मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 शमुवेल १५:९सुमारे इ.स.पू. १०२१

    राजा त्याला म्हणाला, “शांतीने जा.” तेव्हा तो हेब्रोनकडे गेला.

  2. 2 शमुवेल १५:१०सुमारे इ.स.पू. १०२१

    नंतर अबशालोमने इस्राएलच्या सर्व गोत्रांकडे गुप्त संदेशवाहक असे सांगत पाठवले, “रणशिंगांचा आवाज ऐकताच तुम्ही म्हणा, ‘हेब्रोनमध्ये अबशालोम राजा आहे.’ ”

  3. 2 शमुवेल १५:११सुमारे इ.स.पू. १०२१

    यरुशलेममधून दोनशे लोक अबशालोमबरोबर आले होते. त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले होते आणि ते अगदी निरागसपणे गेले, त्यांना याबाबतीत काहीही माहीत नव्हते.

  4. 2 शमुवेल १५:१२सुमारे इ.स.पू. १०२१

    अबशालोम यज्ञार्पण करीत असताना, त्याने दावीदाचा सल्लागार गिलोनी अहीथोफेल याला सुद्धा त्याचे नगर गिलोह येथून बोलाविले. त्यामुळे कटकारस्थानाला अधिक बळ मिळत गेले व अबशालोमच्या मागे जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली.

  5. 2 शमुवेल १५:१३सुमारे इ.स.पू. १०२१

    तेव्हा एका संदेशवाहकाने येऊन दावीदाला सांगितले, “इस्राएलच्या लोकांची मने अबशालोमशी जडली आहेत.”

  6. 2 शमुवेल १५:१४सुमारे इ.स.पू. १०२१

    तेव्हा दावीद त्याच्याबरोबर यरुशलेमात असलेल्या आपल्या सर्व अधिकार्‍यांना म्हणाला, “चला! आपण पळून जाऊ या, नाहीतर आपल्यातील कोणीही अबशालोमच्या हातून वाचणार नाही. आपण लवकर निघाले पाहिजे, नाहीतर तो त्वरेने आपल्याला गाठून आपल्यावर अरिष्ट आणेल व तलवारीने शहराचा नाश करेल.”

  7. 2 शमुवेल १५:१५सुमारे इ.स.पू. १०२१

    राजाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, “आमचे स्वामी जे काही ठरवतील ते करण्यास आम्ही तयार आहोत.”

  8. 2 शमुवेल १५:१६सुमारे इ.स.पू. १०२१

    राजा आपल्या घरातील सर्व लोकांबरोबर बाहेर पडला; परंतु त्याने त्याच्या दहा उपपत्नींना राजवाड्याची देखरेख करण्यास मागे सोडले.

  9. 2 शमुवेल १५:१७सुमारे इ.स.पू. १०२१

    अशा प्रकारे राजा बाहेर पडला व सर्व लोक त्याच्यामागे निघाले आणि ते शहराच्या सीमेवर थांबले.

  10. 2 शमुवेल १५:१८सुमारे इ.स.पू. १०२१

    त्याची सर्व माणसे करेथी आणि पलेथी व सर्व सहाशे गित्ती लोक जे दावीदाबरोबर गथवरून आले होते ते त्यांच्याबरोबर राजापुढे चालत होते.

  11. 2 शमुवेल १५:१९सुमारे इ.स.पू. १०२१

    राजा गित्ती इत्तय याला म्हणाला, “तू आमच्याबरोबर का येत आहे? परत जा आणि अबशालोम राजाबरोबर राहा. तू तर परदेशीय, तुझ्या जन्मभूमीतून बाहेर आलेला आहेस.

  12. 2 शमुवेल १५:२०सुमारे इ.स.पू. १०२१

    तू कालचा आलेला मनुष्य, मी कुठे जातो ते मला स्वतःला माहीत नाही, तेव्हा मी तुला आमच्याबरोबर इकडे तिकडे का फिरवू? परत जा आणि आपले लोक सोबत घेऊन जा. याहवेह तुला दया व विश्वासूपण दाखवो.”

  13. 2 शमुवेल १५:२१सुमारे इ.स.पू. १०२१

    परंतु इत्तयने उत्तर दिले, “जिवंत याहवेहची आणि माझ्या राजाच्या जीविताची शपथ, माझे स्वामी कुठेही असतील, मग ते जीवन किंवा मरण असले तरी तिथे आपला सेवक असणार.”

  14. 2 शमुवेल १५:२२सुमारे इ.स.पू. १०२१

    दावीद इत्तयला म्हणाला, “पुढे जा, चालत राहा.” तेव्हा गित्ती इत्तय पुढे चालत गेला. त्याची सर्व माणसे व त्याचे घराणे त्याच्याबरोबर होते.

  15. 2 शमुवेल १५:२३सुमारे इ.स.पू. १०२१

    जेव्हा लोक देश पार करीत होते, तेव्हा सर्व देशवासी मोठ्याने रडू लागले. राजाने सुद्धा किद्रोनचे खोरे पार केली आणि सर्व लोक अरण्याच्या वाटेने पुढे गेले.

  16. 2 शमुवेल १५:२४सुमारे इ.स.पू. १०२१

    सादोक सुद्धा तिथे होता आणि सर्व लेवी लोक जे त्याच्याबरोबर होते ते परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेत होते. त्यांनी परमेश्वराचा कोश खाली ठेवला आणि सर्व लोकांनी शहर सोडण्याचे पूर्ण होईपर्यंत अबीयाथारने यज्ञार्पणे केली.

  17. 2 शमुवेल १५:२५सुमारे इ.स.पू. १०२१

    नंतर दावीद राजाने सादोकाला म्हटले, “परमेश्वराचा कोश परत शहरात घेऊन जा. जर याहवेहच्या दृष्टीत मी कृपा पावलो असलो तर याहवेह मला परत आणतील यासाठी की मी कोश व याहवेहचे निवासस्थान पुन्हा पाहू शकेल.

  18. 2 शमुवेल १५:२६सुमारे इ.स.पू. १०२१

    परंतु जर याहवेहने म्हटले, ‘मी तुझ्यावर प्रसन्न नाही,’ तर मी तयार आहे; त्यांना जे बरे वाटते तसे याहवेह माझे करो.”

  19. 2 शमुवेल १५:२७सुमारे इ.स.पू. १०२१

    राजाने सादोक याजकाला आणखी पुढे म्हटले, “तुला कळते की नाही? माझ्या आशीर्वादासह नगरात परत जा. तुझा पुत्र अहीमाज आणि अबीयाथारचा पुत्र योनाथान यांना सोबत घेऊन जा. तू आणि अबीयाथार तुमच्या दोन्ही पुत्रांसह परत या.

  20. 2 शमुवेल १५:२८सुमारे इ.स.पू. १०२१

    मला कळविण्यासाठी तुझा संदेश येईपर्यंत मी रानाकडील मैदानात वाट पाहीन.”

  21. 2 शमुवेल १५:२९सुमारे इ.स.पू. १०२१

    त्याप्रमाणे सादोक व अबीयाथार यांनी परमेश्वराचा कोश परत यरुशलेमास नेला व ते तिथेच राहिले.

  22. 2 शमुवेल १५:३०सुमारे इ.स.पू. १०२१

    परंतु दावीद जैतुनाच्या डोंगराकडे रडत रडतच चालत चढत होता; त्याने आपले मस्तक झाकून घेतले होते व अनवाणी चालत होता. त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांनीसुद्धा आपले मस्तक झाकून ते रडत रडत वर चढले.

  23. 2 शमुवेल १५:३१सुमारे इ.स.पू. १०२१

    “अहीथोफेल अबशालोमबरोबर कट रचणाऱ्यांपैकी एक आहे” असे कोणी दावीदाला सांगितले, तेव्हा दावीदाने प्रार्थना केली, “हे याहवेह, अहीथोफेलचा सल्ला मूर्खपणा असे होऊ द्या.”

  24. 2 शमुवेल १५:३२सुमारे इ.स.पू. १०२१

    दावीद जेव्हा डोंगराच्या माथ्यावर जिथे लोक परमेश्वराची उपासना करीत असत तिथे जाऊन पोहोचला, तेव्हा अर्कीचा हूशाई त्याची वस्त्रे फाटलेली व डोक्यात धूळ घातलेला असा दावीदास भेटण्यास तिथे होता.

  25. 2 शमुवेल १५:३३सुमारे इ.स.पू. १०२१

    दावीद त्याला म्हणाला, “तू जर माझ्याबरोबर आलास, तर तू मला भार मात्र होशील.