मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 शमुवेल १७:२४सुमारे इ.स.पू. १०२३

    नंतर दावीद महनाईम येथे गेला आणि अबशालोम सर्व इस्राएली सैन्यासह यार्देन पार करून गेला.

  2. 2 शमुवेल १७:२५सुमारे इ.स.पू. १०२३

    अबशालोमने योआबाच्या जागी अमासाची सेनापती म्हणून नेमणूक केली. अमासा हा इथ्रा इश्माएली याचा पुत्र असून, नाहाशाची कन्या, जेरुइयाहची बहीण योआबाची आई अबीगईलशी त्याचा विवाह झाला होता.

  3. 2 शमुवेल १७:२६सुमारे इ.स.पू. १०२३

    अबशालोम व इस्राएली सैन्याने गिलआद देशात तळ दिला.

  4. 2 शमुवेल १७:२७सुमारे इ.स.पू. १०२३

    दावीद जेव्हा महनाईम येथे पोहोचला, तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बाह येथील नाहाशाचा पुत्र शोबाई आणि लो-देबार येथील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील गिलआदी बारजिल्लई यांनी

  5. 2 शमुवेल १७:२८सुमारे इ.स.पू. १०२३

    दावीद आणि त्याच्या लोकांसाठी बिछाने आणि पात्रे, मातीची भांडी आणली. त्यांना खाण्यासाठी गहू व जव, पीठ आणि भाजलेली धान्ये, शेंगा व डाळी,

  6. 2 शमुवेल १७:२९सुमारे इ.स.पू. १०२३

    मध व दही, मेंढरे आणि गाईच्या दुधाचा खवा, हे सुद्धा आणले. कारण ते म्हणाले, “रानात दावीद आणि त्याचे लोक थकलेले, भुकेले व तहानलेले झाले असतील.”

  7. 2 शमुवेल १८:१सुमारे इ.स.पू. १०२३

    दावीदाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना एकत्र करून त्यांची मोजणी केली आणि त्यांच्या हजारांवर सेनापती आणि शंभरांवर सेनापती नेमले.

  8. 2 शमुवेल १८:२सुमारे इ.स.पू. १०२३

    दावीदाने एकतृतीयांश लोक योआबाच्या हाताखाली, एकतृतीयांश सैन्य योआबाचा भाऊ, जेरुइयाहचा पुत्र अबीशाईच्या हाताखाली आणि एकतृतीयांश इत्तय गित्तीच्या हाताखाली असे आपले सैन्य पाठवले. राजाने सैन्यास सांगितले, “मी स्वतः अवश्य तुम्हाबरोबर चालत जाईन.”

  9. 2 शमुवेल १८:३सुमारे इ.स.पू. १०२३

    परंतु लोकांनी म्हटले, “तुम्ही बाहेर जाऊ नये; जर आम्हाला पळून जावे लागले, तरी त्यांना आमचे काही वाटणार नाही. जरी आमच्यातील अर्धे लोक मरण पावले, त्याचीही त्यांना काळजी वाटणार नाही; परंतु तुमचे मोल आमच्यातील दहा हजारांप्रमाणे आहे. तुम्ही आम्हाला शहरात राहूनच पाठिंबा दिला तर ते उत्तम होईल.”

  10. 2 शमुवेल १८:४सुमारे इ.स.पू. १०२३

    राजाने उत्तर दिले, “तुम्हाला जे योग्य वाटते तेच मी करेन.” म्हणून राजा वेशीजवळ उभे राहिला आणि त्यांचे सर्व सैनिक शंभराच्या व हजारांच्या टोळीने बाहेर पडले.

  11. 2 शमुवेल १८:५सुमारे इ.स.पू. १०२३

    राजाने योआब, अबीशाई व इत्तय यांना आज्ञा दिली, “माझ्यासाठी त्या तरुण अबशालोमशी सौम्यतेने वागा.” राजाने अबशालोमविषयी प्रत्येक सेनापतीला दिलेली ही आज्ञा सर्व सैनिकांनी ऐकली.

  12. 2 शमुवेल १८:६सुमारे इ.स.पू. १०२३

    दावीदाचे सैनिक इस्राएलशी युद्ध करण्यास शहराच्या बाहेर पडले आणि एफ्राईमच्या जंगलात युद्धास सुरुवात झाली.

  13. 2 शमुवेल १८:७सुमारे इ.स.पू. १०२३

    दावीदाच्या सैन्यापुढे इस्राएली सैन्याचा मोड झाला आणि त्या दिवशी वीस हजार लोक मरण पावले.

