मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 शमुवेल ११:१४सुमारे इ.स.पू. १०३५

    सकाळी दावीदाने योआबाला एक पत्र लिहिले आणि ते उरीयाहच्या हाती पाठवले.

  2. 2 शमुवेल ११:१५सुमारे इ.स.पू. १०३५

    त्यात त्याने असे लिहिले, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयाहला ठेवा; आणि त्याच्यापासून मागे या म्हणजे त्याच्यावर वार होईल व तो मरण पावेल.”

  3. 2 शमुवेल ११:१६सुमारे इ.स.पू. १०३५

    म्हणून जिथे योआबने शहराला वेढा घातला होता, तेव्हा त्याला माहीत होते की, शूर योद्धे कुठे असतील तिथे त्याने उरीयाहला ठेवले.

  4. 2 शमुवेल ११:१७सुमारे इ.स.पू. १०३५

    जेव्हा त्या शहराची माणसे बाहेर आली आणि त्यांनी योआबाविरुद्ध लढाई केली, तेव्हा दावीदाच्या सैन्यातील काही माणसे युद्धात पडली; व उरीयाह हिथी सुद्धा मारला गेला.

  5. 2 शमुवेल ११:१८सुमारे इ.स.पू. १०३५

    योआबने दावीदाकडे लढाईचा संपूर्ण वृतांत पाठवला.

  6. 2 शमुवेल ११:१९सुमारे इ.स.पू. १०३५

    त्याने संदेशवाहकाला सूचना दिली: “राजाला या लढाईचा वृत्तांत दिल्यानंतर,

  7. 2 शमुवेल ११:२०सुमारे इ.स.पू. १०३५

    राजाचा राग भडकेल आणि ते तुला विचारतील, ‘लढण्यासाठी तुम्ही त्या शहराच्या इतक्या जवळ का गेला? ते नगराच्या तटावरून बाण सोडतील याची कल्पना तुम्हाला नव्हती काय?

  8. 2 शमुवेल ११:२१सुमारे इ.स.पू. १०३५

    यरुब्बशेथचा पुत्र अबीमेलेख याला कोणी मारले? एका स्त्रीने जात्याची तळी भिंतीवरून टाकून तेबेस येथे त्याला मारले नाही काय? तुम्ही त्या भिंतीच्या इतक्या जवळ का गेला?’ जर राजा तुला असे विचारतील, तेव्हा त्यांना सांग, ‘तुमचा सेवक उरीयाह हिथी हा सुद्धा मरण पावला आहे.’ ”

  9. 2 शमुवेल ११:२२सुमारे इ.स.पू. १०३५

    त्याप्रमाणे संदेशवाहक निघाला आणि पोहोचल्यानंतर त्याने दावीदाला ते सर्वकाही सांगितले जे सांगण्यासाठी योआबने त्याला पाठवले होते.

  10. 2 शमुवेल ११:२३सुमारे इ.स.पू. १०३५

    संदेशवाहक दावीदाला म्हणाला, “ती माणसे आमच्यावर प्रबळ झाली आणि मोकळ्या मैदानात त्यांनी आमच्यावर हल्ला केला, परंतु आम्ही त्यांना शहराच्या प्रवेशद्वाराकडे परत लावून दिले.

  11. 2 शमुवेल ११:२४सुमारे इ.स.पू. १०३५

    तेव्हा तिरंदाजांनी वेशीच्या तटांवरून तुमच्या सेवकांवर बाणांनी हल्ला केला आणि राजाची काही माणसे मारली गेली. याशिवाय, आपला सेवक उरीयाह हिथी हा सुद्धा मरण पावला आहे.”

  12. 2 शमुवेल ११:२५सुमारे इ.स.पू. १०३५

    दावीदाने त्या संदेशवाहकाला म्हटले, “योआबाला सांग, ‘यामुळे तू निराश होऊ नकोस, कारण तलवार जसे एकाचा तसेच दुसर्‍याचाही नाश करते. त्या नगराविरुद्ध अधिक नेटाने हल्ला करा आणि त्याचा नाश करा.’ योआबाला उत्तेजित करण्यासाठी हे तू त्याला सांग.”

  13. 2 शमुवेल ११:२६सुमारे इ.स.पू. १०३५

    जेव्हा उरीयाहच्या पत्नीने ऐकले की, तिचा पती मारला गेला, तिने त्याच्यासाठी शोक केला.

