Skip to content

Prophets बद्दल बायबलमधील वचने: Schools of

17 वचने · 128 पैलू

Schools of बद्दल वचने

  1. याहवेहच्या शब्दानुसार संदेष्ट्यांच्या एका मंडळीतील एक संदेष्टा आपल्या साथीदाराला म्हणाला, “आपल्या शस्त्राने माझ्यावर वार कर,” परंतु त्याने नकार दिला.

  2. तिथे बेथेलातील संदेष्ट्यांचा एक समूह अलीशाकडे आला आणि विचारले, “आज याहवेह तुझ्या स्वामीला तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?” अलीशाने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.”

  3. नंतर एलीयाह त्याला म्हणाला, “अलीशा तू येथेच राहा; कारण याहवेह मला यरीहोस पाठवित आहे.” आणि त्याने म्हटले, “मी याहवेहची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघेही यरीहोला गेले.

  4. तिथे यरीहोच्या संदेष्ट्यांचा एक समूह अलीशास म्हणाला, “आज तुझ्या स्वामीला याहवेह तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?” त्याने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.”

  5. मग एलीयाह अलीशास म्हणाला, “तू येथेच राहा; कारण याहवेह मला यार्देनला पाठवित आहेत.” आणि त्याने उत्तर दिले, “मी याहवेहची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला सोडणार नाही.” मग ते दोघेही पुढे चालले.

  6. संदेष्ट्यांच्या सभेतील पन्नास लोकांचा समूह त्यांच्याजवळ आला आणि दूर थांबला व जिथे एलीयाह आणि अलीशा यार्देनजवळ थांबले होते, त्या दिशेने तोंड करून उभा राहिला.

  7. तिथे एलीयाहने आपल्या झग्याची घडी केली आणि ती पाण्यावर मारली. तेव्हा पाणी उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि ते दोघे कोरड्या भूमीवरून चालत पैलतीराला गेले.

  8. ते पार गेल्यावर एलीयाह अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून घेतले जाण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करावे ते मला सांग?” “अलीशाने उत्तर दिले, तुमच्यामध्ये असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”

  9. एलीयाह म्हणाला, “तू एक कठीण गोष्ट मागितली आहेस; तरी देखील जेव्हा तू मला तुझ्यापासून दूर जात असताना पाहिलेस, तर ते तुझे होईल; अन्यथा ते होणार नाही.”

  10. ते एकत्र असे बोलत चालत असताना, अचानक अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे प्रगट झाले आणि त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे केले आणि वावटळीद्वारे एलीयाह स्वर्गात वर घेतला गेला.

  11. अलीशाने हे पाहिले आणि आरोळी मारली, “हे माझ्या पित्या! माझ्या पित्या! अहो इस्राएलांच्या रथांनो आणि इस्राएलांच्या सारथ्यांनो!” आणि अलीशा त्याला पुन्हा पाहू शकला नाही. तेव्हा अलीशाने आपला झगा फाडला आणि त्याचे दोन तुकडे केले.

  12. तेव्हा अलीशाने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा उचलला आणि तो यार्देन काठी परत गेला आणि उभा राहिला.

  13. त्याने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा घेतला आणि पाण्यावर मारला. “एलीयाहचा याहवेह परमेश्वर कुठे आहेत?” जेव्हा त्याने झग्याने पाण्यावर मारले तेव्हा पाणी हे उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि अलीशा पैलतीरावर गेला.

  14. यरीहोतील संदेष्ट्यांचा एक समूह, जो हे पाहत होता म्हणाला, “एलीयाहचा आत्मा अलीशावर उतरला आहे.” ते त्याला भेटण्यास गेले आणि भूमीपर्यंत लवून त्याला नमन केले.

  15. संदेष्ट्यांच्या समुहातील एका मनुष्याची पत्नी रडून अलीशाला म्हणाली, “तुमचा सेवक माझा पती मरण पावला आहे आणि तुम्हाला माहीत आहे तो याहवेहचे भय बाळगणारा होता. पण आता त्याचा सावकार माझ्या दोन मुलांना त्याचे गुलाम व्हावे म्हणून घ्यायला येत आहे.”

  16. अलीशा गिलगाल येथे परत आला आणि त्या भागात दुष्काळ पडला होता. संदेष्ट्यांचा समूह त्याच्यापुढे बसलेला होता, त्याने आपल्या सेवकास म्हटले, “चुलीवर मोठे भांडे ठेऊन या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.”

  17. इकडे अलीशा संदेष्ट्याने एका तरुण संदेष्ट्याला संदेष्ट्यांच्या समुहातून बोलाविले आणि त्याला म्हटले, “तू आपली कंबर बांध, जैतून तेलाची कुपी बरोबर घे आणि रामोथ गिलआद येथे जा.