मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 शमुवेल १२:१२सुमारे इ.स.पू. १०३४

    तू हे गुप्तपणे केलेस, परंतु मी हे दिवसाच्या प्रकाशात सर्व इस्राएलसमोर करेन.’ ”

  2. 2 शमुवेल १२:१३सुमारे इ.स.पू. १०३४

    नंतर दावीद नाथानाला म्हणाला, “मी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” नाथानाने उत्तर दिले, “याहवेहने तुझे पाप दूर केले आहे. तू मरणार नाहीस.

  3. 2 शमुवेल १२:१४सुमारे इ.स.पू. १०३४

    परंतु हे कृत्य करून तू याहवेहचा भयंकर अनादर केला आहेस, या कारणाने तुझ्यापासून जन्मलेला मुलगा मरण पावेल.”

  4. 2 शमुवेल १२:१५सुमारे इ.स.पू. १०३४

    नाथान घरी निघून गेल्यानंतर, उरीयाहच्या पत्नीपासून दावीदाला झालेल्या मुलावर याहवेहने वार केला आणि तो आजारी पडला.

  5. 2 शमुवेल १२:१६सुमारे इ.स.पू. १०३४

    दावीदाने मुलासाठी परमेश्वराकडे याचना केली. त्याने उपास केला व गोणपाट घालून रात्रभर जमिनीवर पडून राहिला.

  6. 2 शमुवेल १२:१७सुमारे इ.स.पू. १०३४

    त्याच्या घरातील वडील लोक त्याला जमिनीवरून उठविण्यासाठी त्याच्या बाजूला उभे राहिले, परंतु त्याने नकार दिला आणि त्याने त्यांच्याबरोबर काहीही अन्न खाल्ले नाही.

  7. 2 शमुवेल १२:१८सुमारे इ.स.पू. १०३४

    सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मूल मरण पावले आहे हे दावीदाला सांगण्यासाठी त्याचे सेवक घाबरत होते, कारण त्यांना वाटले, “मूल जिवंत असताना आम्ही त्याला समजाविले पण तो आमचे ऐकत नव्हता. तर आता आम्ही त्याला कसे सांगावे की, मूल मरण पावले आहे? तो स्वतःला काही अपाय करून घेईल.”

  8. 2 शमुवेल १२:१९सुमारे इ.स.पू. १०३४

    आपले सेवक एकमेकात कुजबुज करीत आहेत असे दावीदाच्या लक्षात आले, आणि त्याला समजले की मूल मरण पावले आहे. त्याने विचारले, “मूल मरण पावले आहे काय?” “होय, तो मरण पावला आहे.” त्यांनी उत्तर दिले.

  9. 2 शमुवेल १२:२०सुमारे इ.स.पू. १०३४

    तेव्हा दावीद जमिनीवरून उठला, त्याचे स्नान झाल्यानंतर, तैलाभ्यंग करून आपले कपडे बदलले व याहवेहच्या घरात जाऊन त्याने आराधना केली, मग तो आपल्या स्वतःच्या घरात गेला व त्याने मागितल्यानुसार त्यांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, आणि त्याने ते खाल्ले.

  10. 2 शमुवेल १२:२१सुमारे इ.स.पू. १०३४

    त्याच्या सेवकांनी त्याला विचारले, “तुम्ही हे असे का वागत आहात? मूल जेव्हा जिवंत होते, तेव्हा तुम्ही उपास केला आणि रडलात, परंतु आता मुलाचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही उठून भोजन करीत आहात.”

  11. 2 शमुवेल १२:२२सुमारे इ.स.पू. १०३४

    त्याने उत्तर दिले, “मूल अजून जिवंत होते तेव्हा मी उपास केला आणि रडलो, मला वाटले, ‘न जाणो याहवेहची कृपा कदाचित माझ्यावर होईल आणि ते मुलाला वाचवतील.’

  12. 2 शमुवेल १२:२३सुमारे इ.स.पू. १०३४

    परंतु आता तो मरण पावला आहे, तर मी उपास का करावा? मी त्याला पुन्हा परत आणू शकणार आहे काय? मी त्याच्याकडे जाईन, परंतु तो माझ्याकडे परत येणार नाही.”

  13. 2 शमुवेल १२:२४सुमारे इ.स.पू. १०३३

    नंतर दावीदाने आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले आणि तो तिच्याकडे गेला आणि त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केला. तिने एका पुत्राला जन्म दिला आणि त्यांनी त्याचे नाव शलोमोन असे ठेवले. याहवेहने त्याच्यावर प्रीती केली;

  14. 2 शमुवेल १२:२५सुमारे इ.स.पू. १०३३

    कारण याहवेहने त्याच्यावर प्रीती केली, म्हणून याहवेहने नाथान संदेष्ट्याद्वारे निरोप पाठवून त्याचे नाव यदीदियाह असे ठेवले.

  15. 2 शमुवेल १२:२६सुमारे इ.स.पू. १०३३

    त्या कालांतरात योआबाने अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध लढाई केली आणि राजदूर्ग ताब्यात घेतले.

  16. 2 शमुवेल १२:२७सुमारे इ.स.पू. १०३३

    नंतर योआबाने संदेशवाहकांना दावीदाकडे निरोप पाठवित सांगितले, “मी राब्बाहशी युद्ध केले आणि राजदूर्ग ताब्यात घेऊन त्या शहराचा पाणी पुरवठा हस्तगत केला आहे.

  17. 2 शमुवेल १२:२८सुमारे इ.स.पू. १०३३

    तर आता उरलेले सैन्य गोळा करा आणि शहराला वेढा घाला आणि ते ताब्यात घ्या. नाहीतर मी ते शहर घेईन आणि ते माझ्या नावावर होईल.”

  18. 2 शमुवेल १२:२९सुमारे इ.स.पू. १०३३

    त्याप्रमाणे दावीदाने संपूर्ण सैन्य एकत्रित केले आणि तो राब्बाह शहराकडे गेला आणि त्यावर हल्ला करून ते ताब्यात घेतले.

  19. 2 शमुवेल १२:३०सुमारे इ.स.पू. १०३३

    दावीदाने त्यांच्या राजाच्या डोक्यावरून मुकुट काढून घेतला आणि तो स्वतःच्या डोक्यावर ठेवला. त्याचे वजन सोन्याचा एक तालांत होते व त्यावर मोलवान रत्ने जडविलेली होती. दावीदाने त्या शहरातून मोठ्या प्रमाणात लूट घेतली

  20. 2 शमुवेल १२:३१सुमारे इ.स.पू. १०३३

    आणि त्या शहरातील लोक जे तिथे होते त्यांना त्याने बाहेर आणले, व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयास लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या नगरांचे असे केले. नंतर तो व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले.

  21. 2 शमुवेल १३:१सुमारे इ.स.पू. १०३२

    काही काळानंतर, दावीदाचा पुत्र अम्नोन हा तामार, जी दावीदाचा पुत्र अबशालोमची सुंदर बहीण होती, तिच्या प्रेमात पडला.

  22. 2 शमुवेल १३:२सुमारे इ.स.पू. १०३२

    अम्नोन त्याच्या बहिणीच्या प्रेमात इतका वेडा झाला की, तो आजारी पडला. तामार कुमारी होती आणि तिच्याशी काही करणे हे त्याला अशक्य होते.

  23. 2 शमुवेल १३:३सुमारे इ.स.पू. १०३२

    दावीदाचा भाऊ शिमिआहचा पुत्र योनादाब अम्नोनाचा सल्लागार असून अतिशय धूर्त होता.

  24. 2 शमुवेल १३:४सुमारे इ.स.पू. १०३२

    त्याने अम्नोनास विचारले, “तू जो राजाचा पुत्र असून दिवसेंदिवस असा क्षीण का दिसतोस? तू मला सांगणार नाहीस काय?” तेव्हा अम्नोन त्याला म्हणाला, “माझा भाऊ अबशालोम याची बहीण तामारवर मी प्रेम करतो.”

  25. 2 शमुवेल १३:५सुमारे इ.स.पू. १०३२

    यहोनादाब म्हणाला, “तुझ्या पलंगावर जा आणि आजारी असल्याचे ढोंग कर, जेव्हा तुझे वडील तुला पाहायला येतील, तेव्हा त्यांना सांग, ‘माझी बहीण तामारने माझ्याकडे येऊन मला काहीतरी खावयास द्यावे. तिने ते भोजन माझ्या दृष्टीसमोर तयार करावे म्हणजे मी तिला पाहीन आणि नंतर ते तिच्या हातून खाईन.’ ”