Prophets बद्दल बायबलमधील वचने: Were all fulfilled
Were all fulfilled बद्दल वचने
तेव्हा हे जाणून घ्या, अहाबाच्या घराण्याविरुद्ध याहवेहने म्हटलेला एकही शब्द व्यर्थ जाणार नाही. याहवेहने ते पूर्ण केले जे त्यांनी त्यांचा सेवक एलीयाहद्वारे प्रकट केले होते.”
जो त्याच्या सेवकाच्या वचनांना पाठिंबा देतो आणि त्याच्या संदेशवाहकांच्या भविष्यवाण्यांची परिपूर्ती करतो, जो यरुशलेमविषयी म्हणतो, ‘मी यरुशलेम पुनः रहिवासित करेन,’ यहूदीयाच्या नगराविषयी म्हणतो, ‘ती पुनः बांघली जाईल,’ आणि तेथील भग्नावशेषाविषयी म्हणतो, ‘मी त्यांची पुनर्बांधणी करेन,’
परंतु ख्रिस्ताने दुःख सहन करावे म्हणून परमेश्वराने सर्व संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे जे भाकीत केले होते, ते पूर्ण केले.
पण सातवा देवदूत आपले रणशिंग वाजविण्याच्या बेतात असेल त्या दिवसात, आपले सेवक व संदेष्टे यांना कळविल्याप्रमाणे युगानुयुग गुप्त ठेवलेली परमेश्वराची रहस्यमय योजना साध्य होईल.”