  14. 2 शमुवेल १८:८सुमारे इ.स.पू. १०२३

    संपूर्ण देशभर युद्ध पसरले, त्या दिवशी तलवारीपेक्षा घनदाट जंगलामुळे अधिक लोकांचा मृत्यू झाला.

  15. 2 शमुवेल १८:९सुमारे इ.स.पू. १०२३

    यावेळी अचानक अबशालोमची दावीदाच्या माणसांशी गाठ पडली. तो त्याच्या खेचरावर बसून जात असता, खेचर एका मोठ्या एला झाडाच्या दाट फांद्यांखालून गेले आणि अबशालोमचे केस त्यात अडकले. तो हवेत लटकत राहिला आणि त्याचे खेचर ज्यावर तो बसला होता ते पुढे चालत राहिले.

  16. 2 शमुवेल १८:१०सुमारे इ.स.पू. १०२३

    जेव्हा दावीदाच्या एका मनुष्याने जे झाले ते पाहिले व त्याने ते योआबाला सांगितले, “अबशालोमला एलाच्या झाडाला लटकत असलेले मी पाहिले.”

  17. 2 शमुवेल १८:११सुमारे इ.स.पू. १०२३

    ज्या मनुष्याने त्याला हे सांगितले, त्याला योआब म्हणाला, “काय! तू त्याला पाहिले? तू त्याला तिथेच मारून जमिनीवर का पाडले नाही? मी तुला चांदीची दहा शेकेल आणि योद्ध्याचा कंबरपट्टा दिला असता.”

  18. 2 शमुवेल १८:१२सुमारे इ.स.पू. १०२३

    पण त्या मनुष्याने योआबाला उत्तर दिले, “जरी माझ्या हातावर चांदीची हजार शेकेल वजन करून ठेवली, तरी मी राजपुत्रावर हात टाकणार नाही. कारण राजाने तुला, अबीशाईला व इत्तयला आज्ञा देताना आम्ही असे ऐकले की, ‘माझ्यासाठी तरुण अबशालोमचे रक्षण करा.’

  19. 2 शमुवेल १८:१३सुमारे इ.स.पू. १०२३

    आणि असे करून जरी मी माझा जीव धोक्यात घातला असता; तरी राजापासून काही गुप्त राहत नाही; आणि तू सुद्धा माझ्यापासून दूर राहिला असता.”

  20. 2 शमुवेल १८:१४सुमारे इ.स.पू. १०२३

    योआब म्हणाला, “मी असा तुझ्यासाठी थांबणार नाही.” असे म्हणत त्याने आपल्या हाती तीन भाले घेतले आणि अबशालोम एलाच्या झाडाला अजूनही जिवंत असा लटकलेला असताना त्याने त्याच्या छातीत ते भोसकले.

  21. 2 शमुवेल १८:१५सुमारे इ.स.पू. १०२३

    त्यानंतर योआबाचे दहा शस्त्रवाहक अबशालोमच्या सभोवती जमले, त्याच्यावर वार केला आणि त्याला मारून टाकले.

  22. 2 शमुवेल १८:१६सुमारे इ.स.पू. १०२३

    नंतर योआबाने रणशिंग फुंकले, तेव्हा सैनिकांनी इस्राएलचा पाठलाग करण्याचे थांबविले, कारण योआबाने त्यांना थांबविले.

  23. 2 शमुवेल १८:१७सुमारे इ.स.पू. १०२३

    त्यांनी अबशालोमला घेऊन, जंगलात एका खड्ड्यात फेकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली, त्या दरम्यान सर्व इस्राएली लोक आपआपल्या घरी पळून गेले.

  24. 2 शमुवेल १८:१८सुमारे इ.स.पू. १०२३

    अबशालोमने आपल्या कारकिर्दीत राजाच्या खोर्‍यात स्वतःच्या स्मरणार्थ एक स्तंभ उभारला. कारण तो स्वतःशी म्हणाला, “माझे नाव पुढे चालविण्यासाठी मला पुत्र नाही.” म्हणून त्याने त्या स्तंभाला अबशालोमचे स्मारक असे नाव दिले होते. आजही ते त्याच नावाने ओळखले जाते.

  25. 2 शमुवेल १८:१९सुमारे इ.स.पू. १०२३

    तेव्हा सादोकाचा पुत्र अहीमाज म्हणाला, “मी धावत जाऊन राजाला ही बातमी द्यावी, की याहवेहने राजाला त्यांच्या शत्रूच्या हातून सोडवून मुक्ती दिली आहे.”