- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 1 इतिहास १६:२०सुमारे इ.स.पू. १०४२
ते एका देशातून दुसर्या देशात, एका राज्यातून दुसर्या राज्यात भटकत असताना,
- 1 इतिहास १६:२१सुमारे इ.स.पू. १०४२
याहवेहने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्याकरिता त्यांनी राजांना दटाविले:
- 1 इतिहास १६:२२सुमारे इ.स.पू. १०४२
“माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका; माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”
- 1 इतिहास १६:२३सुमारे इ.स.पू. १०४२
हे सर्व पृथ्वी, याहवेहस्तव स्तुतिस्तोत्रे गा, दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा.
- 1 इतिहास १६:२४सुमारे इ.स.पू. १०४२
सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
- 1 इतिहास १६:२५सुमारे इ.स.पू. १०४२
कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत; सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे.
- 1 इतिहास १६:२६सुमारे इ.स.पू. १०४२
इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत. परंतु याहवेहनी आकाशमंडलांची रचना केली आहे.
- 1 इतिहास १६:२७सुमारे इ.स.पू. १०४२
राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात. त्यांच्या उपस्थितीत सामर्थ्य आणि हर्ष असतो.
- 1 इतिहास १६:२८सुमारे इ.स.पू. १०४२
अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.
- 1 इतिहास १६:२९सुमारे इ.स.पू. १०४२
याहवेहच्या नावाला योग्य तो गौरव द्या; अर्पणे आणून त्यांच्या समक्षतेत या. त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा;
- 1 इतिहास १६:३०सुमारे इ.स.पू. १०४२
त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो! सर्व सृष्टी दृढपणे स्थिर झालेली आहे; ती डळमळत नाही.
- 1 इतिहास १६:३१सुमारे इ.स.पू. १०४२
आकाशे हर्ष करोत, पृथ्वी उल्लास करो; त्यांनी राष्ट्रांना हे सांगावे, “याहवेह राज्य करतात!”
- 1 इतिहास १६:३२सुमारे इ.स.पू. १०४२
सागर व त्यातील सर्वकाही गर्जना करोत; शेते व त्यातील सर्वकाही हर्षित होवो!
- 1 इतिहास १६:३३सुमारे इ.स.पू. १०४२
वनातील सर्व झाडे गुणगान करो, आनंदाने याहवेहची स्तुती करा, कारण ते पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहेत.
- 1 इतिहास १६:३४सुमारे इ.स.पू. १०४२
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
- 1 इतिहास १६:३५सुमारे इ.स.पू. १०४२
यांचा धावा करून म्हणा, हे आमच्या परमेश्वरा, आमचे तारण करा; परमेश्वरा, आम्हाला या देशातून सोडवून एकत्र करा, जेणेकरून आम्ही तुमचे पवित्र नाव धन्यवादित करून, तुमच्या स्तवनात गौरव मानावे.
- 1 इतिहास १६:३६सुमारे इ.स.पू. १०४२
इस्राएलचे परमेश्वर याहवेहची, अनादिकालापासून अनंतकालापर्यंत स्तुती होवो. मग सर्व लोकांनी म्हटले “आमेन! याहवेहची स्तुती होवो.”
- 1 इतिहास १६:३७सुमारे इ.स.पू. १०४२
दररोज गरजेप्रमाणे आसाफ आणि त्याचे भाऊबंद यांची याहवेहच्या कोशाची नियमितपणे करारबद्ध सेवा करण्यासाठी दावीदाने नेमणूक केली.
- 1 इतिहास १६:३८सुमारे इ.स.पू. १०४२
तसेच ओबेद-एदोम आणि त्याचे अडुसष्ट नातलग आणि यदूथूनाचा पुत्र ओबेद-एदोम आणि होसाह यांचा द्वारपाल म्हणून समावेश केला.
- 1 इतिहास १६:३९सुमारे इ.स.पू. १०४२
दावीदाने गिबोन टेकडीवरील याहवेहच्या सभामंडपात सादोक याजक आणि त्याचे याजक भाऊबंद सेवा करण्यासाठी ठेवले.
- 1 इतिहास १६:४०सुमारे इ.स.पू. १०४२
ते दररोज, सकाळ व संध्याकाळ, याहवेहने इस्राएली लोकांना दिलेल्या आज्ञेनुसार होमवेदीवर नियमितपणे होमार्पणे करीत होते.
- 1 इतिहास १६:४१सुमारे इ.स.पू. १०४२
त्यांच्यासोबत हेमान, यदूथून आणि नावे घेऊन निवडलेल्या इतर अनेकांची नेमणूक केली. या सर्वांना “याहवेहची प्रीती सनातन आहे” अशी त्यांची उपकारस्तुती करण्यासाठी नेमण्यात आले होते.
- 1 इतिहास १६:४२सुमारे इ.स.पू. १०४२
त्यांच्याबरोबर हेमान आणि यदूथून यांना कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करण्याची जबाबदारी दिली. यदूथूनच्या पुत्रांची द्वारपाल म्हणून नेमणूक करण्यात आली.
- 1 इतिहास १६:४३सुमारे इ.स.पू. १०४२
नंतर सर्व लोक आपापल्या नगरास परत गेले आणि दावीदही आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला.
- 1 इतिहास १७:१सुमारे इ.स.पू. १०४२
जेव्हा दावीद आपल्या राजवाड्यात राहत असताना, त्याने नाथान संदेष्ट्यास म्हटले, “पाहा, येथे मी गंधसरूच्या भवनात राहतो, परंतु याहवेहच्या कराराचा कोश एका तंबूत आहे!”