मुख्य मजकुरावर जा

Prophets बद्दल बायबलमधील वचने: Felt deeply on account of the calamities which they predicted

10 वचने · 128 पैलू

Felt deeply on account of the calamities which they predicted बद्दल वचने

  1. म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी याजेरसह मीही रडतो. हेशबोन आणि एलिआलेह, मी तुम्हाला अश्रूंनी भिजवितो! तुमच्या पिकलेल्या फळांसाठी आणि तुमच्या कापणीच्या आनंदाचा जयघोष शांत झाला आहे.

  2. फळबागेतून आनंद आणि हर्ष काढून घेतला आहे; द्राक्षमळ्यात कोणीही गाणे गात नाही किंवा हर्षनाद करत नाही; कोणीही द्राक्षकुंडातून द्राक्षारस काढीत नाही, कारण मी हर्षनाद करणे संपवून टाकले आहे.

  3. माझे हृदय वीणेप्रमाणे मोआबसाठी विलाप करीत आहे, कीर-हरेसेथसाठी माझे अंतःकरण विलाप करीत आहे.

  4. हाय, हाय! माझे मस्तक पाण्याचे एक स्त्रोत आणि माझे डोळे एक अश्रूंचा झरा असता! तर मी रात्रंदिवस सारखे अश्रू ढाळीत माझ्या घात केलेल्या लोकांकरिता विलाप केला असता.

  5. बरे झाले असते, जर ओसाड रानात माझ्याकडे या यात्रेकरूंकरिता एखादे आश्रयस्थान असते. जेणेकरून मी माझ्या लोकांचा त्याग करून त्यांच्यापासून दूर गेलो असतो; कारण ते सर्वजण व्यभिचारी आहेत, विश्वासघातकी लोकांचा एक जमाव.

  6. “ते आपल्या जिभांना खोट्या शब्दांचा प्रहार करण्यासाठी धनुष्यांप्रमाणे तयार करतात; ते सत्याने या भूमीत विजय मिळवित नाहीत. ते एका पापापासून दुसऱ्या पापाकडे धाव घेतात ते माझ्या अस्तित्वाची दखल घेत नाहीत,” असे याहवेह जाहीर करतात.

  7. “तुमच्या मित्रांपासून सावध राहा; तुमच्या भाऊबंदावर भरवसा करू नका. कारण त्यांच्यातील प्रत्येकजण फसविणारा आहे, व प्रत्येक मित्र निंदा करणारा आहे.

  8. मित्र मित्रास फसवितो, आणि कोणीही सत्य बोलत नाही. त्यांनी त्यांच्या जिभेला खोटे बोलणे शिकविले आहे; अगदी दमून जाईपर्यंत ते पाप करीत राहतात.

  9. तू फसवणुकीच्या मध्ये आपले निवास बनविले आहे; त्यांच्या या कपटामुळे ते माझे अस्तित्व नाकारतात,” असे याहवेह म्हणतात.

  10. म्हणून सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी यांना शुद्ध करेन व पारखेन, याशिवाय यांचे मी दुसरे काय करणार याचे कारण माझ्या लोकांची पापेच नव्हे काय?