- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 2 शमुवेल १६:२२सुमारे इ.स.पू. १०२३
तेव्हा त्यांनी अबशालोमसाठी छतावर एक तंबू उभारला आणि तो सर्व इस्राएलच्या लोकांच्या नजरेपुढे त्याच्या पित्याच्या उपपत्नींपाशी जाऊन निजला.
- 2 शमुवेल १६:२३सुमारे इ.स.पू. १०२३
त्या दिवसांमध्ये अहीथोफेलने दिलेला कोणताही सल्ला जणू काय परमेश्वराकडे विचारल्याप्रमाणे होता. व त्याप्रमाणेच दावीद व अबशालोम त्याचा सल्ला मानीत असत.
- 2 शमुवेल १७:१सुमारे इ.स.पू. १०२३
अहीथोफेल अबशालोमला म्हणाला, “आज रात्री दावीदाचा पाठलाग करण्यासाठी मला बारा हजार माणसे निवडून घेऊ दे.
- 2 शमुवेल १७:२सुमारे इ.स.पू. १०२३
जेव्हा तो थकलेला आणि दुर्बल असेल तेव्हा मी त्याच्यावर हल्ला करेन. मी त्याला भीतीचा धक्का देईन आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक पळून जातील. मी केवळ राजावरच वार करेन
- 2 शमुवेल १७:३सुमारे इ.स.पू. १०२३
आणि सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणेन. ज्या मनुष्याचे मरण तू इच्छितो, तो मेला म्हणजे सर्व लोक सुरक्षित परत येतील; कोणालाही हानी होणार नाही.”
- 2 शमुवेल १७:४सुमारे इ.स.पू. १०२३
अबशालोमला आणि इस्राएलच्या सर्व वडिलांना ही योजना चांगली वाटली.
- 2 शमुवेल १७:५सुमारे इ.स.पू. १०२३
परंतु अबशालोम म्हणाला, “हूशाई अर्कीलासुद्धा बोलावून घ्या, म्हणजे त्याचे म्हणणे काय आहे ते आम्ही पाहू.”
- 2 शमुवेल १७:६सुमारे इ.स.पू. १०२३
जेव्हा हूशाई त्याच्याकडे आला, तेव्हा अबशालोम म्हणाला, “अहीथोफेलने हा सल्ला दिला आहे. तो जे म्हणतो ते आपण करावे काय? नाहीतर तुझा सल्ला आम्हाला दे.”
- 2 शमुवेल १७:७सुमारे इ.स.पू. १०२३
हूशाईने अबशालोमला उत्तर दिले, “अहीथोफेलने जो सल्ला दिला आहे, तो यावेळेसाठी बरा नाही.
- 2 शमुवेल १७:८सुमारे इ.स.पू. १०२३
हूशाईने पुढे म्हटले, तुझे वडील आणि त्याची माणसे यांना तू चांगले ओळखतोस; ते योद्धे आहेत, रानटी अस्वलाची पिल्ले कोणी नेली तेव्हा ती कशी चवताळते त्यासारखे ते आहेत, तुझे वडील अनुभवी योद्धा आहेत; आणि तो सैन्याबरोबर रात्र घालविणार नाही.
- 2 शमुवेल १७:९सुमारे इ.स.पू. १०२३
यावेळेस सुद्धा ते गुहेत किंवा कुठे दुसर्या ठिकाणी लपले असतील. जर त्यांनी तुझ्या सैन्यावर प्रथम हल्ला केला, तर कोणीही त्याबद्दल ऐकून म्हणेल, ‘अबशालोमच्या मागे जाणार्यांचीच हत्या होत आहे.’
- 2 शमुवेल १७:१०सुमारे इ.स.पू. १०२३
तेव्हा सर्वात धैर्यशाली शिपाई, ज्याचे हृदय एखाद्या सिंहासारखे आहे तो भीतीने गळून जाईल, कारण सर्व इस्राएली लोकांना माहीत आहे की, तुझा पिता योद्धा आहे आणि त्याच्याबरोबर असणारे सर्व शूर आहेत.
- 2 शमुवेल १७:११सुमारे इ.स.पू. १०२३
“म्हणून मी तुला सल्ला देतो: दानपासून बेअर-शेबापर्यंत असलेल्या सर्व असंख्य इस्राएली लोकांना समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे तुझ्याकडे गोळा कर, आणि तू स्वतः युद्धाचे नेतृत्व कर.
- 2 शमुवेल १७:१२सुमारे इ.स.पू. १०२३
मग तो सापडेल तिथे आपण त्याच्यावर हल्ला करू, आणि जसे जमिनीवर दव येऊन पडते तसे आपण त्याच्यावर पडू. मग तो किंवा त्याच्या माणसांपैकी कोणीही जिवंत सोडला जाणार नाहीत.
- 2 शमुवेल १७:१३सुमारे इ.स.पू. १०२३
जर तो शहरात निघून गेला, तर सर्व इस्राएली लोक त्या शहराकडे दोऱ्या आणतील आणि तिथे एकही खडा राहणार नाही तोपर्यंत आम्ही ते खाली दरीत ओढून नेऊ.”
- 2 शमुवेल १७:१४सुमारे इ.स.पू. १०२३
तेव्हा अबशालोम आणि सर्व इस्राएली लोक म्हणाले, “हूशाई अर्कीचा सल्ला अहीथोफेलच्या सल्ल्यापेक्षा अधिक बरा आहे.” कारण अबशालोमवर अरिष्ट आणावे म्हणून अहीथोफेलचा चांगला सल्ला विफल करण्याची याहवेहने योजना केली होती.
- 2 शमुवेल १७:१५सुमारे इ.स.पू. १०२३
हूशाईने सादोक आणि अबीयाथार याजकांना सांगितले, “अहीथोफेलने अबशालोम आणि इस्राएलच्या वडीलजनास अमुक करण्याचा सल्ला दिला होता, परंतु मी त्यांना असे करण्याचा सल्ला दिला आहे.
- 2 शमुवेल १७:१६सुमारे इ.स.पू. १०२३
आता लवकर निरोप पाठवा आणि दावीदाला सांगा, ‘आजची रात्र रानाच्या उतारावर घालवू नको; तर लवकर पलीकडे जा, नाहीतर राजा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक नष्ट केले जातील.’ ”
- 2 शमुवेल १७:१७सुमारे इ.स.पू. १०२३
आपण शहरात जाताना कोणी पाहून धोका देऊ नये, म्हणून योनाथान आणि अहीमाज एन-रोगेल येथे राहत होते. त्यांनी ही सूचना दावीद राजाला द्यावी म्हणून त्यांच्याकडे एक दासी पाठवली.
- 2 शमुवेल १७:१८सुमारे इ.स.पू. १०२३
परंतु एका तरुण मनुष्याने त्यांना पाहिले आणि त्याने जाऊन अबशालोमला सांगितले. तेव्हा दोघेजण त्वरित बहूरीम येथे एका माणसाच्या घरी गेले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती, तिच्यात ते उतरले.
- 2 शमुवेल १७:१९सुमारे इ.स.पू. १०२३
त्याच्या पत्नीने विहिरीच्या तोंडावर एक झाकण टाकले व त्यावर धान्य पसरले. त्याबद्दल कोणालाही काहीही कळले नाही.
- 2 शमुवेल १७:२०सुमारे इ.स.पू. १०२३
अबशालोमाच्या माणसांनी जेव्हा त्या बाईच्या घरी येऊन विचारपूस केली, “अहीमाज व योनाथान कुठे आहेत?” तिने उत्तर दिले, “ते ओढ्यापलीकडे गेले आहेत.” त्या माणसांनी शोध केला, पण त्यांना ते सापडले नाही. म्हणून ते यरुशलेमास परत गेले.
- 2 शमुवेल १७:२१सुमारे इ.स.पू. १०२३
ते तिथून निघून गेल्यानंतर, दोघेजण विहिरीतून बाहेर आले आणि दावीद राजाला जाऊन सांगितले, ते त्याला म्हणाले, “लवकर निघा आणि नदी पार करा; अहीथोफेलने तुमच्याविरुद्ध अमुक सल्ला दिला आहे.”
- 2 शमुवेल १७:२२सुमारे इ.स.पू. १०२३
तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबरच्या सर्व लोकांनी यार्देन नदी पार केली. दिवस उजाडेपर्यंत यार्देन पार केली नाही असा कोणीही मागे राहिला नाही.
- 2 शमुवेल १७:२३सुमारे इ.स.पू. १०२३
इकडे अबशालोमने आपल्या सल्ल्यानुसार केले नाही असे अहीथोफेलने पाहिले, तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि आपल्या जन्मगावी, आपल्या घराकडे निघून गेला. त्याने आपले घर नीटनेटके करून फाशी घेतली. तो मरण पावला आणि त्याला त्याच्या पित्याच्या कबरेत पुरले.