मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 शमुवेल १५:३४सुमारे इ.स.पू. १०२१

    तर तू परत शहराकडे जा आणि अबशालोमास म्हण, ‘महाराज, मी आपला सेवक होईन; आधी मी तुमच्या पित्याचा सेवक होतो, परंतु आता मी तुमचा सेवक होईन,’ असे केल्यास अहीथोफेलचा सल्ला निष्फळ करून तू मला मदत करशील.

  2. 2 शमुवेल १५:३५सुमारे इ.स.पू. १०२१

    सादोक याजक व अबीयाथार हे तिथे तुझ्याबरोबर असणार नाहीत काय? तू जे काही राजाच्या राजवाड्यात ऐकशील ते जाऊन त्यांना सांग.

  3. 2 शमुवेल १५:३६सुमारे इ.स.पू. १०२१

    त्यांचे दोन पुत्र, सादोकचा पुत्र अहीमाज व अबीयाथारचा पुत्र योनाथान त्यांच्याबरोबर आहेत. जे काही तू ऐकशील ते मला सांगण्यास त्यांना माझ्याकडे पाठव.”

  4. 2 शमुवेल १५:३७सुमारे इ.स.पू. १०२१

    तेव्हा अबशालोम शहरात प्रवेश करीत असताना, दावीदाचा मित्र हूशाई यरुशलेमात पोहोचला.

  5. 2 शमुवेल १६:१सुमारे इ.स.पू. १०२३

    जेव्हा दावीद डोंगराच्या माथ्यावर काही अंतरावर गेला, तिथे मेफीबोशेथचा कारभारी सीबा त्याला भेटण्यासाठी तिथे वाट पाहत होता. त्याच्याकडे खोगीर घातलेली गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, मनुक्यांच्या शंभर ढेपा, अंजिराच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा एक बुधला होता.

  6. 2 शमुवेल १६:२सुमारे इ.स.पू. १०२३

    राजाने सीबाला विचारले, “हे तू का आणले आहेस?” सीबाने उत्तर दिले, “गाढवे राजघराण्यातील लोकांना बसण्यासाठी, भाकरी आणि फळे लोकांना खाण्यासाठी आणि हा द्राक्षारस रानातून जाताना जे कोणी थकून जातात त्यांना ताजेतवाने करण्यासाठी.”

  7. 2 शमुवेल १६:३सुमारे इ.स.पू. १०२३

    तेव्हा राजाने विचारले, “तुझ्या धन्याचा नातू कुठे आहे?” सीबा त्याला म्हणाला, “तो यरुशलेमात राहत आहे, कारण त्याला असे वाटते, ‘इस्राएलचे लोक मला माझ्या आजोबांचे राज्य आज परत मिळवून देतील.’ ”

  8. 2 शमुवेल १६:४सुमारे इ.स.पू. १०२३

    तेव्हा राजा सीबाला म्हणाला, “मेफीबोशेथच्या मालकीचे जे सर्व आहे ते आता तुझे आहे.” सीबा म्हणाला, “मी विनम्र अभिवादन करतो, माझ्या स्वामीची माझ्यावर कृपादृष्टी असो.”

  9. 2 शमुवेल १६:५सुमारे इ.स.पू. १०२३

    दावीद राजा बहूरीमजवळ पोहोचताच, एक मनुष्य बाहेर आला, जो शौलाच्या घराण्यातील एका कुळातील होता. त्याचे नाव शिमी होते, तो गेराचा पुत्र होता, तो बाहेर येताच शाप देऊ लागला.

  10. 2 शमुवेल १६:६सुमारे इ.स.पू. १०२३

    त्याने दावीद व राजाच्या सर्व अधिकार्‍यांवर धोंडमार केली, सर्व सैन्यदल व विशेष अंगरक्षक दावीदाच्या उजव्या व डाव्या बाजूंना होते.

  11. 2 शमुवेल १६:७सुमारे इ.स.पू. १०२३

    शाप देत शिमी म्हणाला, “निघून जा, अरे तू खुनी, हलकट मनुष्या, चालता हो!

  12. 2 शमुवेल १६:८सुमारे इ.स.पू. १०२३

    ज्याच्या जागी तू राज्य केलेस त्या शौलाच्या घराण्याचा जो रक्तपात तू केला त्याचा मोबदला याहवेह तुला देत आहेत. आता याहवेहने ते राज्य तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती दिले आहे. तू खुनी आहेस म्हणून तू नाशास येऊन ठेपला आहेस!”

