मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 इतिहास १७:२७सुमारे इ.स.पू. १०४२

    आता आपल्या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद देण्यास तुम्ही प्रसन्न आहात, म्हणजे ते तुमच्या दृष्टीत सदैव राहावे; कारण हे याहवेह, तुम्ही ते आशीर्वादित केले आहे, आणि ते सदैव आशीर्वादित व्हावे.”

  2. 1 इतिहास १८:१सुमारे इ.स.पू. १०४०

    काही काळानंतर, दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्यावर ताबा घेतला आणि गथ व त्याच्या सभोवतालची गावे पलिष्ट्यांच्या ताब्यातून काढून घेतली.

  3. 1 इतिहास १८:२सुमारे इ.स.पू. १०४०

    दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला आणि ते त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले.

  4. 1 इतिहास १८:३सुमारे इ.स.पू. १०४०

    याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची उभारणी करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा हादादेजर याचा हमाथाच्या परिसरात पराभव केला.

  5. 1 इतिहास १८:४सुमारे इ.स.पू. १०४०

    दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वार आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या.

  6. 1 इतिहास १८:५सुमारे इ.स.पू. १०४०

    जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना ठार केले.

  7. 1 इतिहास १८:६सुमारे इ.स.पू. १०४०

    नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथेही गेला, तिथे याहवेहने त्याला विजय दिला.

  8. 1 इतिहास १८:७सुमारे इ.स.पू. १०४०

    हादादेजरचे अधिकारी वाहत असलेल्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या.

  9. 1 इतिहास १८:८सुमारे इ.स.पू. १०४०

    हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ व कून येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. शलोमोनाने हे नंतर वितळविले व मंदिर बांधण्याच्या कामात कास्याची मोठी टाकी, खांब आणि वेदीवरील यज्ञार्पणांसाठी लागणारी उपकरणे बनविण्याच्या उपयोगात आणले.

  10. 1 इतिहास १८:९सुमारे इ.स.पू. १०४०

    हमाथाचा राजा तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने सोबाहचा राजा हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे,

  11. 1 इतिहास १८:१०सुमारे इ.स.पू. १०४०

    तेव्हा त्याने आपला पुत्र हादोरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोऊ यांच्यातही युद्ध होते. हदोरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या सर्वप्रकारच्या वस्तू आणल्या.

  12. 1 इतिहास १८:११सुमारे इ.स.पू. १०४०

    दावीद राजाने या वस्तू, या सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: एदोम आणि मोआब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी.

  13. 1 इतिहास १८:१२सुमारे इ.स.पू. १०४०

    जेरुइयाहचा पुत्र अबीशाईने क्षार खोर्‍यात एदोमाचे अठरा हजार लोक ठार मारले.

  14. 1 इतिहास १८:१३सुमारे इ.स.पू. १०४०

    त्याने एदोमात ठाणे बसविले, आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथेही गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला.

  15. 1 इतिहास १८:१४सुमारे इ.स.पू. १०४०

    दावीदाने संपूर्ण इस्राएलवर राज्य केले व त्याच्या लोकांशी तो न्यायाने व सत्याने वागत असे.

  16. 1 इतिहास १८:१५सुमारे इ.स.पू. १०४०

    जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट नोंदणी करणारा.

  17. 1 इतिहास १८:१६सुमारे इ.स.पू. १०४०

    अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख याजक; शावेशा राजाचा चिटणीस होता.

  18. 1 इतिहास १८:१७सुमारे इ.स.पू. १०४०

    यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य मंत्री होते.

  19. कालांतराने, अम्मोन्यांचा राजा नाहाश मरण पावल्यानंतर त्याचा पुत्र राजा झाला.

  20. दावीदाने विचार केला, “हानूनचा पिता नाहाशने माझ्यावर दया दाखविली होती, तशी दया मी हानूनवर दाखवेन.” म्हणून दावीदाने हानूनच्या पित्याविषयी आपली सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवले. जेव्हा दावीदाचे राजदूत अम्मोनी लोकांच्या प्रदेशात आले,

  21. तेव्हा अम्मोनी अधिकार्‍यांनी हानूनला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे राजदूत पाठवून तुमच्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ देशाची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?”

  22. तेव्हा हानूनने दावीदाच्या राजदूतांना ताब्यात घेऊन, प्रत्येकाचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध नितंबापर्यंत फाडून त्यांना परत पाठवून दिले.

  23. जेव्हा कोणी येऊन दावीदाला त्या माणसांबद्दल सांगितले, तेव्हा दावीदाने त्यांची भेट घेण्यासाठी माणसे पाठवली, कारण त्यांचा मोठा अपमान झाला होता. राजाने म्हटले, “तुमची दाढी वाढेपर्यंत यरीहोतच राहा, मग परत या.”

  24. जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा हानून व अम्मोन्यांनी अराम-नहराईम, अराम-माकाह व सोबाह येथून एक हजार तालांत चांदी देऊन सैन्य, रथ व घोडदळ ही भाड्याने आणली.

  25. त्याने भाड्याने बत्तीस हजार रथ व सारथी आणले. तसेच माकाहचा राजा व त्याचे संपूर्ण सैन्य बोलाविले. त्या सैन्याने मेदबा येथे तळ दिला. अम्मोन्यांनी आपल्या नगरातून भरती केलेल्या सैन्यासह तिथे येऊन युद्धासाठी मोर्चा बांधला.