- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 2 शमुवेल ८:१४सुमारे इ.स.पू. १०४०
त्याने एदोमात सर्वठिकाणी ठाणे बसविले आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथे कुठे गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला.
- 2 शमुवेल ८:१५सुमारे इ.स.पू. १०४०
दावीदाने संपूर्ण इस्राएलवर राज्य केले व त्याच्या लोकांशी तो न्यायाने व सत्याने वागत असे.
- 2 शमुवेल ८:१६सुमारे इ.स.पू. १०४०
जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता.
- 2 शमुवेल ८:१७सुमारे इ.स.पू. १०४०
अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख हे याजक होते; आणि सेरायाह हा चिटणीस होता;
- 2 शमुवेल ८:१८सुमारे इ.स.पू. १०४०
यहोयादाचा पुत्र बेनाइयाह हा करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता; आणि दावीदाचे पुत्र शासकीय सल्लागार होते.
- 2 शमुवेल ९:१सुमारे इ.स.पू. १०४०
दावीदाने विचारले, “योनाथानप्रीत्यर्थ ज्याच्यावर मी कृपा करावी असा शौलाच्या घराण्यातील कोणी अजून राहिला आहे काय?”
- 2 शमुवेल ९:२सुमारे इ.स.पू. १०४०
शौलाच्या घराण्यातील सीबा नावाचा एक सेवक होता. दावीदासमोर येण्यासाठी त्यांनी त्याला बोलावून घेतले आणि राजा त्याला म्हणाला, “तू सीबा आहेस काय?” त्याने उत्तर दिले, “मी तुमच्या सेवेस हजर आहे,”
- 2 शमुवेल ९:३सुमारे इ.स.पू. १०४०
राजाने विचारले, “मी परमेश्वराची कृपा दाखवावी असा शौलाच्या घराण्यातील कोणीही जिवंत नाही काय?” सीबाने राजाला उत्तर दिले, “योनाथानचा एक पुत्र अजूनही जिवंत आहे; तो दोन्ही पायांनी अधू आहे.”
- 2 शमुवेल ९:४सुमारे इ.स.पू. १०४०
“तो कुठे आहे?” राजाने विचारले. सीबाने उत्तर दिले, “तो लो-देबार येथे अम्मीएलचा पुत्र माखीर याच्या घरी आहे.”
- 2 शमुवेल ९:५सुमारे इ.स.पू. १०४०
तेव्हा दावीद राजाने त्याला लो-देबार येथून अम्मीएलाचा पुत्र माखीरच्या घरून बोलावून आणले.
- 2 शमुवेल ९:६सुमारे इ.स.पू. १०४०
जेव्हा शौलाचा पुत्र योनाथानचा पुत्र मेफीबोशेथ दावीदाकडे आला व त्याच्या आदरार्थ त्याने खाली वाकून दंडवत घातले. दावीद म्हणाला, “मेफीबोशेथ!” “मी तुमच्या सेवेस हजर आहे,” त्याने उत्तर दिले.
- 2 शमुवेल ९:७सुमारे इ.स.पू. १०४०
दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस! कारण तुझा पिता योनाथान याच्याप्रीत्यर्थ मी तुझ्यावर अवश्य दया करेन. तुझे आजोबा शौल यांच्या मालकीची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या मेजावर भोजन करशील.”
- 2 शमुवेल ९:८सुमारे इ.स.पू. १०४०
मेफीबोशेथ दंडवत घालीत म्हणाला, “तुमचा सेवक कोण आहे की, माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्याची तुम्ही नोंद घ्यावी?”
- 2 शमुवेल ९:९सुमारे इ.स.पू. १०४०
नंतर राजाने शौलाचा सेवक सीबा याला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, “शौलाचे व त्याच्या घराण्याचे जे काही होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या नातवाला दिले आहे.
- 2 शमुवेल ९:१०सुमारे इ.स.पू. १०४०
तू, तुझे पुत्र आणि तुझे चाकर यांनी त्याच्यासाठी त्या जमिनीची मशागत करावी आणि तुझ्या धन्याच्या नातवाला पुरवठा असावा म्हणून ते पीक आणावे. आणि मेफीबोशेथ, तुझ्या धन्याचा नातू, नेहमीच माझ्या मेजावर भोजन करेल.” (सीबाची पंधरा मुले आणि वीस चाकर होते.)
- 2 शमुवेल ९:११सुमारे इ.स.पू. १०४०
तेव्हा सीबा राजाला म्हणाला, “माझ्या धनीराजाने आपल्या सेवकाला दिलेल्या आज्ञेनुसार आपला सेवक करेल.” याप्रमाणे राजाच्या पुत्रांसारखा मेफीबोशेथ दावीदाच्या मेजावर भोजन करीत असे.
- 2 शमुवेल ९:१२सुमारे इ.स.पू. १०४०
मेफीबोशेथला मीखा नावाचा एक लहान पुत्र होता आणि सीबाच्या घरातील प्रत्येकजण मेफीबोशेथचे चाकर होते.
- 2 शमुवेल ९:१३सुमारे इ.स.पू. १०४०
आणि मेफीबोशेथ यरुशलेम येथे राहिला कारण तो नेहमी राजाच्या मेजावर भोजन करीत असे; तो दोन्ही पायांनी अधू होता.
- 2 शमुवेल १०:१सुमारे इ.स.पू. १०३७
कालांतराने, अम्मोन्यांचा राजा मरण पावल्यानंतर, त्याचा पुत्र हानून राजा झाला.
- 2 शमुवेल १०:२सुमारे इ.स.पू. १०३७
तेव्हा दावीदाने विचार केला, “जशी त्याचा पिता नाहाशने माझ्यावर दया दाखविली होती, तशी दया मी त्याचा पुत्र हानूनवर दाखवेन.” म्हणून दावीदाने हानूनच्या पित्याविषयी आपली सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवले. जेव्हा दावीदाची माणसे अम्मोनी लोकांच्या प्रदेशात आले,
- 2 शमुवेल १०:३सुमारे इ.स.पू. १०३७
तेव्हा अम्मोनी अधिकार्यांनी त्यांचा धनी हानून याला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवून आपल्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ शहराची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?”
- 2 शमुवेल १०:४सुमारे इ.स.पू. १०३७
तेव्हा हानूनने दावीदाच्या राजदूतांना ताब्यात घेऊन, प्रत्येक मनुष्याच्या अर्ध्या दाढीचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध नितंबापर्यंत फाडून त्यांना परत पाठवून दिले.
- 2 शमुवेल १०:५सुमारे इ.स.पू. १०३७
जेव्हा दावीदाला याबाबतीत सांगितले गेले, तेव्हा दावीदाने त्या माणसांची भेट घेण्यासाठी माणसे पाठवली, कारण त्यांचा मोठा अपमान झाला होता. राजाने म्हटले, “तुमची दाढी वाढेपर्यंत यरीहोतच राहा, मग परत या.”
- 2 शमुवेल १०:६सुमारे इ.स.पू. १०३७
जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा त्यांनी बेथ-रहोब व अराम-झोबाह येथून वीस हजार अरामी पायदळ, तसेच माकाहच्या राजाबरोबर एक हजार लोक आणि तोब कडून बारा हजार माणसे भाड्याने आणली.
- 2 शमुवेल १०:७सुमारे इ.स.पू. १०३७
हे ऐकून, दावीदाने युद्ध करणाऱ्या माणसांच्या संपूर्ण सैन्यासह योआबाला पाठवले.