- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 2 शमुवेल १३:६सुमारे इ.स.पू. १०३२
तेव्हा अम्नोन पडून राहिला आणि आजारी असल्याचे ढोंग केले. जेव्हा राजा त्याच्या भेटीस आला, तेव्हा अम्नोन त्याला म्हणाला, “माझी बहीण तामार हिने येऊन माझ्या दृष्टीसमोर विशेष भाकरी बनविल्या तर मला आवडेल, म्हणजे त्या मी तिच्या हातून खाईन.”
- 2 शमुवेल १३:७सुमारे इ.स.पू. १०३२
दावीदाने राजवाड्यात तामारकडे निरोप पाठवला: “तुझा भाऊ अम्नोन याच्या घरी जा आणि त्याच्यासाठी भोजन तयार कर.”
- 2 शमुवेल १३:८सुमारे इ.स.पू. १०३२
तेव्हा तामार तिचा भाऊ अम्नोनच्या घरी गेली, तो तर बिछान्यावर पडून होता. तिने थोडे पीठ घेतले, ते मळले, आणि त्याच्या दृष्टीसमोर भाकरी तयार केल्या आणि त्या भाजल्या.
- 2 शमुवेल १३:९सुमारे इ.स.पू. १०३२
नंतर तिने ताट घेतले आणि त्याला भाकर वाढली परंतु त्याने खाण्यास नकार दिला. अम्नोन म्हणाला, “प्रत्येकाला येथून बाहेर घालवून द्या.” तेव्हा प्रत्येकजण त्याच्यापासून निघून गेले.
- 2 शमुवेल १३:१०सुमारे इ.स.पू. १०३२
नंतर अम्नोन तामारला म्हणाला, “भाकरी माझ्या झोपण्याच्या खोलीकडे घेऊन ये म्हणजे मी तुझ्या हाताने ती खाईन.” तेव्हा तिने बनविलेल्या भाकरी घेऊन तामार आपला भाऊ अम्नोनच्या खोलीकडे आली.
- 2 शमुवेल १३:११सुमारे इ.स.पू. १०३२
परंतु त्याने भाकरी खाव्या म्हणून जेव्हा ती भाकरी घेऊन त्याच्याजवळ गेली, तेव्हा त्याने तिला पकडले आणि म्हटले, “माझ्या बहिणी, माझ्याबरोबर पलंगावर ये.”
- 2 शमुवेल १३:१२सुमारे इ.स.पू. १०३२
ती त्याला म्हणाली, “नाही, माझ्या भावा! माझ्यावर जबरदस्ती करू नकोस! इस्राएलमध्ये अशी गोष्ट होऊ नये! अशी घृणास्पद गोष्ट करू नकोस.
- 2 शमुवेल १३:१३सुमारे इ.स.पू. १०३२
माझ्याबद्दल विचार कर, मी या बेअब्रू पासून कशी वाचेन? आणि तुझ्याबद्दल काय? इस्राएलमधील मूर्ख व दुष्टासारखा तू होशील? म्हणून कृपा करून राजाकडे बोलणे कर; ते मला तुझ्याशी लग्न करण्यापासून थांबविणार नाहीत.”
- 2 शमुवेल १३:१४सुमारे इ.स.पू. १०३२
परंतु त्याने तिचे ऐकण्यास नकार दिला आणि तो तिच्यापेक्षा बलवान असल्यामुळे त्याने तिच्यावर बलात्कार केला.
- 2 शमुवेल १३:१५सुमारे इ.स.पू. १०३२
नंतर अम्नोनाला तिचा तीव्र तिरस्कार वाटू लागला. वास्तविकता त्याने तिच्यावर जितके प्रेम केले होते, त्यापेक्षाही त्याला अधिक तिचा तिरस्कार वाटला. नंतर अम्नोन तिला म्हणाला, “ऊठ आणि चालती हो!”
- 2 शमुवेल १३:१६सुमारे इ.स.पू. १०३२
“नाही!” ती त्याला म्हणाली, “तू मला पाठवून देणे हे, जे वाईट कृत्य तू आधी केले आहे त्यापेक्षाही भयंकर आहे.” परंतु तो तिचे ऐकेना.
- 2 शमुवेल १३:१७सुमारे इ.स.पू. १०३२
त्याने त्याच्या खासगी सेवकाला बोलावून सांगितले, “या स्त्रीला माझ्या नजरेपासून बाहेर काढ आणि तिच्यामागे दाराला कडी लाव.”
