Skip to content

Prophets बद्दल बायबलमधील वचने: Inspiration of

313 वचने · 128 पैलू

Inspiration of बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी उत्तर दिले, “काल रात्री आम्हा दोघांनाही स्वप्न पडले, पण आम्हाला त्यांचा अर्थ सांगणारा येथे कोणीच नाही.” यावर योसेफ म्हणाला, “स्वप्नांचा उलगडा करून सांगणे हे परमेश्वराकडूनच असते ना? स्वप्नात तुम्ही काय पाहिले ते सांगा.”

  2. योसेफाने उत्तर दिले, “मला स्वतःच्या बुद्धीने स्वप्नांचा अर्थ सांगता येत नाही, परंतु परमेश्वर फारोहला हितकारक उत्तर देतील.”

  3. फारोहने त्यांना विचारले, “परमेश्वराच्या आत्म्याने भरलेला या माणसासारखा दुसरा कोणी सापडेल का?”

  4. मग फारोह योसेफाला म्हणाला, “ज्याअर्थी परमेश्वराने तुला या स्वप्नांचा अर्थ प्रगट केला आहे, त्याअर्थी देशामध्ये तुझ्यासारखा चतुर आणि सुज्ञ मनुष्य कोणीच नाही.

  5. परमेश्वर मोशेला म्हणाले, “जो मी आहे तो मी आहे. इस्राएली लोकांना सांग: ‘मी आहे’ यांनी मला पाठवले आहे.”

  6. परमेश्वर मोशेला आणखी म्हणाले, “इस्राएलास सांग, ‘अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर या तुमच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.’ “हेच माझे सनातन नाव आहे, आणि सर्व पिढ्यांपर्यंत याच नावाने तुम्ही मला हाक मारणार.

  7. आता जा; मी तुला बोलण्यास मदत करेन आणि काय बोलावे ते तुला शिकवेन.”

  8. तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल; मी तुम्हा दोघांना बोलण्यास मदत करेन, आणि काय करावे हे शिकवेन.

  9. आता याहवेहने अहरोनाला म्हटले, “मोशेला भेटण्यासाठी रानात जा.” तेव्हा अहरोन मोशेला परमेश्वराच्या पर्वतावर भेटला आणि त्याचे चुंबन घेतले.

  10. आता याहवेह मोशे व अहरोनाशी इस्राएली लोक व इजिप्तचा राजा फारोह याविषयी बोलले आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे याविषयी आज्ञा केली.

  11. याहवेह मोशेला म्हणाले, “मी याहवेह आहे. जा व मी तुला जे काही सांगतो ते इजिप्तचा राजा फारोह याला सांग.”

  12. तुला जे काही मी आज्ञापिणार आहे ते सर्व तू बोलावयचे आणि तुझा भाऊ अहरोन याने इस्राएली लोकांना त्याच्या देशातून जाऊ द्यावे असे फारोहला सांगावयाचे आहे.

  13. नंतर मोशे परमेश्वराकडे गेला आणि याहवेहने पर्वतावरून त्याला आवाज देऊन म्हटले, “याकोबाच्या वंशजांना, म्हणजेच इस्राएली लोकांना तू हे सांगावे:

  14. मग याहवेहने मोशेला म्हटले, “मी घनदाट मेघातून तुझ्याकडे येईन, अशासाठी की मी तुझ्याशी बोलत असताना लोक ऐकतील आणि तुझ्यावर विश्वास ठेवतील.” मग मोशेने लोक काय म्हणाले ते याहवेहला सांगितले.

  15. कर्ण्याचा आवाज जसा मोठा होत गेला, तसा मोशे बोलत होता आणि परमेश्वर त्याला उत्तर देत होते.

  16. आणि याहवेहचे वैभव सीनाय पर्वतावर येऊन राहिले. सहा दिवस मेघांनी सीनाय पर्वत झाकलेला होता आणि सातव्या दिवशी परमेश्वराने मेघांतून मोशेला आवाज दिला.

  17. हा निवासमंडप आणि त्याची रचना मी दाखवेन त्याप्रमाणेच असावी.

  18. तिथे, प्रायश्चिताच्या झाकणावर दोन करूब जे कोशावर ठेवलेले आहेत, त्यांच्यामध्ये मी तुला भेटेन आणि इस्राएल लोकांसाठी द्यावयाच्या सर्व आज्ञा मी तुला देईन.

  19. “मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे नमुन्याप्रमाणे निवासमंडप तयार करावा.

  20. आणि जेव्हा मोशे मंडपामध्ये प्रवेश करी, तेव्हा याहवेह मोशेशी बोलेपर्यंत, मेघस्तंभ खाली उतरून मंडपाच्या दाराशी थांबत असे.

  21. जसा एखादा व्यक्ती आपल्या मित्राशी बोलतो तसे याहवेह मोशेशी समोरासमोर बोलत असत. मग मोशे छावणीकडे परत जात असे, परंतु त्याचा तरुण सहकारी, नूनाचा पुत्र यहोशुआ हा मंडप सोडून जात नसे.

  22. आणि याहवेहने त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे—

  23. याहवेहने त्यांना सर्वप्रकारचे कोरीव काम, कारागिरीचे काम, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुती व रेशमी तागावर भरतकाम, विणकाम; अशा सर्वप्रकारच्या विणकरांना कारागिरीचे—कौशल्याचे—काम करण्याच्या दानांनी भरले आहे.

  24. याहवेहनी मोशेला बोलाविले आणि सभामंडपातून त्याच्याशी बोलणे केले. ते म्हणाले,

  25. इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले: