मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 इतिहास ११:४२सुमारे इ.स.पू. १०५५

    शीझाचा पुत्र अदीना, तो रऊबेनच्या गोत्रातील एकतीस पुढार्‍यांपैकी एक होता.

  2. 1 इतिहास ११:४३सुमारे इ.स.पू. १०५५

    माकाहचा पुत्र हानान, मिथनी योशाफाट,

  3. 1 इतिहास ११:४४सुमारे इ.स.पू. १०५५

    अष्टराथी उज्जिया, अरोएर येथील होथामाचे पुत्र शामा व ईयेल,

  4. 1 इतिहास ११:४५सुमारे इ.स.पू. १०५५

    शिम्रीचा पुत्र यदिएल, व तीसा येथील त्याचा भाऊ योहा,

  5. 1 इतिहास ११:४६सुमारे इ.स.पू. १०५५

    महवी येथील एलीएल, व एलानामाचे पुत्र यरीबय व योशव्याह, मोआबी इथ्माह,

  6. 1 इतिहास ११:४७सुमारे इ.स.पू. १०५५

    मसोबी एलीएल, ओबेद आणि यासीएल.

  7. कीशाचा पुत्र शौलाच्या सानिध्यातून हद्दपार केलेले असताना दावीदाला सिकलाग येथे येऊन मिळालेले योद्धे (ज्यांनी त्याला युद्धात साहाय्य केले त्या योद्ध्यांपैकी असलेले;

  8. हे सर्वच धनुर्धारी वीर असून आपल्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे व धनुष्‍यबाण मारण्यात प्रवीण होते. ते सर्वच बिन्यामीन गोत्रातील आणि शौल राजाचे नातलग होते):

  9. त्यातील प्रमुख शमाहाचे पुत्र अहीएजर व त्याचा भाऊ योआश, हे गिबियाहचे रहिवासी होते. अजमावेथचे पुत्र यजिएल व पेलेट, बेराखाह व अनाथोथचा रहिवासी येहू.

  10. इश्मायाह हा गिबोनी होता. हा तीस वीरांतील अत्यंत शूरवीर असून त्या तिसांवरील मुख्य होता. यिर्मयाह, यहजिएल, योहानान, गदेराथी योजाबाद,

  11. एलूजय, यरिमोथ, बाल्या, शमारियाह व हरूफी शफात्याह,

  12. एलकानाह, इश्शीयाह, अजरएल, योबेजर व याशबआम हे सर्व कोरही वंशज होते.

  13. योएलाह व जबद्याह हे गदोर येथील यरोहामाचे पुत्र होते.

  14. गादचे महान शूर वीरसुध्दा फितूर होऊन दावीद अरण्यवासात असताना त्याच्याकडे गेले. ते ढाली व भाले वापरण्यात निष्णात होते. त्यांचे चेहरे सिंहाच्या मुखासारखे असून ते डोंगरावरील हरणांसारखे चपळ होते.

  15. एजेर हा त्यांचा प्रमुख सेनाधिकारी होता. ओबद्याह त्यांचा उपप्रमुख, एलियाब तिसरा,

  16. मिश्मन्नाह चौथा, यिर्मयाह पाचवा,

  17. अत्तय सहावा, एलीएल सातवा,

  18. योहानान आठवा, एलजाबाद नववा,

  19. यिर्मयाह दहावा आणि मखबन्नय अकरावा.

  20. हे गाद गोत्राचे असून सैन्यातील अधिकारी होते; त्यातील जो सर्वात कनिष्ठ होता, तो शंभरांच्या तोडीचा होता व सर्वात ज्येष्ठ हजाराच्या तोडीचा.

  21. वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असताना त्यांनी ती ओलांडली आणि नदीच्या खोर्‍यांत राहणार्‍या लोकांची त्यांनी पूर्वेकडे व पश्चिमेकडे दाणादाण उडविली.

  22. बिन्यामीन व यहूदाह गोत्रातील दुसरे काहीजण दावीदाकडे गडावर आले.

  23. दावीद त्यांच्या भेटीसाठी बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही मला मदत करावयास शांतीने आला असाल, तर तुम्हाला सहभागी करण्यास मी तयार आहे. पण मी निरपराध असताना मला शत्रूंच्या हवाली करण्यासाठी, माझा विश्वासघात करावयास तुम्ही आला असाल, तर आपल्या पूर्वजांचा परमेश्वर तुम्हाला पाहून घेईल व तुमचा न्याय करेल.”

  24. तेव्हा त्या तिसांचा पुढारी अमासयवर पवित्र आत्मा आला आणि अमासय म्हणाला: “दावीद महाराज, आम्ही तुमचे आहोत! अहो इशायपुत्र, आम्ही तुमच्या बाजूचे आहोत! तुम्हाला शांती, कल्याण लाभो, आणि जे तुम्हाला मदत करतील, त्या सर्वांना यश लाभो. कारण तुमचे परमेश्वर तुम्हाला मदत करतील.” मग दावीदाने त्यांचा स्वीकार केला आणि त्यांना आपल्या गनिमी युद्धाच्या सेनेवर अधिकारी नेमले.

  25. आणि दावीद पलिष्ट्यांशी शौलाच्या विरुद्ध लढायला गेला तेव्हा मनश्शेह गोत्रातीलही काही लोक दावीदाकडे फितूर झाले. (तरीही दावीद आणि त्याच्या माणसांनी पलिष्ट्यांची मदत केली नाही, कारण सल्लामसलत करून त्यांच्या अधिकार्‍यांनी त्याला पाठवून दिले. ते म्हणाले, “जर आपला धनी शौल याकडे तो फितूर झाला तर आमची शिरे धोक्यात जातील.”)