Skip to content

Prophets बद्दल बायबलमधील वचने: By angels

14 वचने · 128 पैलू

By angels बद्दल वचने

  1. मग मी दानीएल, या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा ते जाणून घेण्याच्या प्रयत्न करू लागलो, तेवढ्यात एकाएकी मानवासारखा दिसणारा कोणी एक पुरुष माझ्यासमोर उभा राहिला.

  2. आणि मी उलईपलीकडून आलेली एक मनुष्यवाणी मी ऐकली “हे गब्रीएला, या मनुष्यास त्याच्या दृष्टान्ताचा अर्थ सांग.”

  3. जिथे मी उभा होतो त्या जागेजवळ तो आला, तेव्हा मला धडकी भरली व मी जमिनीवर पालथा पडलो. तेव्हा तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, हे दृष्टान्त शेवटच्या काळाशी संबंधित आहे हे समजून घे.”

  4. तो माझ्याशी बोलत असतानाच मी जमिनीकडे तोंड करून गाढ झोपी गेलो. तेव्हा त्याने स्पर्श करून मला जागे केले व मला माझ्या पायांवर उभे केले.

  5. तो म्हणाला: “क्रोधाच्या अखेरच्या समयात काय घडणार आहे हे मी तुला सांगणार आहे, कारण हा दृष्टान्त नेमलेल्या काळाच्या समाप्तीच्या संबंधी आहे.

  6. जो मेंढ्याचा स्वामी आणि तू पाहिलेल्या मेंढ्याची दोन शिंगे म्हणजे मेदिया व पर्शियाचे राजे आहेत.

  7. तो केसाळ बोकड म्हणजे ग्रीस राष्ट्र होय आणि त्याच्या डोळ्यांच्या मधोमध मोठे शिंग म्हणजे त्या देशाचा पहिला राजा होय.

  8. तुटलेल्या शिंगाच्या जागी बाहेर आलेली चार शिंगे एकाच देशातून उदयास येणार्‍या चार राज्यांचे प्रतिनिधित्व करतात, परंतु त्यांची शक्ती पूर्वीच्या राज्यासारखी नसेल.

  9. “त्याच्या कारकिर्दी नंतरच्या काळात, जेव्हा बंडखोर पूर्ण दुष्टाईत येतील, तेव्हा एक भयानक रूपाचा राजा उदयास येईल, जो कूटप्रश्‍न समजणारा तज्ञ असेल.

  10. त्याचे सामर्थ्य मोठे असेल, पण ते त्याचे स्वतःचे नसेल. तो भयंकर नाश करणार आणि जे काही तो करेल, त्यामध्ये त्याला यश मिळेल. जे बलवान आणि पवित्र आहेत अशा लोकांचा तो नाश करेल.

  11. तो कपटाचा उपयोग समृद्ध होण्यास करेल आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजेल. जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हा तो अनेकांचा नाश करेल आणि राजपुत्रांच्या राजपुत्राच्या विरोधात उभा राहील. तरीही तो नष्ट होईल, परंतु मनुष्याच्या सामर्थ्याने नाही.

  12. “संध्याकाळ आणि सकाळचा दृष्टान्त जो तुला देण्यात आला आहे तो खरा आहे, पण हा दृष्टान्त तू गुप्त ठेव. कारण तो येणार्‍या भविष्यकाळाशी संबंधित आहे.”

  13. मी, योहानाने या सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्या आणि ज्या देवदूताने मला त्या दाखविल्या, त्याला नमन करण्यासाठी मी त्याच्या पायांवर उपडा पडलो.

  14. परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. तू परमेश्वराची आराधना कर.”