मुख्य मजकुरावर जा

Prophets बद्दल बायबलमधील वचने

655 वचने · 128 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “आता हे आमच्या परमेश्वरा, आपल्या दासाची प्रार्थना आणि विनवणी ऐका. याहवेह, उजाड झालेल्या तुमच्या पवित्रस्थानावर तुमचे मुखतेज पडू द्या.

  2. हे आमच्या परमेश्वरा कान द्या आणि ऐका; आपले डोळे उघडा आणि ज्या नगरास तुमचे नाव दिले आहे ते कसे उद्ध्वस्त झाले आहे ते पाहा. आम्ही नीतिमान आहोत म्हणून विनवणी करीत आहोत असे नाही, परंतु तुमची दया विपुल आहे.

  3. हे याहवेह, ऐका! हे याहवेह, क्षमा करा! हे याहवेह, ऐका आणि कृती करा. अहो माझ्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या स्वतःकरिता विलंब करू नका, कारण तुमच्या नगराला आणि तुमच्या लोकांना तुमचे नाव दिले आहे.”

  4. जेव्हा मी माझे पाप आणि आपल्या इस्राएली लोकांचे पाप कबूल करीत बोलत आणि प्रार्थना करीत होतो आणि याहवेह माझ्या परमेश्वर यांची त्यांच्या पवित्र डोंगरासाठी प्रार्थना करीत होतो;

  5. जेव्हा मी प्रार्थना करीतच होतो, गब्रीएल ज्याला मी आधीच्या दृष्टान्तात पाहिले होते, संध्याकाळच्या अर्पणासमयी माझ्याकडे आला;

  6. त्याने मला समज दिली आणि मला म्हटले, “दानीएला, आता मी तुला ज्ञान आणि समज देण्यासाठी आलो आहे.

  7. हा दृष्टान्त केवळ मला, दानीएललाच दिसला; जे माझ्याबरोबर होते, त्यांना तो दिसला नाही, परंतु त्यांना अतिशय भीतीने ग्रासले व लपण्यासाठी ते पळून गेले.

  8. मग मी एकटाच राहिलो आणि हा महान दृष्टान्त पहात राहिलो; माझ्यात शक्ती उरली नाही, माझा चेहरा पांढराफटक पडला आणि मी असहाय्य झालो.

  9. नंतर मी त्याला बोलताना ऐकले आणि मी जमिनीवर पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली.

  10. “रोजचे यज्ञार्पण बंद होईल व ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापित होईल तेव्हापासून 1,290 दिवस लोटतील.

  11. यहूदाहचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज, हिज्कीयाह आणि इस्राएलचा राजा, योआशचा पुत्र यरोबोअम यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय याच्याकडे याहवेहचे जे वचन आले ते हे:

  12. जेव्हा याहवेहने प्रथम होशेयद्वारे बोलण्यास प्रारंभ केला, तेव्हा याहवेह त्याला म्हणाले, “जा आणि एखाद्या व्यभिचारी स्त्रीबरोबर विवाह कर आणि तिच्यापासून लेकरे जन्माला घाल. कारण हा देश एका व्यभिचारी पत्नीप्रमाणे याहवेहशी अविश्वासूपणाचा दोषी आहे.”

  13. म्हणून त्याने दिब्लाइमाची कन्या गोमेर हिच्याशी विवाह केला आणि ती गरोदर राहिली. तिने त्याच्या पुत्राला जन्म दिला.

  14. तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “त्याचे नाव येज्रील ठेव, कारण मी लवकरच येहूच्या घराण्याला येज्रीलच्या रक्ताबद्दल शिक्षा देईन आणि मी इस्राएल राज्याचा शेवट करेन.

  15. त्या दिवशी येज्रीलच्या खोर्‍यात मी इस्राएलचे धनुष्य मोडून टाकीन.”

  16. गोमेर पुन्हा गर्भवती झाली आणि तिने कन्येला जन्म दिला. तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “हिचे नाव लो-रुहामा असे ठेव, कारण येथून पुढे त्यांना क्षमा करावी अशी प्रीती मी इस्राएलवर दाखविणार नाही.

  17. पण मी यहूदीयाच्या वंशावर मी प्रीती करेन; आणि मी त्यांना वाचवेन—धनुष्य, तलवार किंवा युद्ध, किंवा घोडे आणि घोडेस्वार यांच्याद्वारे नाही, परंतु मी याहवेह त्यांचा परमेश्वर, त्यांना वाचवेन.”

  18. लो-रुहामाचे दूध तोडल्यावर गोमेरने आणखी एका पुत्राला जन्म दिला.

  19. तेव्हा याहवेह म्हणाले, “याचे नाव लो-अम्मी असे ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाहीत आणि मी तुमचा परमेश्वर नाही.

  20. मी संदेष्ट्यांबरोबर बोललो, त्यांना अनेक दृष्टान्त दिले आणि त्यांच्याद्वारे दाखले सांगितले.”

  21. पेथूएलचा पुत्र योएलकडे याहवेहचे वचन आले.

  22. “आणि त्यानंतर, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी सांगतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.

  23. माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन.

  24. तकोवा येथील एक मेंढपाळ आमोसाची वचने—त्याने उज्जीयाह यहूदाहचा आणि योआश चा पुत्र यरोबोअम इस्राएलचा राजा असता, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाबद्दल जे दृष्टान्तामध्ये पाहिले ते हे.

  25. “पण तुम्ही नाजीरांना द्राक्षारस पिण्यास आणि संदेष्ट्यांना भविष्य न सांगण्याची आज्ञा दिली.