- 2 शमुवेल १३:१८सुमारे इ.स.पू. १०३२
तेव्हा त्याच्या सेवकाने तिला बाहेर काढले आणि तिच्यामागे दार बंद केले. राजाच्या कुमारी कन्या घालत असत त्याप्रकारचा पायघोळ झगा तिने घातला होता.
- 2 शमुवेल १३:१९सुमारे इ.स.पू. १०३२
तामारने तिच्या डोक्यावर राख घातली आणि जो पायघोळ झगा तिने घातला होता तो तिने फाडला. तिने तिचे हात आपल्या डोक्यावर ठेवले आणि मोठ्याने रडत ती निघून गेली.
- 2 शमुवेल १३:२०सुमारे इ.स.पू. १०३२
तिचा भाऊ अबशालोम तिला म्हणाला, “तुझा भाऊ अम्नोन तुझ्याबरोबर होता काय? तर आता माझ्या बहिणी, शांत हो, तो तुझा भाऊ आहे. ही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस.” आणि तामार तिचा भाऊ अबशालोमच्या घरात एकाकी अशी राहू लागली.
- 2 शमुवेल १३:२१सुमारे इ.स.पू. १०३२
जेव्हा दावीद राजाने हे सर्व ऐकले, तेव्हा त्याला संताप आला.
- 2 शमुवेल १३:२२सुमारे इ.स.पू. १०३२
आणि अबशालोम अम्नोनास चांगले किंवा वाईट काहीही बोलला नाही; त्याने अम्नोनाचा तिरस्कार केला कारण त्याने त्याची बहीण तामारला बेअब्रू केले होते.
- 2 शमुवेल १३:२३सुमारे इ.स.पू. १०३०
दोन वर्षानंतर, जेव्हा एफ्राईमच्या सीमेवर बआल-हासोर येथे अबशालोमच्या मेंढरांची लोकर कातरणी होती, तेव्हा त्याने राजांच्या सर्व पुत्रांना तिथे येण्यास आमंत्रण दिले.
- 2 शमुवेल १३:२४सुमारे इ.स.पू. १०३०
अबशालोम राजाकडे गेला आणि म्हणाला, “तुमच्या सेवकाकडे मेंढ्यांची लोकर कातरणी आहे, राजा आणि त्याचे सेवक कृपा करून माझ्या सहभागी होतील काय?”
- 2 शमुवेल १३:२५सुमारे इ.स.पू. १०३०
राजाने उत्तर दिले, “नाही, माझ्या पुत्रा, आम्ही सर्वांनीच जाऊ नये; आम्ही तुझ्यासाठी केवळ भार होऊ.” जरी अबशालोमाने त्याला आग्रह केला, तरीही राजाने जाण्यास नकार दिला परंतु त्याने त्याला आशीर्वाद दिला.
- 2 शमुवेल १३:२६सुमारे इ.स.पू. १०३०
तेव्हा अबशालोम म्हणाला, “आपण येत नाही, तर माझा भाऊ अम्नोन याला आमच्याबरोबर येऊ द्या.” राजाने त्याला विचारले, “त्याने तुमच्याबरोबर का जावे?”
- 2 शमुवेल १३:२७सुमारे इ.स.पू. १०३०
परंतु अबशालोमाने त्याला विनंती केली, म्हणून त्याने त्याच्याबरोबर अम्नोन व बाकीच्या राजपुत्रांना पाठवले.
- 2 शमुवेल १३:२८सुमारे इ.स.पू. १०३०
अबशालोमाने त्याच्या माणसांना आज्ञा केली, “ऐका! जेव्हा अम्नोन द्राक्षारस पिऊन मस्त झालेला असेल आणि मी तुम्हाला सांगेन, ‘अम्नोनावर वार करा,’ तेव्हा त्याला ठार मारा. घाबरू नका. ही आज्ञा मी तुम्हाला केली नाही काय? खंबीर व्हा आणि धैर्य धरा.”
- 2 शमुवेल १३:२९सुमारे इ.स.पू. १०३०
तेव्हा अबशालोमने सांगितल्याप्रमाणे त्याच्या माणसांनी अम्नोनाचे केले. तेव्हा राजाचे सर्व पुत्र उठले, आपआपल्या खेचरावर बसून पळून गेले.
- 2 शमुवेल १३:३०सुमारे इ.स.पू. १०३०
ते त्यांच्या मार्गावर असता, दावीदाकडे निरोप आला: “अबशालोमने राजाच्या सर्व पुत्रांना मारून टाकले आहे; त्यांच्यातील एकही जिवंत राहिलेले नाही.”