Prophets बद्दल बायबलमधील वचने: Specially raised up on occasions of emergency
Specially raised up on occasions of emergency बद्दल वचने
शमुवेल वाढत असता याहवेह त्याच्याबरोबर होते आणि त्यांनी शमुवेलाचे कोणतेही शब्द वाया जाऊ दिले नाही.
आणि दानपासून बेअर-शेबापर्यंत सर्व इस्राएली लोकांनी ओळखले की शमुवेल याहवेहचा संदेष्टा होण्यास प्रमाणित केलेला आहे.
याहवेहचे शिलोह येथे दर्शन होत राहिले आणि तिथे त्यांच्या वचनाद्वारे त्यांनी स्वतःला शमुवेलास प्रकट केले.
नंतर मी प्रभूची वाणी ऐकली, “मी कोणाला पाठवावे? आणि आपल्यासाठी कोण जाईल?” मी उत्तर दिले, “हा मी इथे आहे, मला पाठवा!”
ते म्हणाले, “जा आणि या लोकांना सांग: “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.’
“मी तुला गर्भाशयात घडविण्याच्या पूर्वीपासून ओळखतो, तुझा जन्म होण्यापूर्वीच मी तुला समर्पित केले आहे; आणि राष्ट्रांकरिता माझा संदेष्टा म्हणून तुझी नेमणूक केली आहे.”