- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 1 इतिहास १४:१६सुमारे इ.स.पू. १०४७
तेव्हा दावीदाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्टी सैन्याला ठार केले.
- 1 इतिहास १४:१७सुमारे इ.स.पू. १०४७
दावीदाची किर्ती संपूर्ण प्रदेशात पसरत गेली. सर्व राष्ट्रांना त्याचे भय वाटावे असे याहवेहने केले.
- 1 इतिहास १५:१सुमारे इ.स.पू. १०४२
आता दावीदाने स्वतःसाठी दावीद नगर यरुशलेममध्ये भवने बांधली व त्याने परमेश्वराच्या कोशाकरिता एक स्थान सिद्ध करून तिथे एक नवा तंबू ठोकला.
- 1 इतिहास १५:२सुमारे इ.स.पू. १०४२
नंतर दावीदाने म्हटले, “लेव्यांशिवाय इतर कोणीही परमेश्वराचे कोश वाहू नये, कारण याहवेहने त्यांना त्यांचे कोश वाहण्यासाठी निवडले आहे, त्यांची सेवा निरंतर करण्यासाठी निवडले आहे.”
- 1 इतिहास १५:३सुमारे इ.स.पू. १०४२
नंतर याहवेहचा कोश नव्या तंबूत आणण्याच्या समारंभासाठी दावीदाने इस्राएलाच्या सर्व लोकांना यरुशलेममध्ये एकत्र केले.
- 1 इतिहास १५:४सुमारे इ.स.पू. १०४२
दावीदाने अहरोनाच्या वंशजांना आणि लेवींना एकत्र बोलाविले:
- 1 इतिहास १५:५सुमारे इ.स.पू. १०४२
कोहाथी वंशातील, प्रमुख उरीएल व त्याचे 120 भाऊबंद;
- 1 इतिहास १५:६सुमारे इ.स.पू. १०४२
मरारीच्या वंशातील, प्रमुख असायाह व त्याचे 220 भाऊबंद;
- 1 इतिहास १५:७सुमारे इ.स.पू. १०४२
गेर्षोमाच्या वंशातील, प्रमुख योएल व त्याचे 130 भाऊबंद;
- 1 इतिहास १५:८सुमारे इ.स.पू. १०४२
एलीजाफानच्या वंशातील, प्रमुख शमायाह व त्याचे 200 भाऊबंद;
- 1 इतिहास १५:९सुमारे इ.स.पू. १०४२
हेब्रोनाच्या वंशातील, प्रमुख एलीएल व त्याचे 80 भाऊबंद;
- 1 इतिहास १५:१०सुमारे इ.स.पू. १०४२
उज्जीएलाच्या वंशातील, प्रमुख अम्मीनादाब व त्याचे 112 भाऊबंद.
- 1 इतिहास १५:११सुमारे इ.स.पू. १०४२
नंतर दावीदाने सादोक व अबीयाथार या मुख्य याजकांना व उरीएल, असायाह, योएल, शमायाह, एलीएल व अम्मीनादाब या लेवी पुढार्यांना बोलाविणे पाठविले.
- 1 इतिहास १५:१२सुमारे इ.स.पू. १०४२
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी वंशातील कुटुंबप्रमुख आहात; आता तुमच्या सर्व बांधवांसमवेत तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्राएली लोकांच्या याहवेह परमेश्वराचा कोश मी तयार केलेल्या जागेवरील नव्या तंबूत आणावयाचा आहे.
- 1 इतिहास १५:१३सुमारे इ.स.पू. १०४२
याहवेह आपले परमेश्वर आपल्यावर पूर्वी क्रोधाविष्ट झाले, कारण तुम्ही लेवी लोकांनी तो उचलून आणला नाही. नेमून दिलेल्या विधीनुसार आपण कोश कोणत्या पद्धतीने उचलावयाचा यासंबंधी कधी चौकशी केली नाही.”
- 1 इतिहास १५:१४सुमारे इ.स.पू. १०४२
तेव्हा याजक व लेवी यांनी इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचा कोश आणण्यासाठी स्वतःला विधिपूर्वक शुद्ध केले.
- 1 इतिहास १५:१५सुमारे इ.स.पू. १०४२
याहवेह परमेश्वराने मोशेला ज्या सूचना दिल्या होत्या त्याबरहुकूम लेव्यांनी कोशाचे खांब खांद्यांवर घेऊन तो वाहिला.
- 1 इतिहास १५:१६सुमारे इ.स.पू. १०४२
दावीदाने लेवी पुढार्यांना गायकवर्ग व वाद्यवृंद तयार ठेवण्यास सांगितले. या वाद्यवृंदानेः सतार, वीणा व झांजा उच्चस्वराने आणि हर्षाने वाजविल्या.
- 1 इतिहास १५:१७सुमारे इ.स.पू. १०४२
लेवी लोकांनी योएलचा पुत्र हेमान, बेरेख्याहचा पुत्र आसाफ व मरारी कुटुंबातील कुशायाहचा पुत्र एथान, हे प्रमुख वादक नेमले.
- 1 इतिहास १५:१८सुमारे इ.स.पू. १०४२
पुढे नमूद केलेल्या कुटुंबातील लोक त्यांचे सहायक म्हणून नेमले: जखर्याह, बेन, यजिएल, शमिरामोथ, यहीएल, उन्नी, एलियाब, बेनाइयाह, मासेयाह, मत्तिथ्याह, एलीफलेहू, मिकनेयाह. ओबेद-एदोम व ईयेल हे द्वारपाल होते.
- 1 इतिहास १५:१९सुमारे इ.स.पू. १०४२
संगीतकार हेमान, आसाफ व एथान यांना कास्याच्या झांजा वाजविण्यासाठी नेमले होते.
- 1 इतिहास १५:२०सुमारे इ.स.पू. १०४२
जखर्याह, अजीएल, शमिरामोथ यहीएल, उन्नी, एलियाब, मासेयाह व बेनाइयाह यांना अलामोथ या संगीत रागावर सारंगी वाजविण्यास नेमले.
- 1 इतिहास १५:२१सुमारे इ.स.पू. १०४२
मत्तिथ्याह, एलीफलेहू, मिकनेयाह, ओबेद-एदोम, ईयेल, व अजज्याह यांना शमीनीथ सुरावर वीणा वाजविण्यास नेमले होते.
- 1 इतिहास १५:२२सुमारे इ.स.पू. १०४२
लेव्यांचा प्रमुख कनन्याह गायनकर्त्यांना ती जबाबदारी देण्यात आली होती. तो गायनकलेत निपुण होता.
- 1 इतिहास १५:२३सुमारे इ.स.पू. १०४२
बेरेख्याह व एलकानाह हे कोशाचे द्वारपाल होते.