मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दावीद सिकलाग येथे जात असताना मनश्शेह गोत्रातील जे लोक दावीदाला येऊन मिळाले, त्यांची यादी पुढे दिली आहे: अदनाह, योजाबाद, यदिएल, मिखाएल, यहोजाबाद, एलीहू व सिलथाई. ते सर्वजण मनश्शेह गोत्रातील उच्च श्रेणीचे सहस्त्राधिपती होते.

  2. ते शूर योद्धे होते. त्यांनी पलिष्ट्यांच्या गनिमी युद्धाविरुद्ध दावीदाला मदत केली आणि ते त्याच्या सैन्यात सेनाधिकारी होते.

  3. दररोज लोक दावीदाला येऊन मिळत होते. शेवटी त्याच्याकडे परमेश्वराच्या सेनेसारखी प्रचंड सेना जमा झाली.

  4. 1 इतिहास १२:२३सुमारे इ.स.पू. १०४८

    दावीद हेब्रोन येथे असताना, त्याला अनेक कसलेले योद्धे येऊन मिळाले. याहवेहने वचन दिल्याप्रमाणे दावीदाला शौलाच्या जागी राजा होण्यास मदत करावी या उद्देशाने ते आले होते.

  5. 1 इतिहास १२:२४सुमारे इ.स.पू. १०४८

    यहूदाह गोत्रातील ढाल व भाला धारण करणारे हत्यारबंद 6,800 योद्धे;

  6. 1 इतिहास १२:२५सुमारे इ.स.पू. १०४८

    शिमओनी गोत्रातले शूर व पराक्रमी योद्धे 7,100;

  7. 1 इतिहास १२:२६सुमारे इ.स.पू. १०४८

    लेव्यातील 4,600,

  8. 1 इतिहास १२:२७सुमारे इ.स.पू. १०४८

    याजकांपैकी अहरोन घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर 3,700 लोक होते.

  9. 1 इतिहास १२:२८सुमारे इ.स.पू. १०४८

    सादोक हा तरुण असून मोठा धैर्यवान लढवय्या होता आणि त्याच्याबरोबर त्याच्या पित्याच्या घराण्यातील 22 सरदार होते;

  10. 1 इतिहास १२:२९सुमारे इ.स.पू. १०४८

    बिन्यामीनच्या म्हणजे शौलाच्या गोत्रातील 3,000, यातील बहुतेक या वेळेपर्यंत शौलाशा एकनिष्ठ राहिले होते;

  11. 1 इतिहास १२:३०सुमारे इ.स.पू. १०४८

    एफ्राईमी, हे महान योद्धे आपआपल्या कुळांमध्ये नामांकित असे पुरुष 20,800;

  12. 1 इतिहास १२:३१सुमारे इ.स.पू. १०४८

    मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातले लोक दावीदाला राजा होण्यास मदत करण्यासाठी तातडीने पाठविण्यात आलेल्या सैन्यात होते 18,000;

  13. 1 इतिहास १२:३२सुमारे इ.स.पू. १०४८

    इस्साखार गोत्रातले 200 पुढारी आले, काळाची पावले ओळखून इस्राएलने काय करावे हे त्यांना समजत होते. त्यांचे सर्व भाऊबंद त्याच्या आज्ञेत होते;

  14. 1 इतिहास १२:३३सुमारे इ.स.पू. १०४८

    जबुलून गोत्रातले निष्णात लढवय्ये 50,000, ते शस्त्रांनी सुसज्ज व दावीदाला एकनिष्ठ होते;

  15. 1 इतिहास १२:३४सुमारे इ.स.पू. १०४८

    नफतालीचे 1,000 अधिकारी आणि भाले व ढाली यांनी सुसज्ज असे 37,000 सैनिक;

  16. 1 इतिहास १२:३५सुमारे इ.स.पू. १०४८

    दान गोत्राचे लढाईसाठी सुसज्ज सैनिक 28,600;

  17. 1 इतिहास १२:३६सुमारे इ.स.पू. १०४८

    आशेर गोत्राचे अनुभवी, सुसज्ज सैनिक 40,000;

  18. 1 इतिहास १२:३७सुमारे इ.स.पू. १०४८

    यार्देन नदीच्या पूर्वेकडील काठावर राहणारे रऊबेनी, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातील सर्व शस्त्रांनिशी सज्ज सैनिक 1,20,000.

  19. 1 इतिहास १२:३८सुमारे इ.स.पू. १०४८

    हे सर्व योद्धे, जे सेनेत त्यांच्या हुद्यानुसार सहभागी होण्यास स्वेच्छेने आले. ते हेब्रोनला आले तेव्हा दावीदाला इस्राएलचा राजा करणे हा त्यांचा एकच उद्देश होता. वास्तविक पाहता सर्व इस्राएलींनी या गोष्टीस मान्यता दिली होती.

  20. 1 इतिहास १२:३९सुमारे इ.स.पू. १०४८

    त्यांनी तिथे तीन दिवस दावीदाबरोबर घालवून, खाणेपिणे केले, कारण त्यांच्या कुटुंबाने त्यांचा तसा प्रबंध केला होता.

  21. 1 इतिहास १२:४०सुमारे इ.स.पू. १०४८

    शेजारच्या लोकांनी म्हणजे इस्साखार, जबुलून व नफताली प्रांतांपर्यंत जे राहत होते, त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिरांच्या ढेपा, खिसमिसांचे घड, द्राक्षारस, तेल इत्यादी खाण्याच्या वस्तू गाढवे, उंट खेचरे व बैल यांच्यावर लादून आणल्या होत्या. त्याचप्रमाणे असंख्य बैल व शेरडेमेंढरे पण आणली होती. कारण इस्राएलात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत होता.

  22. दावीदाने आपल्या सेनाधिकार्‍यांचा, म्हणजे प्रत्येक सहस्राधिपती, शताधिपतीचा सल्ला घेतला.

  23. जमलेल्या संपूर्ण इस्राएली सभेपुढे दावीदाने असे भाषण केले, “जर तुम्हाला योग्य वाटते आणि आपल्या याहवेह परमेश्वरानेही या गोष्टीला संमती दिली आहे, त्याअर्थी आपल्यात सामील होण्यासाठी, आपण इस्राएलातील सर्व बंधूना, तसेच याजक, लेवी, जे त्यांच्यासह नगरात व मळ्यात आहेत त्यांना आमंत्रणाचा संदेश पाठवू या.

  24. त्याचप्रमाणे आपण आपल्या परमेश्वराचा कोश परत आणू या. कारण शौल राजाच्या कारकिर्दीत आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते.”

  25. तेव्हा संपूर्ण सभेने एकमताने होकार दिला व सर्व लोकांना ते योग्य वाटले.