- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 2 शमुवेल १३:३१सुमारे इ.स.पू. १०३०
तेव्हा राजा उभा राहिला, आपली वस्त्रे फाडली आणि जमिनीवर पडून राहिला; आणि त्याचे सर्व सेवक त्यांची वस्त्रे फाडून राजाच्या बाजूला उभे राहिले.
- 2 शमुवेल १३:३२सुमारे इ.स.पू. १०३०
परंतु दावीदाचा भाऊ शिमिआह याचा पुत्र योनादाब म्हणाला “सर्वच राजपुत्रांना मारून टाकले आहे असा माझ्या धन्याने विचार करू नये; केवळ अम्नोन मरण पावला आहे. कारण अम्नोनाने त्याची बहीण तामार हिच्यावर बलात्कार केला होता, तेव्हापासून अबशालोमाने हा निश्चय केला होता.
- 2 शमुवेल १३:३३सुमारे इ.स.पू. १०३०
माझ्या धनीराजाने या वृत्तांताबाबतीत काळजी करू नये की, राजाची सर्व मुले मरण पावली आहेत. केवळ अम्नोन मरण पावला आहे.”
- 2 शमुवेल १३:३४सुमारे इ.स.पू. १०३०
तोपर्यंत अबशालोम पळून गेला होता. पहार्यावर असलेल्या मनुष्याने वर दृष्टी करून पाहिले आणि त्याला रस्त्याच्या पश्चिमेकडून डोंगरावरून खाली पुष्कळ लोक येताना दिसले. पहारेकर्याने जाऊन राजाला सांगितले, “होरोनाइमच्या दिशेकडे डोंगराच्या वरील बाजूला मला लोक दिसत आहेत.”
- 2 शमुवेल १३:३५सुमारे इ.स.पू. १०३०
योनादाब राजाला म्हणाला, “पाहा, राजपुत्र आले आहेत; तुमचा सेवक जसे म्हणाला तसेच घडले आहे.”
- 2 शमुवेल १३:३६सुमारे इ.स.पू. १०३०
त्याचे बोलणे संपताच, राजाचे पुत्र मोठ्याने आक्रोश करीत आत आले. राजा आणि त्याचे सर्व सेवक मोठ्या दुःखाने रडले.
- 2 शमुवेल १३:३७सुमारे इ.स.पू. १०३०
अबशालोम तिथून पळाला आणि अम्मीहूदाचा पुत्र, गशूरचा राजा तलमय याच्याकडे गेला. परंतु दावीद राजाने आपल्या पुत्रासाठी पुष्कळ दिवस शोक केला.
- 2 शमुवेल १३:३८सुमारे इ.स.पू. १०३०
अबशालोम तिथून पळून गशूरकडे गेला व तिथे तीन वर्ष राहिला.
- 2 शमुवेल १३:३९सुमारे इ.स.पू. १०३०
आणि दावीद राजाला अबशालोमकडे जाण्याची इच्छा झाली, कारण अम्नोनाच्या मृत्यूबद्दल त्याचे सांत्वन झाले होते.
- 2 शमुवेल १४:१सुमारे इ.स.पू. १०२७
जेरुइयाहचा पुत्र योआब याला माहीत होते की, अबशालोमला भेटावे असे राजाला मनापासून वाटते.
- 2 शमुवेल १४:२सुमारे इ.स.पू. १०२७
तेव्हा योआबाने कोणा एकाला तकोवा येथे पाठवले आणि तिथून एका शहाण्या स्त्रीला बोलावून आणले. तो तिला म्हणाला, “तू शोक करीत असल्याचे ढोंग कर. शोकवस्त्रे परिधान कर, आणि सुवासिक तेल अंगाला लावू नकोस. आणि पुष्कळ दिवसांपासून मृत व्यक्तीसाठी शोक करीत असल्याचे ढोंग कर.
- 2 शमुवेल १४:३सुमारे इ.स.पू. १०२७
मग राजाकडे जा आणि असे बोल.” आणि काय बोलावे ते योआबाने तिला सांगितले.
- 2 शमुवेल १४:४सुमारे इ.स.पू. १०२७
जेव्हा तकोवा येथून आलेली स्त्री राजाकडे गेली, राजाला सन्मान देण्यासाठी तिने तोंड भूमीकडे लवून दंडवत केले, आणि म्हणाली, “महाराज, माझी मदत करा!”
