- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 1 इतिहास २२:१सुमारे इ.स.पू. १०१७
मग दावीद म्हणाला, “याहवेह परमेश्वराचे मंदिर व इस्राएलसाठी होमबलीची वेदी याच ठिकाणी असली पाहिजे.”
- 1 इतिहास २२:२सुमारे इ.स.पू. १०१७
दावीदाने इस्राएलमध्ये राहणार्या सर्व परकियांना एकत्र करून परमेश्वराच्या मंदिरासाठी चिरे घडविण्याची आज्ञा दिली.
- 1 इतिहास २२:३सुमारे इ.स.पू. १०१७
प्रवेशद्वारे आणि जोडपट्ट्या यांना लागणारे खिळे तयार करण्यासाठी दावीदाने विपुल प्रमाणात लोखंड, तसेच वजन करता येणार नाही इतका कास्य धातू पुरविला.
- 1 इतिहास २२:४सुमारे इ.स.पू. १०१७
त्याने मोजता येणार नाहीत इतके गंधसरूचे ओंडके पुरविले, कारण सीदोन व सोर येथील लोकांनी ते प्रचंड प्रमाणात दावीदाकडे आणले होते.
- 1 इतिहास २२:५सुमारे इ.स.पू. १०१७
दावीदाने विचार केला, “माझा पुत्र शलोमोन तरुण आणि अननुभवी आहे. याहवेहसाठी जे मंदिर बांधावयाचे आहे, ते संपूर्ण जगात अत्यंत भव्य, प्रसिद्ध व वैभवशाली झाले पाहिजे. म्हणून मी ते बांधण्याची पूर्वतयारी करेन.” त्याप्रमाणे आपल्या मृत्यूपूर्वी दावीदाने पुष्कळ तयारी केली.
- 1 इतिहास २२:६सुमारे इ.स.पू. १०१७
नंतर त्याने त्याचा पुत्र शलोमोनला इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी एक भवन बांधण्याची जबाबदारी दिली.
- 1 इतिहास २२:७सुमारे इ.स.पू. १०१७
दावीद शलोमोनाला म्हणाला, “याहवेह परमेश्वराच्या नावाने मंदिर बांधावयाची माझी मनापासून इच्छा होती,
- 1 इतिहास २२:८सुमारे इ.स.पू. १०१७
परंतु माझ्याकडे याहवेहचा हा संदेश आला, ‘तू अनेक युद्ध करून पुष्कळ रक्त वाहिले आहेस. तू माझ्या नावाचे मंदिर बांधू नकोस, कारण तू या पृथ्वीवर माझ्यासमोर पुष्कळ रक्त वाहिले आहे.
- 1 इतिहास २२:९सुमारे इ.स.पू. १०१७
परंतु तुला एक पुत्र होईल, तो शांतताप्रिय व स्वस्थचित्त मनुष्य असेल. सभोवतालच्या सर्व प्रदेशातील शत्रूपासून मी त्याला विसावा देईन. त्याचे नाव शलोमोन असेल. त्याच्या कारकिर्दीत मी इस्राएलला शांती आणि स्वस्थता देईन.
- 1 इतिहास २२:१०सुमारे इ.स.पू. १०१७
तो माझ्या नावाचे एक मंदिर बांधील. तो माझा पुत्र होईल आणि मी त्याचा पिता होईन. मी इस्राएलावर त्याचे राजासन अनंतकालापर्यंत स्थापन करेन.’
- 1 इतिहास २२:११सुमारे इ.स.पू. १०१७
“आता माझ्या मुला, याहवेह तुझ्याबरोबर असो आणि तुला यश प्राप्त होवो आणि तू ते बांधशील असे त्यांनी सांगितल्याप्रमाणे याहवेह तुझ्या परमेश्वराचे भवन बांध.
- 1 इतिहास २२:१२सुमारे इ.स.पू. १०१७
तुझे याहवेह तुला सुबुद्धी आणि चातुर्य देवो आणि जेव्हा ते तुला इस्राएलवर अधिकार देतील, तुला त्यांच्या नियमशास्त्राचे पालन करण्याची बुद्धी देवो, म्हणजे तू याहवेह तुझ्या परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करशील.
