- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
मग दावीदाने परमेश्वराचा कोश किर्याथ-यआरीमहून आणण्याच्या वेळी इजिप्तच्या शिहोर नदीपासून ते लबो हमाथपर्यंत सर्वत्र विखुरलेल्या इस्राएली लोकांना एकत्र केले.
दावीद व इस्राएलचे सर्व लोक यहूदीयातील बालाह म्हणजे किर्याथ-यआरीम येथे, जो त्या नावाने संबोधित केला जातो, सर्वसमर्थ याहवेह परमेश्वराचा कोश, जे करुबांमध्ये आरूढ आहेत, तो आणण्यासाठी निघाले.
त्यांनी परमेश्वराचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अहियो हे बैलगाडी चालवित होते.
दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने परमेश्वरासमोर वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा व कर्णे वाजवित आनंद करीत होते.
जेव्हा ते कीदोनाच्या खळ्याजवळ आले, तेव्हा बैल अडखळले म्हणून कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला.
त्यामुळे याहवेहचा कोप उज्जाहविरुद्ध पेटला आणि त्याने कोशाला हात लावला म्हणून त्यांनी त्याला मारून टाकले. आणि तो परमेश्वरापुढे मरण पावला.
तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह असे म्हणतात.
त्या दिवशी दावीदाला परमेश्वराचे भय वाटले, तो म्हणाला, “परमेश्वराचा कोश मी आपल्याकडे कसा नेऊ?”
त्याने कोश त्याच्याबरोबर दावीदाच्या नगरात नेला नाही. त्याऐवजी त्याने तो गित्ती ओबेद-एदोम याच्या घरी नेला.
परमेश्वराचा कोश ओबेद-एदोम याच्या घरात तीन महिने राहिला आणि याहवेहने त्याच्या घराण्यास व त्याचे जे काही होते त्या सर्वास आशीर्वाद दिला.
- 1 इतिहास १४:१सुमारे इ.स.पू. १०४३
आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले व दावीदासाठी राजवाडा बांधावा म्हणून त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे, गवंडी व सुतार पाठवले.
- 1 इतिहास १४:२सुमारे इ.स.पू. १०४३
आणि दावीदाने जाणले की याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य खूप उंचावले आहे.
- 1 इतिहास १४:३सुमारे इ.स.पू. १०४३
यरुशलेमात दावीदाने अनेक पत्नी व उपपत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या.
- 1 इतिहास १४:४सुमारे इ.स.पू. १०४३
यरुशलेममध्ये जन्मलेल्या त्याच्या मुलांची नावे ही: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन,
- 1 इतिहास १४:५सुमारे इ.स.पू. १०४३
इभार, एलीशुआ, एल्पलेट,
- 1 इतिहास १४:६सुमारे इ.स.पू. १०४३
नोगा, नेफेग, याफीय,
- 1 इतिहास १४:७सुमारे इ.स.पू. १०४३
एलीशामा, बिलिआदा व एलिफेलेत.
- 1 इतिहास १४:८सुमारे इ.स.पू. १०४७
इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो त्यांना भेटण्यास गेला.
- 1 इतिहास १४:९सुमारे इ.स.पू. १०४७
इकडे पलिष्टी लोकांनी येऊन रेफाईमच्या खोर्याला लुटले.
- 1 इतिहास १४:१०सुमारे इ.स.पू. १०४७
तेव्हा दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, मी त्यांना तुझ्या हातात देईन.”
- 1 इतिहास १४:११सुमारे इ.स.पू. १०४७
म्हणून दावीद व त्याचे सैन्य बआल-पेरासीम येथे गेले आणि तिथे त्याने त्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे परमेश्वराने माझ्याद्वारे शत्रूंचा नाश केला आहे.” म्हणून त्या ठिकाणाला बआल-पेरासीम, हे नाव पडले.
- 1 इतिहास १४:१२सुमारे इ.स.पू. १०४७
पलिष्टी लोकांनी त्यांची दैवते टाकून दिली व दावीदाने ती अग्नीत जाळून टाकण्याची आज्ञा केली.
- 1 इतिहास १४:१३सुमारे इ.स.पू. १०४७
पुन्हा एकदा पलिष्टी लोकांनी खोर्यात हल्ला केला.
- 1 इतिहास १४:१४सुमारे इ.स.पू. १०४७
तेव्हा दावीदाने पुन्हा परमेश्वराला विचारले, आणि परमेश्वराने त्याला उत्तर दिले, “थेट त्यांच्यामागे जाऊ नकोस, पण त्यांच्या बाजूने वळसा देऊन, तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर.
- 1 इतिहास १४:१५सुमारे इ.स.पू. १०४७
तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सैन्य चालत येण्याचा आवाज येताच, युद्धास पुढे निघा, त्यावरून पलिष्टी सैन्याचा नाश करण्यासाठी परमेश्वर तुमच्यापुढे गेले आहेत असे समज.”