मुख्य मजकुरावर जा

Prophets बद्दल बायबलमधील वचने: Sometimes received divine communications and uttered predictions under great bodily and mental excitement

7 वचने · 128 पैलू

Sometimes received divine communications and uttered predictions under great bodily and mental excitement बद्दल वचने

  1. संदेष्ट्याविषयी: माझे अंतःकरण विदीर्ण झाले आहे; माझी सर्व हाडे थरथर कापत आहेत. मद्यप्यासारखा माझा झोक जात आहे, एखाद्या बलवान पुरुषावर मद्याने मात केली आहे, कारण याहवेह व त्यांचे पवित्र शब्द.

  2. तेव्हा आत्म्याने मला वर उचलले आणि मी माझ्या आत्म्यात कटूत्व व रागाने भरून दूर गेलो आणि याहवेहचा मजबूत हात माझ्यावर होता.

  3. खेबर नदीजवळ तेल-अवीवकडे राहत असलेल्या निर्वासित लोकांकडे मी आलो आणि ते जिथे राहत होते, तिथे त्यांच्याबरोबर; मी अतिदुःखाने सात दिवस बसलो.

  4. “येथे हा विषय समाप्त होतो. मी दानीएल, आपल्या विचारांनी व्याकूळ झालो. आणि माझा चेहरा पांढराफटक पडला, परंतु मी ही गोष्ट आपल्या मनात ठेवली.”

  5. मग मी एकटाच राहिलो आणि हा महान दृष्टान्त पहात राहिलो; माझ्यात शक्ती उरली नाही, माझा चेहरा पांढराफटक पडला आणि मी असहाय्य झालो.

  6. हे याहवेह, मी तुमची किर्ती ऐकली आहे; मी तुमच्या कृत्यामुळे भयप्रद झालो आहे. आमच्या दिवसातही त्या कार्याची पुनरावृत्ती करा, आमच्या काळात त्या प्रसिद्ध होऊ द्या; क्रोधित असतानाही कृपेची आठवण असू द्या.

  7. मी हे ऐकले आणि माझ्या हृदयात धडकी भरली, भीतीने माझे ओठ कापू लागले; माझ्या हाडात नाशाने प्रवेश केला, आणि माझे पाय थरथरू लागले. तरी देखील मी आमच्यावर आक्रमण करणाऱ्या देशावर येणाऱ्या संकटाच्या दिवसाची शांतपणे वाट पाहत राहीन.