Skip to content

Prophets बद्दल बायबलमधील वचने: Called Seers

11 वचने · 128 पैलू

Called Seers बद्दल वचने

  1. “मीच पाहाणारा आहे,” शमुवेलने शौलास उत्तर दिले. “माझ्यापुढे वर उंचस्थानी जा, कारण आज तुला माझ्याबरोबर भोजन करावयाचे आहे आणि सकाळी मी तुला तुझ्या मार्गाने पाठवून देईन आणि जे तुझ्या अंतःकरणात आहे ते मी तुला सांगेन.

  2. राजाने सादोक याजकाला आणखी पुढे म्हटले, “तुला कळते की नाही? माझ्या आशीर्वादासह नगरात परत जा. तुझा पुत्र अहीमाज आणि अबीयाथारचा पुत्र योनाथान यांना सोबत घेऊन जा. तू आणि अबीयाथार तुमच्या दोन्ही पुत्रांसह परत या.

  3. दुसर्‍या दिवशी सकाळी दावीद उठण्यापूर्वी, दावीदाचा द्रष्टा, गाद संदेष्टा, याच्याकडे याहवेहचे वचन आले:

  4. याहवेहने इस्राएल आणि यहूदीयाला सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे चेतावणी दिली होती: “तुमच्या दुष्ट मार्गापासून परावृत्त व्हा. मी तुमच्या पूर्वजांना आज्ञा दिलेल्या आणि माझ्या सेवक संदेष्ट्यांद्वारे तुमच्यापर्यंत पाठविलेल्या संपूर्ण नियमानुसार माझ्या आज्ञा व विधीचे पालन करा.”

  5. द्वारपालांच्या कामासाठी 212 लोक निवडले होते. त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांची नोंद केलेली होती. विश्वासयोग्यता पाहून त्यास दावीद व शमुवेल संदेष्टा यांनी त्या कामगिरीवर नेमले होते.

  6. दावीद राजाच्या कारकिर्दीतील घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत द्रष्टा शमुवेल, संदेष्टा नाथान आणि द्रष्टा गाद यांच्या ग्रंथात लिहिल्या आहेत.

  7. शलोमोनच्या राज्यकाळातील इतर घटनांबद्दल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ते नाथान संदेष्ट्याच्या नोंदीमध्ये, शिलोनी अहीयाहच्या भविष्यवाणीमध्ये आणि नेबाटाचा पुत्र यरोबोअमविषयी इद्दो संदेष्ट्याच्या दृष्टान्तात लिहिलेल्या नाहीत का?

  8. रेहोबोअमच्या कारकिर्दीतील घटनांबद्दल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, शमायाह संदेष्टा आणि इद्दो द्रष्टा यांनी तयार केलेल्या वंशावळीत त्या लिहिलेल्या नाहीत काय? रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले.

  9. राजा हिज्कीयाह आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी लेवींना दावीद आणि संदेष्टा आसाफ यांच्या शब्दांमध्ये याहवेहची स्तुती करण्याचा आदेश दिला. म्हणून त्यांनी आनंदाने स्तुतिगीते गायली आणि खाली वाकून आराधना केली.

  10. दृष्टान्त पाहणाऱ्यांना ते असे म्हणतात, “यापुढे दृष्टान्त पाहू नका!” आणि संदेष्ट्यांना म्हणतात, “यापुढे काय योग्य आहे, याबद्दल आम्हाला दर्शन देऊ नका! आनंद देणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगा, भ्रामक कल्पना असलेली भविष्यवाणी करा.

  11. द्रष्ट्यांना लाज वाटेल आणि दैवप्रश्न करणारे फजीत होतील. ते सर्व आपली मुखे झाकतील कारण त्यांना परमेश्वराकडून उत्तर आलेले नाही.”