मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 शमुवेल १४:१७सुमारे इ.स.पू. १०२७

    “आणि आता आपली सेविका म्हणते की, ‘माझ्या राजाचा, स्वामीचा शब्द माझे वतन सुरक्षित ठेवो, कारण माझ्या धनीराजाला परमेश्वराच्या दूतासारखी चांगले आणि वाईट याची ओळख आहे. याहवेह आपला परमेश्वर आपल्याबरोबर असो.’ ”

  2. 2 शमुवेल १४:१८सुमारे इ.स.पू. १०२७

    तेव्हा राजा त्या स्त्रीला म्हणाला, “तुला मी जे काही विचारणार आहे, त्याचे उत्तर माझ्यापासून लपवू नकोस.” ती स्त्री म्हणाली, “माझ्या धनीराजाने बोलावे.”

  3. 2 शमुवेल १४:१९सुमारे इ.स.पू. १०२७

    राजाने विचारले, “या सर्व गोष्टींमध्ये योआबाचा हात नाही काय?” त्या स्त्रीने उत्तर दिले, “माझ्या धनीराजाच्या जीविताची शपथ, माझे धनीराजा जे सांगतात त्यापासून कोणीही उजवी किंवा डावीकडे वळू शकत नाही. होय, तो आपला सेवक योआब होता ज्याने मला हे करण्यास सुचविले व आपल्या सेविकेच्या मुखात शब्द घातले.

  4. 2 शमुवेल १४:२०सुमारे इ.स.पू. १०२७

    आपला सेवक योआब याने सध्याची परिस्थिती बदलावी म्हणून असे केले. माझ्या धनीराजाला परमेश्वराच्या दूताप्रमाणे ज्ञान आहे; देशात जे काही घडते ते सर्व आपणास ठाऊक आहे.”

  5. 2 शमुवेल १४:२१सुमारे इ.स.पू. १०२७

    तेव्हा राजाने योआबाला म्हटले, “ठीक आहे, मी त्याप्रमाणे करेन, जा आणि त्या तरुण अबशालोमास परत घेऊन ये.”

  6. 2 शमुवेल १४:२२सुमारे इ.स.पू. १०२७

    योआबाने राजाला सन्मान व आशीर्वाद देण्यासाठी भूमीकडे तोंड करून दंडवत घातले. योआब म्हणाला, “आज आपल्या सेवकास समजले की त्याच्या धनीराजाच्या नजरेत तो कृपा पावला आहे, कारण राजाने आपल्या सेवकाची विनंती मान्य केली आहे.”

  7. 2 शमुवेल १४:२३सुमारे इ.स.पू. १०२७

    मग योआबाने गशूरला जाऊन अबशालोमला यरुशलेमास परत आणले.

  8. 2 शमुवेल १४:२४सुमारे इ.स.पू. १०२७

    तेव्हा राजाने म्हटले, “त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे, त्याने माझे मुख पाहू नये.” म्हणून अबशालोम आपल्या स्वतःच्या घरी जाऊन राहिला व त्याने राजाचे मुख पाहिले नाही.

  9. 2 शमुवेल १४:२५सुमारे इ.स.पू. १०२७

    सर्व इस्राएलात सुंदरतेविषयी प्रशंसनीय असा अबशालोमसारखा कोणी नव्हता. डोक्याच्या माथ्यापासून तळपायापर्यंत त्याच्या ठायी काही दोष नव्हता.

  10. 2 शमुवेल १४:२६सुमारे इ.स.पू. १०२७

    वर्षातून एकदा तो आपल्या डोक्यावरील केस कापत असे कारण ते त्याच्यासाठी फार भारी होत असत. जेव्हा तो केस कापीत असे; त्याचे वजन केले जात असे, आणि राजकीय मापानुसार त्याचे वजन दोनशे शेकेल इतके भरत असे.

  11. 2 शमुवेल १४:२७सुमारे इ.स.पू. १०२७

    अबशालोमास तीन पुत्र व एक कन्या झाली. त्याच्या कन्येचे नाव तामार होते. ती फार सुंदर होती.

  12. 2 शमुवेल १४:२८सुमारे इ.स.पू. १०२७

    अबशालोम यरुशलेमात राजाचे मुख न पाहता दोन वर्षे राहिला.

  13. 2 शमुवेल १४:२९सुमारे इ.स.पू. १०२७

    तेव्हा योआबाला राजाकडे पाठवावे म्हणून अबशालोमाने योआबाला बोलाविणे पाठवले, परंतु योआबाने त्याच्याकडे येण्यास नकार दिला. त्याने दुसर्‍यांदा बोलाविणे पाठवले, परंतु पुन्हा योआबाने येण्यास नकार दिला.

  14. 2 शमुवेल १४:३०सुमारे इ.स.पू. १०२७

    तेव्हा अबशालोम आपल्या सेवकांस म्हणाला, “पाहा, योआबाचे शेत माझ्या शेताला लागून आहे, त्यात त्याने जव लावले आहे. जा आणि त्याला आग लावा.” त्याप्रमाणे अबशालोमच्या सेवकांनी शेताला आग लावली.

  15. 2 शमुवेल १४:३१सुमारे इ.स.पू. १०२७

    नंतर योआब अबशालोमच्या घरी गेला, आणि त्याला म्हणाला, “तुझ्या सेवकांनी माझ्या शेताला का आग लावली?”

  16. 2 शमुवेल १४:३२सुमारे इ.स.पू. १०२७

    अबशालोम योआबाला म्हणाला, “पाहा, मी तुला बोलाविणे पाठवित म्हटले, ‘येथे ये म्हणजे मी तुला राजाकडे हे विचारण्यास पाठवेन, “गशूरहून मी का आलो? मी अजूनही तिथेच असतो तर ते माझ्यासाठी बरे झाले असते!” ’ तर आता मला राजाला भेटावयाचे आहे, जर माझ्याठायी काही दोष असेल, तर त्यांनी मला जिवे मारावे.”

  17. 2 शमुवेल १४:३३सुमारे इ.स.पू. १०२५

    तेव्हा योआबाने राजाकडे जाऊन हे सर्व सांगितले. मग राजाने अबशालोमला बोलावून घेतले आणि तो आला व राजापुढे भूमीकडे लवून दंडवत घातले आणि राजाने अबशालोमचे चुंबन घेतले.

  18. 2 शमुवेल १५:१सुमारे इ.स.पू. १०२४

    त्यानंतरच्या काळात, अबशालोमने स्वतःसाठी एक रथ आणि घोडे आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे ठेवली.

  19. 2 शमुवेल १५:२सुमारे इ.स.पू. १०२४

    तो सकाळी लवकर उठत असे आणि शहराच्या वेशीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला थांबत असे. जेव्हा कोणी राजाकडे तक्रार आणत असे तेव्हा अबशालोम त्याला बोलावून विचारत असे, “तू कोणत्या नगराचा आहेस?” तो उत्तर देत असे, “आपला सेवक इस्राएलातील गोत्रांपैकी एका गोत्राचा आहे.”

  20. 2 शमुवेल १५:३सुमारे इ.स.पू. १०२४

    तेव्हा अबशालोम त्याला म्हणत असे, “पाहा, तुझे दावे कायदेशीर आणि यथायोग्य आहेत, परंतु तुझे ऐकण्यासाठी राजाचा कोणीही प्रतिनिधी तिथे नाही.”

  21. 2 शमुवेल १५:४सुमारे इ.स.पू. १०२४

    अबशालोम आणखी असेही म्हणे, “जर या देशात न्यायाधीश म्हणून माझी नेमणूक झाली! तर प्रत्येकजण ज्याची काही तक्रार किंवा खटला आहे तो माझ्याकडे आला असता व मी त्यांना न्याय मिळवून दिला असता.”

  22. 2 शमुवेल १५:५सुमारे इ.स.पू. १०२४

    जेव्हा कोणी खाली लवून मुजरा करावयाला जवळ आला, तेव्हा अबशालोम पुढे जाऊन त्याचा हात पकडून त्याचे चुंबन घेत असे.

  23. 2 शमुवेल १५:६सुमारे इ.स.पू. १०२४

    जे कोणी राजाकडे न्याय मागण्यासाठी येत असत त्या सर्वांशी अबशालोम असा वागत असे, अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांची मने जिंकून घेतली.

  24. 2 शमुवेल १५:७सुमारे इ.स.पू. १०२१

    चार वर्षे पूर्ण झाल्यावर, अबशालोम राजाला म्हणाला, “मला हेब्रोन येथे जाऊ द्यावे म्हणजे मी याहवेहला केलेला आपला नवस फेडीन.

  25. 2 शमुवेल १५:८सुमारे इ.स.पू. १०२१

    आपला सेवक अराम येथील गशूर या ठिकाणी राहत असताना मी हा नवस केला होता: ‘जर याहवेह मला परत यरुशलेमास घेऊन जातील, तर मी हेब्रोन येथे याहवेहची उपासना करेन.’ ”