  13. 2 शमुवेल १६:९सुमारे इ.स.पू. १०२३

    तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीला का शाप द्यावा? मला त्याच्याकडे जाऊन त्याचा शिरच्छेद करू द्या.”

  14. 2 शमुवेल १६:१०सुमारे इ.स.पू. १०२३

    परंतु राजा म्हणाला, “अहो जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला याचे काय? याहवेहनेच जर त्याला सांगितले असले, ‘दावीदाला शाप दे,’ तर ‘तू असे का करतोस,’ असे त्याला कोणी विचारावे?”

  15. 2 शमुवेल १६:११सुमारे इ.स.पू. १०२३

    तेव्हा दावीद अबीशाई व त्याच्या सर्व अधिकार्‍यांना म्हणाला, “माझा पुत्र, माझे स्वतःचे रक्त-मांस मला मारून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, तर हा बिन्यामीन किती अधिक करेल! त्याला जाऊ द्या; व शाप देऊ द्या, कारण याहवेहने त्याला तसे करण्यास सांगितले आहे.

  16. 2 शमुवेल १६:१२सुमारे इ.स.पू. १०२३

    मला होत असलेल्या त्रासाकडे कदाचित याहवेह पाहतील आणि या शापाऐवजी मी गमावलेला त्यांच्या कराराचा आशीर्वाद मला मिळवून देतील.”

  17. 2 शमुवेल १६:१३सुमारे इ.स.पू. १०२३

    दावीद आणि त्याची माणसे त्यांच्या वाटेने पुढे जात राहिले आणि शिमी त्यांच्या समोरच्या टेकडीकडून, दावीदाला शाप देत, त्याच्यावर दगडफेक करीत व त्याच्यावर धूळ उधळत चालत होता.

  18. 2 शमुवेल १६:१४सुमारे इ.स.पू. १०२३

    राजा व त्याच्या बरोबरचे सर्व लोक थकलेले त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले आणि तिथे त्याने विसावा घेतला.

  19. 2 शमुवेल १६:१५सुमारे इ.स.पू. १०२३

    त्या दरम्यान अबशालोम व इस्राएलचे सर्व लोक यरुशलेमास आले आणि अहीथोफेल त्याच्याबरोबर होता.

  20. 2 शमुवेल १६:१६सुमारे इ.स.पू. १०२३

    तेव्हा दावीदाचा मित्र हूशाई अर्की अबशालोमकडे गेला व त्याला म्हणाला, “राजा चिरायू होवो! राजा चिरायू होवो!”

  21. 2 शमुवेल १६:१७सुमारे इ.स.पू. १०२३

    अबशालोमने हूशाईला विचारले, “तुझ्या मित्रावर तू अशीच प्रीती दाखवितोस काय? तो जर तुझा मित्र आहे, तर तू त्याच्याबरोबर का गेला नाहीस?”

  22. 2 शमुवेल १६:१८सुमारे इ.स.पू. १०२३

    हूशाई अबशालोमला म्हणाला, “नाही, याहवेहने आणि या लोकांनी, आणि सर्व इस्राएलच्या लोकांनी ज्याला निवडले आहे; मी त्याचा आहे आणि मी त्याच्याबरोबर राहणार.

  23. 2 शमुवेल १६:१९सुमारे इ.स.पू. १०२३

    आणि मी कोणाची सेवा करावी? जशी मी आपल्या पित्याची सेवा केली तशीच मी त्यांच्या पुत्राची करू नये काय? म्हणून मी तुमची सेवा करणार.”

  24. 2 शमुवेल १६:२०सुमारे इ.स.पू. १०२३

    अबशालोम अहीथोफेलला म्हणाला, “आम्हाला तुझा सल्ला दे, आम्ही काय करावे?”

  25. 2 शमुवेल १६:२१सुमारे इ.स.पू. १०२३

    अहीथोफेलने अबशालोमास सल्ला दिला, “तुझ्या पित्याच्या उपपत्नी, ज्यांना तो राजवाड्याच्या देखरेखीसाठी सोडून गेला त्यांच्यापाशी जाऊन नीज. तेव्हा सर्व इस्राएलास समजेल की तू तुझ्या पित्याची किती घृणा करतो आणि तुझ्याबरोबर काम करीत असलेल्या प्रत्येकाचा हात बळकट होईल.”