मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 शमुवेल १०:८सुमारे इ.स.पू. १०३७

    तेव्हा अम्मोन्यांचे सैन्य बाहेर आले आणि युद्धाच्या तयारीने त्यांच्या नगरवेशीच्या दरवाजाजवळ येऊन थांबले आणि अराम-झोबाह आणि रहोबचे अरामी आणि तोब आणि माकाहची माणसे मोकळ्या प्रदेशात एकटीच होती.

  2. 2 शमुवेल १०:९सुमारे इ.स.पू. १०३७

    शत्रूचे सैन्य आपल्यापुढे व मागे आहे हे योआबाला समजले; तेव्हा त्याने इस्राएली सैन्यातून उत्तम योद्धे निवडले व त्यांना अरामी सैन्याशी लढण्यास पाठविले.

  3. 2 शमुवेल १०:१०सुमारे इ.स.पू. १०३७

    बाकीचे सैन्य त्याने आपला भाऊ अबीशाई याच्या हाती दिले आणि त्यांना अम्मोनी लोकांविरुद्ध लढण्यास पाठवले.

  4. 2 शमुवेल १०:११सुमारे इ.स.पू. १०३७

    योआब म्हणाला, “जर अरामी सैन्य माझ्यावर भारी झाले तर तुम्ही माझी सुटका करण्यास यावे; परंतु जर अम्मोनी सैन्य तुझ्यावर भारी झाले तर मी तुला सोडविण्यास येईन.

  5. 2 शमुवेल १०:१२सुमारे इ.स.पू. १०३७

    खंबीर व्हा, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परमेश्वराच्या शहरांसाठी आपण धैर्याने लढू. याहवेहच्या दृष्टीने जे बरे ते याहवेह करतील.”

  6. 2 शमुवेल १०:१३सुमारे इ.स.पू. १०३७

    तेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सैन्य अराम्यांशी लढण्यास पुढे गेले पण ते त्याच्यापुढून पळून गेले.

  7. 2 शमुवेल १०:१४सुमारे इ.स.पू. १०३७

    जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा ते अबीशाईपुढून पळून शहरात गेले. तेव्हा योआब अम्मोनी सैन्याबरोबर युद्ध करून यरुशलेमास आला.

  8. 2 शमुवेल १०:१५सुमारे इ.स.पू. १०३६

    नंतर अरामी लोकांनी पाहिले इस्राएलकडून त्यांचा पराभव झाला आहे, तेव्हा ते पुन्हा एकत्र झाले.

  9. 2 शमुवेल १०:१६सुमारे इ.स.पू. १०३६

    हादादेजरने फरात नदीपलीकडून अरामी सैन्य आणले; हादादेजरच्या सैन्याचा सेनापती शोबाक याच्या नेतृत्वाखाली ते हेलाम येथे गेले.

  10. 2 शमुवेल १०:१७सुमारे इ.स.पू. १०३६

    याविषयी जेव्हा दावीदाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली सैन्य एकत्र केले, यार्देन नदी पार करून ते हेलामकडे गेले. अरामी सैन्याने दावीदाला भेटण्यासाठी त्यांच्या युद्धाच्या रांगा तयार केल्या आणि त्याच्याविरुद्ध युद्ध केले.

  11. 2 शमुवेल १०:१८सुमारे इ.स.पू. १०३६

    परंतु अरामी इस्राएली समोरून पळून गेले आणि दावीदाने त्यांच्यातील सातशे रथस्वारांना व चाळीस हजार पायदळांना ठार मारले. त्याने त्यांचा सेनापती शोबाक याला सुद्धा मारले आणि तो तिथेच मरण पावला.

  12. 2 शमुवेल १०:१९सुमारे इ.स.पू. १०३६

    जे सर्व राजे हादादेजरचे जहागीरदार होते, यांनी इस्राएलपुढे झालेला आपला पराभव पाहून, इस्राएलशी करार केला व त्यांच्या अधीन झाले. त्यानंतर पुढे अरामी लोक अम्मोनी लोकांना मदत करण्यास घाबरले.

  13. 2 शमुवेल ११:१सुमारे इ.स.पू. १०३५

    त्याकाळी वसंतॠतूमध्ये राजे लोक युद्धावर जात असत, तेव्हा दावीदाने राजाची माणसे आणि संपूर्ण इस्राएली सैन्याबरोबर योआबाला पाठवले. त्यांनी अम्मोनी सैन्याचा नाश केला आणि राब्बाह शहराला वेढा घातला. परंतु दावीद यरुशलेमात राहिला.

