मुख्य मजकुरावर जा

Prophets बद्दल बायबलमधील वचने: The sacred bards of the Jews

5 वचने · 128 पैलू

The sacred bards of the Jews बद्दल वचने

  1. तेव्हा अहरोनाची बहीण, मिर्याम संदेष्टी, हिने हातात डफ घेतला आणि सर्व स्त्रिया तिच्यामागे हातात डफ घेऊन नाचू लागल्या.

  2. मिर्यामने त्यांच्यासाठी गाईले: “याहवेहप्रीत्यर्थ गीत गा, कारण ते अत्युच्च आहेत. घोडे व त्यांचे स्वार त्यांनी समुद्रात बुडवून टाकले आहेत.”

  3. “त्यानंतर तू परमेश्वराच्या गिबियाकडे, जिथे पलिष्ट्यांची चौकी आहे तिथे जाशील. त्या नगरात जाताच, संदेष्ट्यांची एक मिरवणूक सतार, डफ, सनई आणि वीणा ही वाद्ये वाजवित उच्च स्थानावरून खाली उतरत असताना आणि भविष्यवाणी करत असताना तुला आढळतील.

  4. जेव्हा शौल आणि त्याचा सेवक गिबियाहकडे आले तेव्हा संदेष्ट्यांची मिरवणूक त्याला भेटली; तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर उतरला आणि तो त्यांच्याबरोबर भविष्यवाणी करू लागला.

  5. दावीद व निवासमंडपाचे अधिकारी यांनी आसाफ, हेमान व यदूथूनच्या काही पुत्रांना सतारी, वीणा व झांजा वाजवून संदेशाची सेवा करण्यासाठी वेगळे केले. त्यांच्या सेवेनुसार त्यांची यादी अशी आहे: