- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 2 शमुवेल १९:१२सुमारे इ.स.पू. १०२३
तुम्ही माझे नातेवाईक आहात, माझ्या हाडामांसाचे आहात. तेव्हा राजाला परत आणण्यास तुम्ही मागे का असावे?’
- 2 शमुवेल १९:१३सुमारे इ.स.पू. १०२३
आणि अमासाला असे म्हणा, ‘तू माझ्या हाडामांसाचा नाहीस काय? योआबाच्या जागी तू माझ्या सैन्याचा सेनापती झाला नाहीस तर परमेश्वर मला अधिक कठोर शिक्षा करो.’ ”
- 2 शमुवेल १९:१४सुमारे इ.स.पू. १०२३
अशाप्रकारे दावीदाने यहूदाह गोत्राच्या लोकांची मने जिंकून त्यांना एकमत केले. त्यांनी राजाकडे निरोप पाठवला, “तुम्ही आणि तुमची सर्व माणसे, परत या.”
- 2 शमुवेल १९:१५सुमारे इ.स.पू. १०२३
नंतर राजा परतला आणि यार्देनपर्यंत गेला. यहूदाहचे लोक गिलगाल येथे राजाला भेटण्यास आणि त्यांना यार्देनेच्या पार नेण्यास आले.
- 2 शमुवेल १९:१६सुमारे इ.स.पू. १०२३
यहूदीयाच्या लोकांबरोबर बहूरीम येथील बिन्यामीन गोत्रातील, गेराचा पुत्र शिमी हा सुद्धा घाईने दावीद राजाला भेटण्यासाठी गेला.
- 2 शमुवेल १९:१७सुमारे इ.स.पू. १०२३
त्याच्याबरोबर बिन्यामीन कुळातील एक हजार माणसे होती, त्याचप्रमाणे शौलाच्या घराचा कारभारी सीबा आणि त्याचे पंधरा पुत्र आणि वीस सेवक हे त्याच्याबरोबर होते. यार्देनेकडे जिथे राजा होता तिथे ते घाईने गेले.
- 2 शमुवेल १९:१८सुमारे इ.स.पू. १०२३
राजाच्या घराण्याला घेण्यासाठी आणि राजाला हवे त्याप्रमाणे करण्यास, ते नदीचे पात्र पार करून आले. जेव्हा गेराचा पुत्र शिमी यार्देन पार करून आला, तेव्हा त्याने राजासमोर दंडवत घातले.
- 2 शमुवेल १९:१९सुमारे इ.स.पू. १०२३
आणि तो राजाला म्हणाला, “माझ्या स्वामीने माझा दोष मोजू नये. माझ्या स्वामीने ज्या दिवशी यरुशलेम सोडले, तेव्हा आपल्या दासाने केलेल्या वाईट कृत्याचे आपण स्मरण करू नये. राजाने ते आपल्या मनातून काढून टाकावे.
- 2 शमुवेल १९:२०सुमारे इ.स.पू. १०२३
कारण आपल्या सेवकाला (म्हणजे मला) माहीत आहे की, मी पाप केले आहे, परंतु आज योसेफाच्या गोत्रातील मी पहिलाच माझ्या स्वामीस भेटावयास आलो आहे.”
- 2 शमुवेल १९:२१सुमारे इ.स.पू. १०२३
तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई म्हणाला, “शिमीने याहवेहच्या अभिषिक्ताला शाप दिला यामुळे शिमीला जिवे मारावे की नाही?”
- 2 शमुवेल १९:२२सुमारे इ.स.पू. १०२३
तेव्हा दावीद म्हणाला, “जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला त्याचे काय? तुम्हाला लुडबुड करण्याचा अधिकार कोणी दिला? इस्राएलमध्ये आज कोणाचा मृत्यू व्हावा काय? आज मी इस्राएलचा राजा आहे हे मला समजत नाही काय?”
- 2 शमुवेल १९:२३सुमारे इ.स.पू. १०२३
तेव्हा राजाने शिमीला म्हटले, “तू मरणार नाहीस.” आणि राजाने त्याला शपथ घेऊन अभिवचन दिले.