- 1 इतिहास २२:१३सुमारे इ.स.पू. १०१७
याहवेहने इस्राएली लोकांना मोशेद्वारे दिलेल्या नियमांचे तू काळजीपूर्वक पालन करशील, तर तू यशस्वी होशील. बलवान हो, धैर्यवान हो. भयभीत आणि निराश होऊ नको.
- 1 इतिहास २२:१४सुमारे इ.स.पू. १०१७
“मी अत्यंत परिश्रम करून याहवेहच्या मंदिरासाठी एक लाख तालांत सोने, दहा लाख तालांत चांदी जमा केली आहे. कास्य आणि लोखंड अगणित प्रमाणात आहेत आणि लाकूड आणि दगडही आहेत. आणि तुलाही त्यात भर घालता येईल.
- 1 इतिहास २२:१५सुमारे इ.स.पू. १०१७
तुझ्याजवळ पुष्कळ कारागीर आहेत: दगड घडविणारे, गवंडी, सुतार आणि प्रत्येक प्रकारचे कामगार.
- 1 इतिहास २२:१६सुमारे इ.स.पू. १०१७
सोने आणि चांदी, कास्य आणि लोखंड—याचे अगणित कारागीर आहेत. आता काम करण्यास सुरू कर, याहवेह तुझ्याबरोबर असो.”
- 1 इतिहास २२:१७सुमारे इ.स.पू. १०१७
नंतर दावीदाने इस्राएलाच्या सर्व पुढार्यांना आपला पुत्र शलोमोनला या कामी मदत करण्याची आज्ञा दिली.
- 1 इतिहास २२:१८सुमारे इ.स.पू. १०१७
तो त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर नाहीत का? त्यांनी सर्व क्षेत्रात तुम्हाला स्वस्थता दिली नाही का? कारण त्यांनी या प्रदेशाच्या लोकांना माझ्या अधीन केले व या भूमीवर याहवेहचा व त्यांच्या लोकांचा अधिकार आहे.
- 1 इतिहास २२:१९सुमारे इ.स.पू. १०१७
आता तुमच्या याहवेह परमेश्वराला शोधण्याकरिता तुम्ही आपले अंतःकरण आणि आपला जीव लावा. आणि याहवेह परमेश्वराचे मंदिर बांधा म्हणजे याहवेहच्या नामाप्रीत्यर्थ जे मंदिर बांधण्यात येणार आहे, त्यात तुम्हाला याहवेहच्या कराराचा कोश आणि परमेश्वराची पवित्र पात्रे आणता येतील.”
- 1 इतिहास २३:१सुमारे इ.स.पू. १०१५
जेव्हा दावीद वृद्ध व वयातीत झाला, तेव्हा त्याने आपला पुत्र शलोमोनला इस्राएलचा राजा बनविले.
- 1 इतिहास २३:२सुमारे इ.स.पू. १०१५
त्याने इस्राएलांच्या सर्व पुढार्यांना आणि लेवी व याजकांना एकत्र केले.
- 1 इतिहास २३:३सुमारे इ.स.पू. १०१५
तीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लेव्यांची शिरगणती करण्यात आली. त्यांची संख्या अडतीस हजार भरली.
- 1 इतिहास २३:४सुमारे इ.स.पू. १०१५
दावीद म्हणाला, “यापैकी चोवीस हजार लेव्यांनी याहवेहच्या मंदिराच्या कामावर मुकादम म्हणून देखरेख करावी, सहा हजार लोकांनी न्यायाधीशांची आणि अंमलदारांची कामे करावी.
- 1 इतिहास २३:५सुमारे इ.स.पू. १०१५
चार हजार लोकांनी मंदिराच्या द्वारपालांचे काम करावे आणि चार हजार लोकांनी मी पुरवठा केलेली वाद्ये वाजवून याहवेहचे स्तुतिगान करावे.”
- 1 इतिहास २३:६सुमारे इ.स.पू. १०१५
नंतर दावीदाने लेवींची विभागणी करून त्यांचे त्यांच्या संततीनुसार भाग पाडले: गेर्षोन, कोहाथ व मरारी.