  14. 2 शमुवेल ११:२सुमारे इ.स.पू. १०३५

    एके संध्याकाळी दावीद त्याच्या बिछान्यावरून उठला आणि आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरू लागला. गच्चीवरून त्याने एका स्त्रीला स्नान करताना पाहिले. ती स्त्री फार सुंदर होती,

  15. 2 शमुवेल ११:३सुमारे इ.स.पू. १०३५

    दावीदाने तिच्याबद्दल चौकशी करण्यासाठी कोणा एकाला पाठवले. तो मनुष्य म्हणाला, “ती एलीयामची कन्या, हिथी उरीयाहची पत्नी, बथशेबा आहे.”

  16. 2 शमुवेल ११:४सुमारे इ.स.पू. १०३५

    तेव्हा दावीदाने दूत पाठवून तिला बोलावून घेतले. ती त्याच्याकडे आली आणि त्याने तिच्याशी शरीरसंबंध केला. (यावेळी ती तिच्या मासिक अशुद्धतेपासून शुद्ध होत होती.) नंतर ती परत तिच्या घरी गेली.

  17. 2 शमुवेल ११:५सुमारे इ.स.पू. १०३५

    ती स्त्री गर्भवती झाली आणि तिने दावीदाकडे निरोप पाठवित म्हटले, “मी गर्भवती आहे.”

  18. 2 शमुवेल ११:६सुमारे इ.स.पू. १०३५

    मग दावीदाने योआबाला निरोप पाठवला: “उरीयाह हिथी याला माझ्याकडे पाठव.” आणि योआबाने त्याला दावीदाकडे पाठवले.

  19. 2 शमुवेल ११:७सुमारे इ.स.पू. १०३५

    जेव्हा उरीयाह त्याच्याकडे आला, तेव्हा दावीदाने त्याची विचारपूस करत विचारले योआब कसा आहे, शिपाई कसे आहेत आणि युद्ध कसे चालले आहे.

  20. 2 शमुवेल ११:८सुमारे इ.स.पू. १०३५

    नंतर दावीद उरीयाहला म्हणाला, “तुझ्या घरी जा आणि आपले पाय धू.” तेव्हा उरीयाह राजवाड्यातून निघाला आणि त्याच्यामागोमाग राजाकडून एक बक्षीस पाठवले गेले.

  21. 2 शमुवेल ११:९सुमारे इ.स.पू. १०३५

    परंतु उरीयाह राजवाड्याच्या प्रवेशद्वारातच त्याच्या धन्याच्या सेवकांबरोबर झोपला, तो त्याच्या घरी गेला नाही.

  22. 2 शमुवेल ११:१०सुमारे इ.स.पू. १०३५

    दावीदाला कोणी सांगितले, “उरीयाह घरी गेला नाही.” तेव्हा त्याने उरीयाहाला विचारले, “तू आताच लष्कराच्या मोहिमेवरून आलास नाही काय? तू घरी का गेला नाहीस?”

  23. 2 शमुवेल ११:११सुमारे इ.स.पू. १०३५

    उरीयाह दावीदाला म्हणाला, “कोश आणि इस्राएल आणि यहूदीया हे तंबूत राहत आहेत आणि माझा सेनापती योआब आणि माझ्या धन्याची माणसे उघड्या मैदानात तळ देऊन आहेत. तर मी माझ्या घरी जाऊन खाणेपिणे आणि माझ्या पत्नीशी प्रेम कसे करू शकतो? तुमच्या जिवाची शपथ, मी अशी गोष्ट करणार नाही!”

  24. 2 शमुवेल ११:१२सुमारे इ.स.पू. १०३५

    तेव्हा दावीद त्याला म्हणाला, “आणखी एक दिवस येथेच राहा, उद्या मी तुला परत पाठवेन.” त्याप्रमाणे उरीयाह तो दिवस आणि दुसरा दिवस यरुशलेममध्ये राहिला.

  25. 2 शमुवेल ११:१३सुमारे इ.स.पू. १०३५

    दावीदाने त्याला आमंत्रण दिल्यावरून त्याने त्याच्याबरोबर खाणेपिणे केले आणि तो मस्त होईपर्यंत दावीदाने त्याला मद्य पाजले. परंतु संध्याकाळी उरीयाह त्याच्या धन्याच्या सेवकांमध्ये त्याच्या चटईवर झोपण्यासाठी गेला; तो घरी गेला नाही.