- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 2 शमुवेल १८:२०सुमारे इ.स.पू. १०२३
पण योआब त्याला म्हणाला, “तू आज ही बातमी घेऊन जाणार नाहीस, तू ही बातमी दुसर्या एखाद्या दिवशी घेऊन जा, परंतु आज ती तू नेऊ नये, कारण राजाचा पुत्र मेला आहे.”
- 2 शमुवेल १८:२१सुमारे इ.स.पू. १०२३
नंतर योआब एका कूशी मनुष्याला म्हणाला, “तू जे पाहिलेस ते जाऊन राजाला सांग.” त्या कूशी मनुष्याने योआबाला लवून मुजरा केला व धावत निघाला.
- 2 शमुवेल १८:२२सुमारे इ.स.पू. १०२३
सादोकाचा पुत्र अहीमाज योआबाला म्हणाला, “जे होईल ते होवो, मला कूशी मनुष्याच्या मागे धावू दे.” योआबाने उत्तर दिले, “माझ्या मुला, तुला का जायचे आहे? तुला बक्षीस मिळवून देईल अशी बातमी तुझ्याजवळ नाही.”
- 2 शमुवेल १८:२३सुमारे इ.स.पू. १०२३
तो म्हणाला, “जे होईल ते होवो, मला धावायचे आहे,” तेव्हा योआब म्हणाला, “धाव!” तेव्हा अहीमाज मैदानाच्या मार्गाने धावू लागला आणि कूशी माणसाच्या पुढे गेला.
- 2 शमुवेल १८:२४सुमारे इ.स.पू. १०२३
दावीद शहराच्या आतील व बाहेरील वेशीच्या मध्ये बसलेला असता. पहारेकरी भिंतीवरून वेशीच्या छपरावर चढून गेला, तेव्हा त्याने पाहिले की एक मनुष्य एकटाच धावत येत आहे.
- 2 शमुवेल १८:२५सुमारे इ.स.पू. १०२३
पहारेकर्याने राजाला आवाज देऊन ते सांगितले. राजाने म्हटले, “जर तो एकटाच आहे म्हणजे त्याच्याकडे चांगली बातमी असणार.” तो मनुष्य धावत जवळ जवळ येत होता.
- 2 शमुवेल १८:२६सुमारे इ.स.पू. १०२३
तेव्हा पहारेकर्याने अजून एक मनुष्य धावत येताना पाहिला आणि त्याने द्वारपालाला आवाज दिला, “पाहा, आणखी एक मनुष्य एकटाच धावत येत आहे.” राजाने म्हटले, “तो देखील चांगली बातमी आणत असणार.”
- 2 शमुवेल १८:२७सुमारे इ.स.पू. १०२३
पहारेकरी म्हणाला, “पहिला मनुष्य सादोकाचा पुत्र अहीमाज, याच्यासारखा धावत आहे असे मला वाटते,” राजाने म्हटले, “तो चांगला मनुष्य आहे. तो चांगलीच बातमी घेऊन येत असणार.”
- 2 शमुवेल १८:२८सुमारे इ.स.पू. १०२३
तेव्हा अहीमाजने राजाला आवाज देत म्हटले, “सर्वकाही ठीक आहे!” त्याने आपले मुख जमिनीपर्यंत खाली लववून म्हटले, “याहवेह, आपला परमेश्वर धन्यवादित असो! माझ्या धनीराजाविरुद्ध हात उचलणार्यांना याहवेहने आपल्या हाती घेतले आहे.”
- 2 शमुवेल १८:२९सुमारे इ.स.पू. १०२३
राजाने विचारले, “तरुण अबशालोम सुरक्षित आहे काय?” अहीमाज म्हणाला, “योआब जेव्हा राजाचा सेवक व आपला सेवक म्हणजेच मला पाठवित होता त्यावेळी फार गोंधळ मी पाहिला, परंतु ते काय होते ते मला कळले नाही.”
- 2 शमुवेल १८:३०सुमारे इ.स.पू. १०२३
राजाने म्हटले, “येथे बाजूला वाट पाहत उभा राहा,” तेव्हा तो बाजूला सरकून उभा राहिला.
- 2 शमुवेल १८:३१सुमारे इ.स.पू. १०२३
नंतर कूशी मनुष्य येऊन पोहोचला आणि म्हणाला, “माझे राजा, माझे स्वामी, चांगली बातमी ऐका! आपल्याविरुद्ध उठलेल्या लोकांच्या हातातून याहवेहने तुम्हाला सोडवून तुमची सुटका केली आहे.”
- 2 शमुवेल १८:३२सुमारे इ.स.पू. १०२३
राजाने कूशी मनुष्याला विचारले, “तरुण अबशालोम सुरक्षित आहे का?” त्या कूशी मनुष्याने उत्तर दिले, “माझ्या धनीराजाला जे सर्व इजा करण्यास आपणाविरुद्ध उठतात त्या आपल्या सर्व शत्रूंचे त्या तरुणाप्रमाणेच होवो.”
