- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 1 इतिहास १७:२सुमारे इ.स.पू. १०४२
नाथानाने दावीदाला उत्तर दिले, “आपल्या मनात जे काही आहे त्यानुसार करा, कारण परमेश्वर आपल्याबरोबर आहेत.”
- 1 इतिहास १७:३सुमारे इ.स.पू. १०४२
परंतु त्याच रात्री परमेश्वराचे वचन असे नाथानाकडे आले:
- 1 इतिहास १७:४सुमारे इ.स.पू. १०४२
“जा आणि माझा सेवक दावीदला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी तू घर बांधणार नाहीस.
- 1 इतिहास १७:५सुमारे इ.स.पू. १०४२
इस्राएली लोकांना इजिप्त देशातून मी बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही, तंबू एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणात, या निवासस्थानातून त्या निवासस्थानात फिरत राहिलो आहे.
- 1 इतिहास १७:६सुमारे इ.स.पू. १०४२
जिथे कुठे मी इस्राएली लोकांबरोबर फिरत आलो, तेव्हा त्यांच्यातील ज्यांना मी माझ्या लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेण्यास आज्ञा दिली त्यातील कोणत्याही पुढार्यांना, “तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे भवन का बांधले नाही असे कधी मी म्हटले काय?” ’
- 1 इतिहास १७:७सुमारे इ.स.पू. १०४२
“तर आता माझा सेवक दावीद याला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: मी तुला कुरणातून, कळप राखीत असताना आणले आणि माझ्या इस्राएली लोकांवर अधिपती म्हणून नेमले.
- 1 इतिहास १७:८सुमारे इ.स.पू. १०४२
जिथे कुठे तू गेलास तिथे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून छेदून टाकले. आता मी, पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ पुरुषांच्या नावांप्रमाणे तुझे नाव करेन.
- 1 इतिहास १७:९सुमारे इ.स.पू. १०४२
आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना आपले स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये.
- 1 इतिहास १७:१०सुमारे इ.स.पू. १०४२
मी माझ्या इस्राएली लोकांवर पुढारी नेमले तेव्हापासून असेच घडले. मी तुझ्या सर्व शत्रूंचा ताबा घेईन. “ ‘मी असे जाहीर करतो की याहवेह तुझ्यासाठी एक घर बांधतील:
- 1 इतिहास १७:११सुमारे इ.स.पू. १०४२
जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील, तेव्हा मी तुझे संतान, तुझ्या पुत्रांपैकी एक उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य स्थापित करेन.
- 1 इतिहास १७:१२सुमारे इ.स.पू. १०४२
तोच माझ्यासाठी घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन.
- 1 इतिहास १७:१३सुमारे इ.स.पू. १०४२
मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल; ज्याप्रकारे मी तुझ्या पूर्वजापासून काढून घेतले होते तसे मी माझे प्रेम कधीही त्याच्यापासून काढून घेणार नाही.
- 1 इतिहास १७:१४सुमारे इ.स.पू. १०४२
मी त्याला माझ्या मंदिरावर आणि माझ्या राज्यावर नेमीन; त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ”
- 1 इतिहास १७:१५सुमारे इ.स.पू. १०४२
या संपूर्ण प्रकटीकरणातील प्रत्येक शब्द नाथानाने दावीदाला सांगितला.
- 1 इतिहास १७:१६सुमारे इ.स.पू. १०४२
तेव्हा दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाला: “हे याहवेह परमेश्वरा, मी कोण आहे आणि माझे कुटुंब काय आहे की, तुम्ही मला येथवर आणावे?
- 1 इतिहास १७:१७सुमारे इ.स.पू. १०४२
माझ्या परमेश्वरा, तुमच्या दृष्टीने हे जणू पुरेसे नव्हते, तर तुम्ही माझ्या कुटुंबाच्या भविष्याबद्दलही अभिवचन दिले आहे. याहवेह परमेश्वरा, मी जणूकाही कोणीतरी फार श्रेष्ठ दर्जाचा आहे, अशा नजरेने तुम्ही माझ्याकडे बघितले आहे.
- 1 इतिहास १७:१८सुमारे इ.स.पू. १०४२
“तुम्ही दावीद या आपल्या सेवकाला मोठा सन्मान दिला आहे, तर मी पुढे काय बोलू? आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता.
- 1 इतिहास १७:१९सुमारे इ.स.पू. १०४२
हे याहवेह, तुम्ही आपल्या सेवकासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे हे सर्व महान कार्य केले आहे आणि थोर अभिवचन दिले आहे.
- 1 इतिहास १७:२०सुमारे इ.स.पू. १०४२
“हे याहवेह, तुमच्यासारखे कोणी परमेश्वर नाही. जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार तुमच्याशिवाय कोणीही परमेश्वर नाही.
- 1 इतिहास १७:२१सुमारे इ.स.पू. १०४२
आपल्या इस्राएली लोकांसारखे कोण आहे; पृथ्वीवरील असे एक राष्ट्र, ज्यांच्या परमेश्वरांनी बाहेर जाऊन स्वतःसाठी व तुमच्या नावासाठी इजिप्तमधून त्यांना खंडून घेतले, म्हणजे राष्ट्रे व त्यांची दैवते यांच्यामधून सोडविले व त्यांच्यादेखत आपल्या लोकांसाठी महान व अद्भुत कार्य केले?
- 1 इतिहास १७:२२सुमारे इ.स.पू. १०४२
तुम्ही आपल्या इस्राएली लोकांना सर्वकाळासाठी तुमचे स्वतःचे खास लोक बनविले आहे आणि हे याहवेह तुम्ही त्यांचे परमेश्वर झाला आहात.
- 1 इतिहास १७:२३सुमारे इ.स.पू. १०४२
“तर आता, हे याहवेह, आपला सेवक व त्याच्या घराण्याविषयी जे अभिवचन तुम्ही दिले आहे, ते आपण सर्वकाळासाठी स्थापित करावे. आपण म्हटल्याप्रमाणे ते आपण करावे.
- 1 इतिहास १७:२४सुमारे इ.स.पू. १०४२
यासाठी की ते स्थापित व्हावे आणि तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलवर राज्य करणारे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीदाचे घराणे तुमच्यासमोर स्थापित व्हावे.
- 1 इतिहास १७:२५सुमारे इ.स.पू. १०४२
“हे माझ्या परमेश्वरा, तुम्ही तुमच्या सेवकास प्रकट केले आहे, की तुम्ही त्याच्यासाठी एक घर बांधाल. त्यामुळे आपल्या सेवकाला तुमच्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य आले आहे.
- 1 इतिहास १७:२६सुमारे इ.स.पू. १०४२
याहवेह, परमेश्वर तुम्हीच आहात! तुम्ही आपल्या सेवकासाठी उत्तम गोष्टींचे अभिवचन दिले आहे.