मुख्य मजकुरावर जा

Prophets बद्दल बायबलमधील वचने: Frequently in their actions, &c were made signs to the people

67 वचने · 128 पैलू

Frequently in their actions, &c were made signs to the people बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यावेळेस आमोजचा पुत्र यशायाहद्वारे याहवेह बोलले. ते त्याला म्हणाले, “तुझ्या अंगावरील गोणपाट आणि पायातील चपला काढून टाक.” आणि त्याने तसे केले, वस्त्रहीन आणि अनवाणी असा तो फिरत राहिला.

  2. तेव्हा याहवेह म्हणाले, “जसा माझा सेवक यशायाह तीन वर्षे विवस्त्र आणि अनवाणी चालला, त्याचप्रमाणे इजिप्त व कूश यांच्याविरुद्ध हे चिन्ह आणि अरिष्टसूचक गोष्ट असेल,

  3. म्हणून अश्शूरचा राजा इजिप्तच्या बंदिवानांना आणि कूशच्या बंदिवानांना, तरुणांना आणि वृद्धांना उघडे ठेवलेले नितंब आणि अनवाणी असे—इजिप्तला लज्जित म्हणून चालवेल.

  4. याहवेह मला असे म्हणतात: “जा व एक मातीचे मडके विकत घे आणि जाताना लोकांमधील काही वडीलजन आणि काही याजक यांना आपल्याबरोबर घे.

  5. “यिर्मयाह, आता हे लोक पाहत असताना तू आणलेले ते मडके फोडून टाक,

  6. आणि त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेहचा तुम्हाला हा संदेश आहे: ज्याप्रमाणे या मडक्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या आहेत व हे मडके जसे पुन्हा नीट करता येणार नाही, त्याप्रमाणेच मी या नगरीच्या लोकांचा चुराडा करेन. तोफेतमध्ये इतक्या प्रेतांना मूठमाती देण्यात येईल की कुठे जागा उरणार नाही.

  7. याहवेहनी मला असे म्हटले आहे: “चामड्याच्या वाद्यांचा व गुणाकार चिन्हाच्या सळयांचा एक जू तयार कर आणि तो तुझ्या मानेवर ठेव.

  8. मग एदोम, मोआब, अम्मोन, सोर व सीदोन यांच्या राजांना, यरुशलेममध्ये यहूदीयाचा राजा सिद्कीयाहकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव,

  9. “यहूदी लोक तुझ्याकडे पाहत असताना त्यांच्या समक्ष तहपनहेस येथील फारोहच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी फरसबंदीचे जे दगड आहेत, त्यांच्यामध्ये काही मोठे धोंडे मातीत पुरून टाक,

  10. मग तू ही गुंडाळी वाचून संपवलीस की तिला एक दगड बांधून ती फरात नदीत फेकून दे.

  11. “आता हे मानवपुत्रा, ओल्या मातीची एक वीट घे आणि ती तुझ्यापुढे ठेव व तिच्यावर यरुशलेम शहराचे चित्र काढ.

  12. नंतर त्याला वेढा टाक: ज्याच्यासमोर वेढ्याचे काम चालू आहे, त्याच्यावर एक उतार रच, त्याच्यासमोर डेरे मांड व त्याच्या सभोवती युद्धाची यंत्रे बनविली आहेत, असे चित्र त्या विटेवर काढ.

  13. नंतर एक लोखंडी कढई घे; ती तुझ्यामध्ये व शहरामध्ये लोखंडी भिंतीप्रमाणे ठेव आणि आपले तोंड त्याकडे कर. ती वेढ्यात आहे आणि तू तिला वेढा देशील. हे इस्राएली लोकांस एक चिन्ह म्हणून असेल.

  14. “त्यानंतर तू आपल्या डाव्या कूशीवर पड आणि इस्राएली लोकांचे पाप आपल्या स्वतःवर ठेव. जितके दिवस तू एका कूशीवर पडशील तितके दिवस त्यांच्या पापाचा भार तू वाहशील.

  15. त्यांच्या पापाच्या वर्षांइतके दिवस मी तुला ठरवून देत आहे. म्हणून तीनशे नव्वद दिवस तू इस्राएली लोकांच्या पापाचा भार वाहशील.

  16. “हे संपवल्यानंतर, परंतु यावेळी आपल्या उजव्या कूशीवर तू पुन्हा पड आणि यहूदीयाच्या लोकांच्या पापाचा भार वाहा. त्यासाठी प्रत्येक वर्षासाठी एक दिवस असे चाळीस दिवस मी तुला नेमून दिले आहेत.

  17. मग तू यरुशलेमच्या वेढ्याकडे तोंड वळव आणि उघड्या हातांनी तिच्याविरुद्ध भविष्य सांग.

  18. मी तुला दोर्‍यांनी बांधीन म्हणजे तुझे वेढा घालण्याचे दिवस संपेपर्यंत तू एका कूशीवरून दुसर्‍या कूशीवर वळू शकणार नाहीस.

  19. “तू गहू, जव, शेंगा, डाळ, बाजरी आणि खपल्या गहू घे; आणि ते एका पात्रात साठव व त्याची भाकर बनवण्यासाठी त्याचा वापर कर. तुझ्या कूशीवर निजलेले असताना तीनशे नव्वद दिवस तुला ती खावयाची आहे.

  20. प्रत्येक दिवसासाठी वीस शेकेल अन्न वजन करून खा आणि ते ठरविलेल्या वेळेतच खा.

  21. त्याचप्रमाणे हिनाचा सहावा भाग पाणी घेऊन तेही नेमलेल्या वेळेतच पी.

  22. जवाच्या भाकरीप्रमाणे ती तू खा; ती भाजण्यासाठी इंधन म्हणून तू ती मानवी विष्ठेवर लोकांसमोर भाज.”

  23. याहवेह म्हणतात, “याप्रकारे ज्या राष्ट्रांमध्ये मी त्यांना घालवून देईन तिथे इस्राएली लोक अमंगळ अन्न खातील.”

  24. “आता, हे मानवपुत्रा, धारदार तलवार घे व ती न्हाव्याच्या वस्तर्‍या प्रमाणे वापरून तुझे डोके व दाढीचे मुंडण कर. मग तराजूवर त्याचे माप करून केसांची वाटणी कर.

  25. जेव्हा तुझे वेढ्याचे दिवस संपतील, तेव्हा केसांचा तिसरा भाग शहरामध्ये जाळ. मग केसांचा तिसरा भाग शहराभोवती तलवारीने कापत जा. आणि तिसरा भाग वार्‍यावर उडव, कारण मी आपली तलवार उपसून त्यांचा पाठलाग करेन.