- 2 शमुवेल १८:३३सुमारे इ.स.पू. १०२३
तेव्हा राजा हादरून गेला. तो वरती दरवाज्यावरील खोलीत गेला आणि रडला! “माझ्या मुला, माझ्या मुला अबशालोमा! तुझ्या ऐवजी मी मेलो असतो—अरे माझ्या पुत्रा अबशालोमा, माझ्या पुत्रा!”
- 2 शमुवेल १९:१सुमारे इ.स.पू. १०२३
“अबशालोमसाठी राजा रडत आहे आणि शोक करीत आहे हे योआबाला सांगण्यात आले.”
- 2 शमुवेल १९:२सुमारे इ.स.पू. १०२३
आणि त्या दिवशी संपूर्ण सैन्याचा विजय, शोकात बदलला, कारण त्या दिवशी त्या सैन्याने ऐकले, “राजा आपल्या पुत्रासाठी शोक करीत आहे.”
- 2 शमुवेल १९:३सुमारे इ.स.पू. १०२३
युद्ध सोडून पळून जाणारी माणसे जशी लज्जित होऊन चोरपावलांनी परत येतात तशी ती माणसे लपतच शहरात गेली.
- 2 शमुवेल १९:४सुमारे इ.स.पू. १०२३
तेव्हा राजाने आपला चेहरा झाकला आणि मोठ्याने रडला, “हे माझ्या पुत्रा, अबशालोमा! हे अबशालोमा माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!”
- 2 शमुवेल १९:५सुमारे इ.स.पू. १०२३
नंतर योआब घरात राजाकडे गेला आणि म्हणाला, “आज तुम्ही तुमच्या सर्व सैन्याला अपमानित केले आहे, ज्यांनी तुमचा जीव वाचविला आणि तुमची मुले, मुली, तुमच्या पत्नी व उपपत्नींना वाचविले आहेत.
- 2 शमुवेल १९:६सुमारे इ.स.पू. १०२३
तुमचा द्वेष करणार्यांवर तुम्ही प्रेम करता आणि तुमच्यावर प्रेम करणार्यांचा तुम्ही द्वेष करता. आज तुम्ही हे स्पष्ट केले आहे की, सेनापती आणि त्यांची माणसे यांचे तुम्हाला काही वाटत नाही. मला तर असे वाटते की आज जर आम्ही सर्व मेलो असतो आणि अबशालोम जिवंत असता तर तुम्हाला आनंद झाला असता.
- 2 शमुवेल १९:७सुमारे इ.स.पू. १०२३
तर आता बाहेर जा आणि तुमच्या माणसांना उत्तेजित करा. मी जिवंत याहवेहची शपथ घेऊन सांगतो की, तुम्ही बाहेर गेला नाही, तर आज रात्र येईपर्यंत तुमच्याजवळ एकही मनुष्य असणार नाही. तुमच्या तारुण्यापासून आजपर्यंत जी सर्व अरिष्टे तुमच्यावर आली त्यापेक्षा हे तुमच्यासाठी अधिक वाईट असे होईल.”
- 2 शमुवेल १९:८सुमारे इ.स.पू. १०२३
तेव्हा राजा उठला आणि शहराच्या वेशीकडे आपल्या स्थानी जाऊन बसला. जेव्हा माणसांना सांगण्यात आले, “राजा वेशीकडे बसला आहे,” तेव्हा ते सर्वजण त्याच्यासमोर आले. या दरम्यान इस्राएली लोक त्यांच्या घरांकडे पळून गेले.
- 2 शमुवेल १९:९सुमारे इ.स.पू. १०२३
इस्राएलच्या सर्व गोत्रातील लोकांचा आपसात वाद चालू होता, ते म्हणत होते, “राजाने आम्हाला आमच्या शत्रूच्या हातातून सोडविले आहे; तोच आहे ज्याने पलिष्ट्यांच्या हातातून आमची सुटका केली. परंतु आता अबशालोममुळे तो देशातून पळून गेला आहे;
- 2 शमुवेल १९:१०सुमारे इ.स.पू. १०२३
आणि अबशालोम ज्याला आम्ही आमच्यावर राज्य करण्यासाठी अभिषेक केला, तो युद्धात मारला गेला आहे. तेव्हा राजाला परत आणण्याविषयी तुम्ही काहीच का बोलत नाही?”
- 2 शमुवेल १९:११सुमारे इ.स.पू. १०२३
दावीद राजाने सादोक आणि अबीयाथार याजकांना निरोप पाठवला: “यहूदीयाच्या वडीलजनांना विचारा, ‘जे सर्व इस्राएलात बोलले जात आहे ते राजाच्या कानी आले आहे, तर राजाला त्याच्या राजवाड्यात आणण्यास तुम्ही सर्वात शेवटचे का आहात?