  14. 2 शमुवेल ११:२७सुमारे इ.स.पू. १०३५

    शोककाळ संपल्यानंतर दावीदाने तिला आपल्या घरी बोलावून घेतले आणि ती त्याची पत्नी झाली आणि तिने त्याच्या पुत्राला जन्म दिला. परंतु दावीदाने जे केले होते त्यामुळे याहवेह असंतुष्ट झाले होते.

  15. 2 शमुवेल १२:१सुमारे इ.स.पू. १०३४

    नंतर याहवेहनी नाथानला दावीदाकडे पाठवले. जेव्हा नाथान त्याच्याकडे आला, तो म्हणाला, “एका शहरात दोन माणसे राहत होती, एक श्रीमंत होता तर दुसरा गरीब.

  16. 2 शमुवेल १२:२सुमारे इ.स.पू. १०३४

    श्रीमंत माणसाजवळ पुष्कळ मेंढरे व गुरे होती,

  17. 2 शमुवेल १२:३सुमारे इ.स.पू. १०३४

    परंतु गरीब मनुष्याकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढीशिवाय काहीच नव्हते. त्याने ती वाढवली, ती त्याच्याबरोबर आणि त्याच्या लेकरांबरोबर वाढली. तिने त्याच्या अन्नामधून खाल्ले, त्याच्या प्याल्यातून पाणी प्याले आणि त्याच्या बाहूंमध्येच ती झोपी जात असे. त्याला ती आपल्या मुलीप्रमाणेच होती.

  18. 2 शमुवेल १२:४सुमारे इ.स.पू. १०३४

    “त्या श्रीमंत मनुष्याकडे एक पाहुणा आला. परंतु त्या श्रीमंत मनुष्याने त्या पाहुण्यासाठी भोजन बनवावे म्हणून त्याच्याकडील असलेल्या मेंढरे किंवा गुरातून घेतले नाही, त्याऐवजी त्याने त्या गरीब माणसाची ती लहान मेंढी घेऊन त्याच्याकडे आलेल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले.”

  19. 2 शमुवेल १२:५सुमारे इ.स.पू. १०३४

    हे ऐकून दावीद त्या माणसावर रागाने भडकला आणि नाथानला म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, ज्या मनुष्याने असे केले आहे तो मेलाच पाहिजे!

  20. 2 शमुवेल १२:६सुमारे इ.स.पू. १०३४

    त्याने त्या मेंढीसाठी चारपट किंमत मोजावी, कारण त्याने दया न करता असे कृत्य केले आहे.”

  21. 2 शमुवेल १२:७सुमारे इ.स.पू. १०३४

    तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस! याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुझा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला आणि तुला शौलाच्या हातातून सोडविले.

  22. 2 शमुवेल १२:८सुमारे इ.स.पू. १०३४

    तुझ्या धन्याचे घर मी तुला दिले आणि तुझ्या धन्याच्या स्त्रिया तुझ्या बाहूंमध्ये दिल्या. मी तुला संपूर्ण इस्राएल आणि यहूदीया दिले. आणि हे सर्व फार थोडेच होते तर, मी तुला अधिक दिले असते.

  23. 2 शमुवेल १२:९सुमारे इ.स.पू. १०३४

    याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते करून तू याहवेहचा शब्द का अवमानीत केला आहेस? उरीयाह हिथी याला तू तलवारीने मारून टाकलेस आणि त्याची पत्नी तू आपली स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस. तू त्याला अम्मोन्यांच्या तलवारीने ठार मारलेस.

  24. 2 शमुवेल १२:१०सुमारे इ.स.पू. १०३४

    तर आता, तलवार तुझ्या घराण्याला कधीही सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ लेखले आणि उरीयाह हिथीची पत्नी तू स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस.’

  25. 2 शमुवेल १२:११सुमारे इ.स.पू. १०३४

    “याहवेह असे म्हणतात: ‘तुझ्याच घराण्यातून मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. तुझ्या डोळ्यांसमोर मी तुझ्या स्त्रिया घेऊन तुझ्या जिवलगाला देईन आणि तो दिवसाच्या प्रकाशात तुझ्या स्त्रियांशी संबंध ठेवील.