Skip to content

Prophets बद्दल बायबलमधील वचने: Inspired by angels

7 वचने · 128 पैलू

Inspired by angels बद्दल वचने

  1. मी विचारले, “माझ्या प्रभू, हे सर्व काय आहे?” एक स्वर्गदूत जो माझ्याशी बोलत होता, त्याने उत्तर दिले, “ते काय आहे हे मी तुला दाखवेन.”

  2. तेव्हा माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला याहवेहने सांत्वनपर व आश्वासनदायक उत्तर दिले.

  3. मग माझ्याशी संवाद करीत असलेला याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “या वचनाची घोषणा कर: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘मी यरुशलेम व सीयोनाबाबत अत्यंत ईर्ष्यावान आहे,

  4. मी माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला विचारले, “हे काय आहे?” त्याने उत्तर दिले, “ही शिंगे आहेत, ज्यांनी यहूदीया, इस्राएल आणि यरुशलेम येथील लोकांची पांगापांग केली.”

  5. आणि देवदूतांद्वारे मिळालेल्या परमेश्वराच्या नियमांचाही तुम्ही जाणूनबुजून भंग केला.”

  6. तर मग नियमशास्त्र कशासाठी देण्यात आले? ज्या संतानाला त्यांचे अभिवचन दिलेले होते, त्यांचे आगमन होईपर्यंत उल्लंघन काय आहे हे समजण्यासाठी हे लावून दिले होते. आपले नियम देवदूतांद्वारे मध्यस्थाला सोपवून दिले.

  7. कारण ज्याअर्थी देवदूतांद्वारे सांगितलेला संदेश स्थिर होता आणि प्रत्येक आज्ञेचे उल्लंघन व आज्ञाभंग करणार्‍यांना योग्य शिक्षा मिळाली.