मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 इतिहास २३:७सुमारे इ.स.पू. १०१५

    गेर्षोनीचे विभाग: लादान व शिमी.

  2. 1 इतिहास २३:८सुमारे इ.स.पू. १०१५

    लादानाचे पुत्र: यात यहीएल हा ज्येष्ठ, जेथाम व योएल—सर्व मिळून तीन.

  3. 1 इतिहास २३:९सुमारे इ.स.पू. १०१५

    शिमीचे पुत्र: शेलोमीथ, हजिएल व हारान; सर्व मिळून तीन. (हे लादानाचे कुटुंबप्रमुख.)

  4. 1 इतिहास २३:१०सुमारे इ.स.पू. १०१५

    शिमीचे पुत्र: यहथ, जीजा, यऊश आणि बरीयाह. हे शिमीचे पुत्र; सर्व मिळून चार.

  5. 1 इतिहास २३:११सुमारे इ.स.पू. १०१५

    (यहथ हा ज्येष्ठ होता, जीजाह हा दुसरा होता, परंतु यऊश आणि बरीयाह यांना पुष्कळ पुत्र नव्हते; म्हणून ते एकच कुटुंब म्हणून ओळखले जात.)

  6. 1 इतिहास २३:१२सुमारे इ.स.पू. १०१५

    कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल; सर्व मिळून चार पुत्र.

  7. 1 इतिहास २३:१३सुमारे इ.स.पू. १०१५

    अम्रामचे पुत्र: अहरोन व मोशे. अहरोनाला आणि त्याच्या वंशाला सर्वकाळाकरिता वेगळे करण्यात आले, जेणेकरून त्यांनी याहवेहसाठी अतिपवित्र वस्तू अर्पण करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी व त्यांच्या नावाने अनंतकालाकरिता आशीर्वाद द्यावे.

  8. 1 इतिहास २३:१४सुमारे इ.स.पू. १०१५

    परमेश्वराचा मनुष्य मोशे याच्या पुत्रांचाही समावेश लेवीच्या गोत्रात केला होता.

  9. 1 इतिहास २३:१५सुमारे इ.स.पू. १०१५

    मोशेचे पुत्र: गेर्षोम व एलिएजर.

  10. 1 इतिहास २३:१६सुमारे इ.स.पू. १०१५

    गेर्षोमाचे वंशज: शबुएल प्रथमपुत्र होता.

  11. 1 इतिहास २३:१७सुमारे इ.स.पू. १०१५

    एलिएजरचे वंशज: रहब्याह प्रथमपुत्र होता. (एलिएजरला दुसरा पुत्र नव्हता, परंतु रहब्याहाला पुष्कळ पुत्र झाले.)

  12. 1 इतिहास २३:१८सुमारे इ.स.पू. १०१५

    इसहारचे पुत्र: शेलोमीथ प्रथमपुत्र होता.

  13. 1 इतिहास २३:१९सुमारे इ.स.पू. १०१५

    हेब्रोनाचे पुत्र: यरीयाह हा प्रथमपुत्र होता, अमर्‍याह दुसरा, यहजिएल तिसरा आणि यकमाम चौथा.

  14. 1 इतिहास २३:२०सुमारे इ.स.पू. १०१५

    उज्जीएलाचे पुत्र: मीखाह हा प्रथमपुत्र व इश्शीयाह दुसरा.

  15. 1 इतिहास २३:२१सुमारे इ.स.पू. १०१५

    मरारीचे पुत्र: महली व मूशी. महलीचे पुत्र: एलअज़ार व कीश.

  16. 1 इतिहास २३:२२सुमारे इ.स.पू. १०१५

    एलअज़ारला पुत्र नव्हता: त्याला फक्त कन्याच होत्या. त्यांचे चुलतभाऊ कीशपुत्र यांनी त्यांच्याशी विवाह केले.

  17. 1 इतिहास २३:२३सुमारे इ.स.पू. १०१५

    मूशीचे पुत्र: महली, एदर व यरेमोथ; सर्व मिळून तीन.

  18. 1 इतिहास २३:२४सुमारे इ.स.पू. १०१५

    लेव्याच्या शिरगणतीमधील सर्व लेवी पुरुष—ज्या कुटुंब प्रमुखांची नावे समाविष्ट केली व त्यांची नावनोंदणी झाली, जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते, त्या सर्वांना याहवेहच्या मंदिरात सेवाकार्य दिले गेले.

  19. 1 इतिहास २३:२५सुमारे इ.स.पू. १०१५

    कारण दावीद म्हणाला होता, “इस्राएलाच्या याहवेह परमेश्वराने आम्हाला विश्रांती दिली आहे आणि यरुशलेमात निरंतर निवास करण्यास ते आले आहेत.

  20. 1 इतिहास २३:२६सुमारे इ.स.पू. १०१५

    म्हणून लेव्यांना निवासमंडप व इतर सर्व सेवा साधने एका जागेवरून दुसर्‍या जागी नेण्याची गरज राहणार नाही.”

  21. 1 इतिहास २३:२७सुमारे इ.स.पू. १०१५

    दावीदाच्या शेवटच्या सूचनेनुसार, वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लेवींची शिरगणती केली गेली.

  22. 1 इतिहास २३:२८सुमारे इ.स.पू. १०१५

    लेव्यांचा कार्यभाग, अहरोनाच्या वंशजांना याहवेहच्या मंदिराच्या सेवेत याप्रमाणे मदत करावी: अंगणाची देखरेख, इतर खोल्यांची देखरेख, सर्व पवित्र वस्तूंचे शुद्धीकरण आणि परमेश्वराच्या भवनातील इतर कामे करणे.

  23. 1 इतिहास २३:२९सुमारे इ.स.पू. १०१५

    त्यांना समक्षतेची भाकर टेबलावर ठेवणे, अन्नार्पणांसाठी लागणारे विशिष्ट सपीठ ठेवणे, बेखमीर पापड्या तयार करणे, भाजणे व मिश्रण तयार करणे व सर्व वजन आणि मापाचे प्रमाण बघणे या जबाबदाऱ्या होत्या.

  24. 1 इतिहास २३:३०सुमारे इ.स.पू. १०१५

    दररोज सकाळी याहवेहसमोर उभे राहून ते उपकारस्तुतीचे स्तवनगान करीत असत व संध्याकाळीही ते हीच कामे करीत.

  25. 1 इतिहास २३:३१सुमारे इ.स.पू. १०१५

    शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या दिवशी आणि इतर सणांमध्ये विशेष होमार्पणाच्या कामात ते नित्यनेमाने याहवेहची सेवा त्यांना नेमून दिल्यानुसार करीत होते.