हणजे मी शहर सोडून जाईन.” ती स्त्री योआबाला म्हणाली, “त्याचे शिर तुझ्याकडे तटावरून टाकले जाईल.”
- 2 शमुवेल २०:२२सुमारे इ.स.पू. १०२२
ती स्त्री आपल्या शहाणपणाचा हा सल्ला घेऊन सर्व लोकांकडे गेली आणि त्यांनी बिकरीचा पुत्र शबा याचे शिर कापून योआबाकडे फेकून दिले. तेव्हा योआबाने रणशिंग फुंकले आणि त्याचे लोक शहर सोडून आपआपल्या घरी निघून गेले. आणि योआब यरुशलेमास राजाकडे परत गेला.
- 2 शमुवेल २०:२३सुमारे इ.स.पू. १०२२
योआब इस्राएलच्या सर्व सैन्याचा सेनापती होता; यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी व पेलेथी यांचा प्रमुख होता;
- 2 शमुवेल २०:२४सुमारे इ.स.पू. १०२२
अदोनिराम वेठबिगारी करणार्यांचा अधिकारी होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता;
- 2 शमुवेल २०:२५सुमारे इ.स.पू. १०२२
शेवा सचिव होता; सादोक व अबीयाथार याजक होते;
- 2 शमुवेल २०:२६सुमारे इ.स.पू. १०२२
आणि याईरचा वंशज ईरा दावीदाचा याजक होता.
- 2 शमुवेल २१:१सुमारे इ.स.पू. १०१८
दावीदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला होता; म्हणून दावीद याहवेहसमोर गेला. याहवेह म्हणाले, “हे शौल आणि त्याच्या रक्तदोषी घराण्यामुळे आहे; कारण त्याने गिबोनी लोकांना मारले होते.”
- 2 शमुवेल २१:२सुमारे इ.स.पू. १०१८
तेव्हा राजाने गिबोनी लोकांस बोलावून घेतले आणि त्यांना म्हटले. (गिबोनी लोक इस्राएलचा भाग नव्हते, परंतु अमोरी लोकांतून उरलेले लोक होते; त्यांना जिवंत ठेवावे अशी इस्राएली लोकांनी शपथ घेतली होती, परंतु इस्राएल आणि यहूदाह यांच्याबद्दल असलेल्या त्याच्या आवेशामुळे शौलाने त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.)
- 2 शमुवेल २१:३सुमारे इ.स.पू. १०१८
दावीदाने गिबोनी लोकांना विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे? कशाप्रकारे मी प्रायश्चित करावे की तुम्ही याहवेहच्या वतनाला आशीर्वाद द्याल?”
- 2 शमुवेल २१:४सुमारे इ.स.पू. १०१८
गिबोनी लोकांनी राजाला उत्तर दिले, “शौल आणि त्याच्या घराण्याकडून आम्ही चांदी किंवा सोन्याची मागणी करावी असा अधिकार आम्हाला नाही, किंवा इस्राएलातील कोणालाही जिवे मारण्याचा अधिकार आम्हाला नाही.” दावीदाने विचारले, “मग तुमच्यासाठी मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
- 2 शमुवेल २१:५सुमारे इ.स.पू. १०१८
त्यांनी राजाला उत्तर दिले, “ज्या मनुष्याने आमचा नाश केला आणि आमची संख्या कमी व्हावी आणि इस्राएलमध्ये कुठेही आम्हाला स्थान नसावे म्हणून आमच्याविरुद्ध योजना केली,
- 2 शमुवेल २१:६सुमारे इ.स.पू. १०१८
तर आता त्याच्या वंशातील सात पुरुषांना आमच्याकडे द्यावे म्हणजे शौल जो याहवेहद्वारे निवडला गेला होता, त्याच्या गिबियाहमध्ये आम्ही त्यांना मारून टाकून त्यांची शरीर तिथे उघडे टाकू.” तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना तुमच्या हाती देईन.”
- 2 शमुवेल २१:७सुमारे इ.स.पू. १०१८
शौलाचा पुत्र योनाथान व दावीदामध्ये याहवेहसमोर झालेल्या शपथेमुळे राजाने शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ याची गय केली.
