मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 इतिहास १५:२४सुमारे इ.स.पू. १०४२

    शबन्याह, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्‍याह, बेनाइयाह व एलिएजर हे सर्व याजक परमेश्वराच्या कोशापुढे कर्णे वाजवित व मिरवणुकीच्या वेळी अग्रभागी चालत. ओबेद-एदोम व यहीयाह हे कोशाचे द्वारपाल होते.

  2. 1 इतिहास १५:२५सुमारे इ.स.पू. १०४२

    म्हणून दावीद, इस्राएलचे वडीलजन, सैन्याचे उच्चाधिकारी याहवेहच्या कराराचा कोश यरुशलेममध्ये आणण्यासाठी मोठ्या हर्षाने ओबेद-एदोमच्या घरी गेले.

  3. 1 इतिहास १५:२६सुमारे इ.स.पू. १०४२

    याहवेह परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेणार्‍या लेव्यांची याहवेहने मदत केली म्हणून सात बैल आणि सात गोर्‍हे अर्पण केले गेले.

  4. 1 इतिहास १५:२७सुमारे इ.स.पू. १०४२

    दावीद, कोश वाहणारे सर्व लेवी, सर्व गायक व गायकांचा मुख्य संगीतकार कनन्याह होता, या सर्वांनी तलम तागाची वस्त्रे परिधान केली होती. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.

  5. 1 इतिहास १५:२८सुमारे इ.स.पू. १०४२

    अशाप्रकारे इस्राएलाच्या सर्व लोकांनी हर्षाने जयघोष करीत, रणशिंगे, कर्णे, झांजा, सतार व वीणा यांच्या मोठ्या निनादात याहवेहचा कराराचा कोश आणला.

  6. 1 इतिहास १५:२९सुमारे इ.स.पू. १०४२

    याहवेहच्या कराराचा कोश दावीदाच्या नगरात प्रवेश करीत असताना, शौलाची मुलगी मीखल हिने खिडकीतून पाहिले. आणि जेव्हा तिने दावीद राजाला याहवेहसमोर नाचत आणि हर्ष करीत असता पाहिले, तेव्हा तिने तिच्या अंतःकरणात त्याचा तिरस्कार केला.

  7. 1 इतिहास १६:१सुमारे इ.स.पू. १०४२

    त्यांनी देवाचा कोश आणला आणि दावीदाने त्यासाठी जो तंबू तयार केला होता त्या ठिकाणी तो ठेवला आणि परमेश्वरासमोर होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केली.

  8. 1 इतिहास १६:२सुमारे इ.स.पू. १०४२

    होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केल्यानंतर दावीदाने लोकांना याहवेहच्या नावाने आशीर्वाद दिला.

  9. 1 इतिहास १६:३सुमारे इ.स.पू. १०४२

    नंतर त्याने इस्राएल लोकांच्या प्रत्येक स्त्री व पुरुषास एक भाकर, खजुराची एक ढेप व मनुक्यांची एक वडी वाटप केली.

  10. 1 इतिहास १६:४सुमारे इ.स.पू. १०४२

    इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचे गौरव, स्तुतिगान व त्यांचे उपकारस्मरण करण्याकरिता दावीदाने कोशापुढे सेवा करणार्‍या काही लेवी लोकांची नेमणूक केली:

  11. 1 इतिहास १६:५सुमारे इ.स.पू. १०४२

    वादकांचा प्रमुख आसाफ, पुढच्या श्रेणीत जखर्‍याह, येइएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्याह, एलियाब, बेनाइयाह, ओबेद-एदोम व ईयेल हे सतार व वीणा वाजवित, व आसाफ उंच स्वरात झांज वाजवित असे.

  12. 1 इतिहास १६:६सुमारे इ.स.पू. १०४२

    बेनाइयाह व यहजिएल हे याजक परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे नियमितपणे कर्णे वाजवित.

  13. 1 इतिहास १६:७सुमारे इ.स.पू. १०४२

    त्या दिवसापासून दावीदाने याहवेहची अशा प्रकारे उपकारस्तुती करण्यासाठी आसाफ व त्याचे सहायक नेमले:

  14. 1 इतिहास १६:८सुमारे इ.स.पू. १०४२

    याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा.

  15. 1 इतिहास १६:९सुमारे इ.स.पू. १०४२

    त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा; त्यांच्या सर्व अद्भुत कार्याचे वर्णन करा.

  16. 1 इतिहास १६:१०सुमारे इ.स.पू. १०४२

    त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे याहवेहचा शोध करतात, त्यांचे हृदय हर्षित होवो.

  17. 1 इतिहास १६:११सुमारे इ.स.पू. १०४२

    याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; सतत त्यांचे मुख शोधा.

  18. 1 इतिहास १६:१२सुमारे इ.स.पू. १०४२

    परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार, आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा.

  19. 1 इतिहास १६:१३सुमारे इ.स.पू. १०४२

    अहो त्यांचे सेवक, इस्राएलच्या वंशजांनो, त्यांच्या निवडलेल्या लोकांनो, याकोबाच्या संतानांनो, तुम्ही या सर्वांचे स्मरण करा.

  20. 1 इतिहास १६:१४सुमारे इ.स.पू. १०४२

    कारण याहवेह आमचे परमेश्वर आहेत. त्यांचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत.

  21. 1 इतिहास १६:१५सुमारे इ.स.पू. १०४२

    ते आपला करार सर्वदा स्मरणात ठेवतात, ती अभिवचने त्यांनी हजारो पिढ्यांना दिली होती,

  22. 1 इतिहास १६:१६सुमारे इ.स.पू. १०४२

    हा करार त्यांनी अब्राहामाशी केला, आणि इसहाकाशी शपथ वाहिली,

  23. 1 इतिहास १६:१७सुमारे इ.स.पू. १०४२

    आणि त्यांनी याकोबासाठी नियम व इस्राएलसाठी सदासर्वकाळचा करार या रूपाने कायम केला:

  24. 1 इतिहास १६:१८सुमारे इ.स.पू. १०४२

    “मी तुम्हाला कनान देश तुमचे वतन म्हणून देईन.”

  25. 1 इतिहास १६:१९सुमारे इ.स.पू. १०४२

    त्यावेळी इस्राएली लोक अगदी मोजके होते निश्चितच थोडे, वचनदत्त देशात ते परके होते.