- 2 शमुवेल १४:५सुमारे इ.स.पू. १०२७
राजाने तिला विचारले, “तुला काय त्रास आहे?” ती म्हणाली, “मी विधवा आहे; माझा पती मरण पावला आहे.
- 2 शमुवेल १४:६सुमारे इ.स.पू. १०२७
आपल्या सेविकेला दोन मुले होती. शेतामध्ये ती दोघे भांडू लागली आणि ते भांडण मिटविण्यास तिथे कोणी नव्हते. एकाने दुसर्यावर वार केला आणि त्याला जिवे मारले.
- 2 शमुवेल १४:७सुमारे इ.स.पू. १०२७
आता संपूर्ण कुटुंब आपल्या सेविकेविरुद्ध उठले आहे; ते म्हणतात, ‘ज्याने त्याच्या भावाला मारले त्याला आमच्या हाती सोपवून दे, म्हणजे त्याच्या भावाच्या जिवाबद्दल ज्याला त्याने मारून टाकले त्याचा आम्ही नाश करू; म्हणजे जो वारस राहिला आहे त्याच्यापासूनसुद्धा आमची सुटका होईल.’ याप्रकारे जो माझा एकमात्र निखारा राहिलेला आहे, तो सुद्धा ते विझवतील, व या भूतलावर माझ्या पतीचे ना नाव ना वारस राहील.”
- 2 शमुवेल १४:८सुमारे इ.स.पू. १०२७
राजा त्या स्त्रीला म्हणाला, “घरी जा, आणि मी तुझ्याबाजूने आदेश देईन.”
- 2 शमुवेल १४:९सुमारे इ.स.पू. १०२७
परंतु तकोवाची ती स्त्री राजाला म्हणाली, “माझ्या धनीराजाने मला आणि माझ्या कुटुंबाला क्षमा करावी, आणि राजा आणि त्याचे सिंहासन निर्दोष असो.”
- 2 शमुवेल १४:१०सुमारे इ.स.पू. १०२७
राजाने उत्तर दिले, “तुला जर कोणी काही म्हटले, तर त्यांना माझ्याकडे घेऊन ये, आणि ते पुन्हा तुला त्रास देणार नाहीत.”
- 2 शमुवेल १४:११सुमारे इ.स.पू. १०२७
ती म्हणाली, “तर मग राजाने याहवेह आपल्या परमेश्वराला विनंती करावी, म्हणजे रक्ताचा सूड घेणार्याला हानी करण्यापासून प्रतिबंध करावा, म्हणजे माझ्या मुलाचा नाश होणार नाही.” तो म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, तुझ्या मुलाच्या डोक्यावरील एक केसही जमिनीवर पडणार नाही.”
- 2 शमुवेल १४:१२सुमारे इ.स.पू. १०२७
तेव्हा ती स्त्री म्हणाली, “आपल्या सेविकेला माझ्या धनीराजाशी एक शब्द बोलू द्यावा.” राजाने म्हटले, “बोल,”
- 2 शमुवेल १४:१३सुमारे इ.स.पू. १०२७
ती स्त्री म्हणाली, “तर मग परमेश्वराच्या लोकांविरुद्ध आपण अशी योजना का केली? जेव्हा राजा असे म्हणतो, कारण राजाने स्वतः घालवून दिलेल्या आपल्याच मुलाला परत आणले नाही, तेव्हा तो स्वतःलाच दोषी ठरवीत नाही का?
- 2 शमुवेल १४:१४सुमारे इ.स.पू. १०२७
जसे जमिनीवर सांडलेले पाणी पुन्हा गोळा करता येत नाही, तसेच आपणही मेले पाहिजे. परंतु परमेश्वराची तशी इच्छा नाही; तर घालवून दिलेला व्यक्ती कायमचा त्यांच्यापासून घालवून दिला जाऊ नये अशी योजना परमेश्वर करतात.
- 2 शमुवेल १४:१५सुमारे इ.स.पू. १०२७
“आणि आता मी माझ्या धनीराजाला हे सांगण्यासाठी आले आहे, कारण लोकांनी मला भयभीत केले आहे. आपल्या सेविकेने विचार केला, ‘मी राजाशी बोलेन; कदाचित ते आपल्या सेविकेची विनंती मान्य करतील.
- 2 शमुवेल १४:१६सुमारे इ.स.पू. १०२७
कदाचित, राजा त्यांच्या सेविकेला त्या माणसाच्या हातून सोडविण्यास मान्य होतील, जो मला आणि माझ्या मुलाला परमेश्वराच्या वतनापासून वंचित ठेवेल.’