- 2 शमुवेल १९:२४सुमारे इ.स.पू. १०२३
शौलाचा नातू, मेफीबोशेथ सुद्धा राजाला भेटण्यास गेला. राजा यरुशलेम सोडून गेल्यापासून सुरक्षित परत येईपर्यंत त्याने आपल्या पायांची काळजी घेतली नव्हती, किंवा दाढी केली नव्हती किंवा कपडे धुतले नव्हते.
- 2 शमुवेल १९:२५सुमारे इ.स.पू. १०२३
जेव्हा तो यरुशलेमातून राजाला भेटायला आला, त्याला राजाने विचारले, “मेफीबोशेथ, तू माझ्याबरोबर का आला नाहीस?”
- 2 शमुवेल १९:२६सुमारे इ.स.पू. १०२३
तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी आपला सेवक अपंग आहे, मी म्हणालो, ‘मी माझ्या गाढवावर खोगीर घालून त्यावर बसून माझ्या राजाबरोबर जाईन.’ परंतु माझा सेवक सीबा याने मला फसविले.
- 2 शमुवेल १९:२७सुमारे इ.स.पू. १०२३
परंतु त्याने आपल्या सेवकाविषयी माझ्या स्वामीला खोटे सांगितले. माझे स्वामी तर परमेश्वराच्या दूताप्रमाणे आहेत; म्हणून आपणास जे योग्य वाटेल ते आपण करावे.
- 2 शमुवेल १९:२८सुमारे इ.स.पू. १०२३
माझ्या आजोबांचे सर्व वारसदार माझ्या स्वामीकडून मरणास पात्र होते, परंतु आपण आपल्या सेवकाला आपल्या मेजावर बसणार्यांसह पंक्तीस बसविले. त्यामुळे राजासमोर आणखी काही विनंती करण्याचा मला काय अधिकार आहे?”
- 2 शमुवेल १९:२९सुमारे इ.स.पू. १०२३
राजाने त्याला म्हटले, “आणखी काही का बोलावे? माझी आज्ञा आहे की तू व सीबाने जमीन वाटून घ्यावी.”
- 2 शमुवेल १९:३०सुमारे इ.स.पू. १०२३
मेफीबोशेथ राजाला म्हणाला, “ती सर्व जमीन सीबालाच देऊन टाका, आता माझे स्वामी सुखरुप आले आहे.”
- 2 शमुवेल १९:३१सुमारे इ.स.पू. १०२३
बारजिल्लई गिलआदी हा सुद्धा रोगलीम येथून दावीद राजाबरोबर यार्देन पार करून देण्यास आणि तिथून त्यांना त्यांच्या मार्गी लावण्यास आला होता.
- 2 शमुवेल १९:३२सुमारे इ.स.पू. १०२३
बारजिल्लई फार उतार वयाचा झाला होता, तो ऐंशी वर्षाचा होता. महनाईम येथे असताना त्याने राजाला सामुग्री पुरविली होती, कारण तो फार धनवान मनुष्य होता.
- 2 शमुवेल १९:३३सुमारे इ.स.पू. १०२३
राजाने बारजिल्लईस म्हटले, “माझ्याबरोबर पार चल आणि यरुशलेममध्ये माझ्याजवळ राहा आणि मी तुझे पालनपोषण करेन.”
- 2 शमुवेल १९:३४सुमारे इ.स.पू. १०२३
पण बारजिल्लईने राजाला उत्तर दिले, “मी अजून किती वर्षे जगणार, की मी राजाबरोबर यरुशलेमास जावे?
- 2 शमुवेल १९:३५सुमारे इ.स.पू. १०२३
मी ऐंशी वर्षाचा आहे. कोणत्या गोष्टी मला आनंद देतील आणि कोणत्या नाही यातील फरक मला सांगता येईल काय? आपला सेवक जे काही खातो किंवा पितो याची चव तरी त्याला कळते काय? गाणारे पुरुष किंवा स्त्रियांचा आवाज मला अजूनही ऐकायला येतो काय? माझ्या स्वामीला त्यांचा सेवक एक ओझे म्हणून का असावा?
- 2 शमुवेल १९:३६सुमारे इ.स.पू. १०२३
आपला सेवक काही अंतरापर्यंत आपणाबरोबर यार्देन नदी पार करेल, पण राजाने मला त्याचा मोबदला याप्रकारे का द्यावा?