मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे ऐकून, दावीदाने संपूर्ण लढाऊ सैन्यासह योआबाला पाठवले.

  2. तेव्हा अम्मोन्यांचे सैन्य बाहेर आले आणि युद्धाच्या तयारीने त्यांच्या नगराच्या दरवाजाजवळ येऊन थांबले, युद्ध करण्यासाठी आलेले राजे एकीकडे मोकळ्या प्रदेशात एकटेच होते.

  3. शत्रूचे सैन्य आपल्यापुढे व मागे आहे हे योआबाला समजले; तेव्हा त्याने इस्राएली सैन्यातून उत्तम योद्धे निवडले व त्यांना अरामी सैन्याशी लढण्यास पाठविले.

  4. बाकीचे सैन्य त्याने आपला भाऊ अबीशाई याच्या हाती दिले आणि त्यांना अम्मोनी लोकांविरुद्ध लढण्यास पाठविले गेले.

  5. योआब म्हणाला, “जर अरामी सैन्य माझ्यावर भारी झाले तर तुम्ही माझी सुटका करावी; परंतु जर अम्मोनी सैन्य तुझ्यावर भारी झाले तर मी तुला सोडविण्यास येईन.

  6. खंबीर व्हा, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परमेश्वराच्या शहरांसाठी आपण धैर्याने लढू. याहवेहच्या दृष्टीने जे बरे ते याहवेह करतील.”

  7. तेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सैन्य अराम्यांशी लढण्यास पुढे गेले आणि ते अरामी त्याच्यापुढून पळून गेले.

  8. जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा त्यांनी सुद्धा त्याचा भाऊ अबीशाई याच्यापुढून पळ काढून ते शहरात गेले. तेव्हा योआब यरुशलेमास परत गेला.

  9. 1 इतिहास १९:१६सुमारे इ.स.पू. १०३६

    नंतर अरामी लोकांनी पाहिले इस्राएलकडून त्यांचा पराभव झाला आहे, तेव्हा त्यांनी दूत पाठवून फरात नदीच्या पूर्वेकडून अधिक अरामी सैन्य बोलाविले. हादादेजर राजाचा सेनापती शोफख या सेनेचे नेतृत्व करीत होता.

  10. 1 इतिहास १९:१७सुमारे इ.स.पू. १०३६

    याविषयी जेव्हा दावीदाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली सैन्य एकत्र केले आणि यार्देन नदी पार करून शत्रुसैन्याशी युद्ध सुरू केले. दावीदाने पुन्हा युद्धसीमेची खूण तयार केली व अराम्यांविरुद्ध युद्ध केले.

  11. 1 इतिहास १९:१८सुमारे इ.स.पू. १०३६

    परंतु अरामी सैन्यांनी इस्राएल समोरून पळ काढला आणि दावीदाने त्यांच्यातील सात हजार रथस्वारांना व चाळीस हजार पायदळांना ठार मारले. त्याने त्यांचा सेनापती शोफख यालाही ठार केले.

  12. 1 इतिहास १९:१९सुमारे इ.स.पू. १०३६

    जेव्हा हादादेजरच्या जहागीरदारांनी पाहिले की इस्राएलपुढे त्यांचा पराभव झाला, त्यांनी दावीदाशी समेट केला व ते त्याच्या अधीन झाले. यानंतर अरामी लोक पुन्हा कधीही अम्मोन्यांना त्याच्या युद्धामध्ये मदत करण्यास तयार झाले नाही.

  13. 1 इतिहास २०:१सुमारे इ.स.पू. १०३५

    त्याकाळी वसंतॠतूमध्ये, राजे लोक युद्धावर जात असे, योआबाने इस्राएली सैन्याला युद्धासाठी नेले. त्याने अम्मोन्यांची भूमी उद्ध्वस्त केली व राब्बाह शहराला वेढा घातला, परंतु दावीद यरुशलेमात राहिला. योआबने राब्बाहवर हल्ला करून त्याचा नाश केला.

  14. 1 इतिहास २०:२सुमारे इ.स.पू. १०३५

    दावीद तिथे पोहोचला, तेव्हा त्याने राब्बाहचा राजा मिलकोम च्या डोक्यावरील मुकुट काढला—तो मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सोन्याचा एक तालांत होते व त्यावर मोलवान रत्ने जडविलेली होती; तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्याने त्या शहरातून मोठ्या प्रमाणात लूट घेतली.

  15. 1 इतिहास २०:३सुमारे इ.स.पू. १०३५

    आणि त्या शहरातील रहिवाशांना त्याने बाहेर आणले व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयाला लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या सर्व नगरांचे असेच केले. नंतर दावीद व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले.

  16. 1 इतिहास २०:४सुमारे इ.स.पू. १०१८

    कालांतराने, पलिष्ट्यांबरोबर गेजेर येथे युद्ध झाले, सिब्बखय नावाच्या हुशाथी मनुष्याने रेफाईमच्या वंशातील सिप्पय नावाच्या एका मनुष्याला ठार मारले, तेव्हा पलिष्टी शरण आले.

  17. 1 इतिहास २०:५सुमारे इ.स.पू. १०१८

    पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धात याईराचा पुत्र एलहानानने लहमी या गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले, ज्याच्या भाल्याची काठी विणकर्‍याच्या काठीसारखी होती.

  18. 1 इतिहास २०:६सुमारे इ.स.पू. १०१८

    आणखी गथ येथे झालेल्या दुसर्‍या एका युद्धात प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता.

  19. 1 इतिहास २०:७सुमारे इ.स.पू. १०१८

    जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली, तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआचा पुत्र योनाथानने त्याला ठार केले.

  20. 1 इतिहास २०:८सुमारे इ.स.पू. १०१८

    हे गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीद व त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले.

  21. 1 इतिहास २१:१सुमारे इ.स.पू. १०१७

    सैतानाने इस्राएलविरुद्ध आपत्ती आणली, त्याने दावीदाला इस्राएली लोकांची शिरगणती करण्यास चिथाविले.

  22. 1 इतिहास २१:२सुमारे इ.स.पू. १०१७

    म्हणून दावीदाने योआब आणि इतर मुख्य सेनापतींना सांगितले, “जा आणि संपूर्ण इस्राएलींची बेअर-शेबापासून दानापर्यंत शिरगणती करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.”

  23. 1 इतिहास २१:३सुमारे इ.स.पू. १०१७

    परंतु योआबाने उत्तर दिले, “याहवेह आपल्या सैन्याची शंभरपटीने वाढ करो. माझ्या धनीराजा, ती सर्व आपलीच प्रजा नाही का? मग गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात? इस्राएलवर आपण दोष का आणावा?”

  24. 1 इतिहास २१:४सुमारे इ.स.पू. १०१७

    तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; आणि योआब सर्व इस्राएलभर प्रवास करून यरुशलेमास परतला.

  25. 1 इतिहास २१:५सुमारे इ.स.पू. १०१७

    योआबाने दावीदाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: यहूदीयामधील चार लक्ष सत्तर हजार मिळून सर्व इस्राएलमध्ये अकरा लाख धनुर्धारी पुरुष होते.