- 2 शमुवेल २१:८सुमारे इ.स.पू. १०१८
परंतु अय्याहची कन्या रिजपाह हिचे दोन पुत्र अरमोनी आणि मेफीबोशेथ जे तिला शौलापासून झाले होते, त्याबरोबर शौलाची कन्या मीखल हिचे पाच पुत्र जे तिला महोलाथी बारजिल्लईचा पुत्र अद्रीएल याच्यापासून झाले होते यांना राजाने घेतले.
- 2 शमुवेल २१:९सुमारे इ.स.पू. १०१८
त्याने त्यांना गिबोनी लोकांच्या हाती सोपवून दिले, ज्यांनी त्यांना मारून टाकले आणि त्यांची शरीरे डोंगरावर याहवेहसमोर प्रदर्शित केली. ते सातही जण एकत्र मरण पावले; हंगामाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये त्यांना मारण्यात आले होते, जेव्हा जवाच्या हंगामाची सुरुवात झाली होती.
- 2 शमुवेल २१:१०सुमारे इ.स.पू. १०१८
तेव्हा अय्याहची मुलगी रिजपाह हिने गोणपाट घेतले, आणि ते स्वतःसाठी खडकावर पसरविले. हंगामाच्या सुरुवातीपासून त्या शरीरावर आकाशातून पाऊस पडेपर्यंत, तिने दिवसा पक्ष्यांना आणि रात्री जंगली प्राण्यांना त्या शवांना स्पर्श करू दिला नाही.
- 2 शमुवेल २१:११सुमारे इ.स.पू. १०१८
अय्याहची कन्या रिजपाह, जी शौलाची उपपत्नी होती तिने जे केले ते दावीदाला कळले,
- 2 शमुवेल २१:१२सुमारे इ.स.पू. १०१८
दावीद गेला आणि याबेश-गिलआद येथील नागरिकांकडून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी घेतल्या. (त्यांनी त्यांची शरीरे बेथ-शान नगराच्या चौकातून चोरली होती, जिथे पलिष्ट्यांनी शौलाला गिलबोआत मारून टाकल्यानंतर त्यांना तिथे टांगले होते.)
- 2 शमुवेल २१:१३सुमारे इ.स.पू. १०१८
तेव्हा दावीदाने शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी तिथून आणल्या आणि ज्यांना मारून टाकून डोंगरावर प्रदर्शित केले होते त्यांच्या अस्थी सुद्धा गोळा केल्या.
- 2 शमुवेल २१:१४सुमारे इ.स.पू. १०१८
त्यांनी बिन्यामीन प्रांतातील सेला येथे शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी, शौलाचा पिता कीश याच्या कबरेत पुरल्या आणि राजाने आज्ञापिल्याप्रमाणे सर्वकाही केले, त्यानंतर देशाच्या वतीने केलेल्या प्रार्थनेचे परमेश्वराने उत्तर दिले.
- 2 शमुवेल २१:१५सुमारे इ.स.पू. १०१८
पुन्हा एकदा पलिष्टी आणि इस्राएल यांच्यामध्ये युद्ध झाले. दावीद आपल्या सैन्याला घेऊन पलिष्ट्यांशी लढण्यास गेला आणि तो थकून गेला.
- 2 शमुवेल २१:१६सुमारे इ.स.पू. १०१८
इशबी-बेनोब नावाचा राफाह वंशातील एक पुरुष, ज्याचा कास्याचा भाला तीनशे शेकेल वजनाचा होता आणि तो नवीन तलवार घेऊन सज्ज होत म्हणाला, की तो दावीदाला जिवे मारेल.
- 2 शमुवेल २१:१७सुमारे इ.स.पू. १०१८
परंतु जेरुइयाहचा पुत्र अबीशाई दावीदाचा बचाव करण्यासाठी आला; त्याने त्या पलिष्ट्यावर हल्ला केला आणि त्याला ठार मारले. तेव्हा दावीदाच्या लोकांनी दावीदाला शपथ घेत सांगितले, “येथून पुढे पुन्हा आपण आमच्याबरोबर युद्धासाठी येणार नाही, म्हणजे इस्राएलचा दिवा विझणार नाही.”