Skip to content

Prophets बद्दल बायबलमधील वचने

655 वचने · 128 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी विचारले, “माझ्या प्रभू, हे सर्व काय आहे?” एक स्वर्गदूत जो माझ्याशी बोलत होता, त्याने उत्तर दिले, “ते काय आहे हे मी तुला दाखवेन.”

  2. तेव्हा माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला याहवेहने सांत्वनपर व आश्वासनदायक उत्तर दिले.

  3. मग माझ्याशी संवाद करीत असलेला याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “या वचनाची घोषणा कर: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘मी यरुशलेम व सीयोनाबाबत अत्यंत ईर्ष्यावान आहे,

  4. मी माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला विचारले, “हे काय आहे?” त्याने उत्तर दिले, “ही शिंगे आहेत, ज्यांनी यहूदीया, इस्राएल आणि यरुशलेम येथील लोकांची पांगापांग केली.”

  5. मी निश्चितच त्यांच्याविरुद्ध माझा हात उगारेन, म्हणजे त्यांचेच गुलाम त्यांची लुटालूट करतील. मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे.

  6. त्यांनी आपली अंतःकरणे गारगोटीसारखी कठीण केली आणि सर्वसमर्थ याहवेहने आरंभीच्या संदेष्ट्यांना आपल्या आत्म्याने प्रेरित करून त्यांच्याद्वारे दिलेल्या आज्ञा किंवा वचने ऐकण्याचे त्यांनी नाकारले. म्हणूनच याहवेहला त्यांच्यावर अत्यंत क्रोध आला.

  7. “त्या दिवशी प्रत्येक खोटा संदेष्टा आपल्या भविष्यकथनाच्या दानाबद्दल लज्जित होईल. ते संदेष्ट्यांसाठी केसांनी बनविलेली विशिष्ट वस्त्रे घालणार नाहीत.

  8. एक भविष्यवाणी: संदेष्टा मलाखी द्वारे याहवेहने इस्राएलला दिलेले वचन.

  9. योहानाचा पोशाख उंटाच्या केसांपासून तयार केलेला आणि त्याच्या कंबरेला चामड्याचा पट्टा बांधलेला होता. त्याचे भोजन टोळ आणि रानमध होते.

  10. तुम्ही आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे, त्यांनी प्राचीन काळाच्या संदेष्ट्यांनाही असेच छळले होते.

  11. येशू त्यांना म्हणाले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते! परंतु योनाह संदेष्ट्याच्या चिन्हाखेरीज दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.

  12. आणि ते त्याच्यावर संतापले. तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “संदेष्ट्याचा मान होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर यांच्यात तो मान्यता पावत नाही.”

  13. यास्तव मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी आणि शिक्षक पाठवित आहे. काहींचा तुम्ही वध कराल आणि क्रूसावर द्याल; काहींना सभागृहात फटके माराल आणि नगरोनगरी त्यांच्या पाठीस लागाल.

  14. नीतिमान हाबेलाच्या रक्तापासून मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये ज्याचा वध तुम्ही केला तो बरख्याचा पुत्र जखर्‍याहच्या रक्तापर्यंत, जे सर्व नीतिमान रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले त्याचा दोष तुम्हावर येईल.

  15. मी तुम्हाला सत्य सांगतो की, तो याच पिढीवर येईल.

  16. “हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती.

  17. आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे.

  18. “संदेष्टा दानीएलाने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ पवित्रस्थानी उभा असलेला तुम्ही पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे—

  19. ते आता यरुशलेमच्या वाटेला लागले असताना, येशू पुढे चालले होते, शिष्य आश्चर्यचकित झाले होते, तर त्यांच्यामागे चालणारे जे इतर लोक होते, ते भयभीत झाले होते. पुन्हा एकदा येशूंनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला नेले आणि त्यांच्या बाबतीत काय घडणार हे त्यांना सांगू लागले.

  20. “आपण यरुशलेमात जात आहोत” ते म्हणाले, “तिथे मानवपुत्राला प्रमुख याजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि गैरयहूदी लोकांच्या स्वाधीन करतील.

  21. ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील; परंतु तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.”

  22. त्यानंतर त्याने आणखी एकाला पाठविले, त्याला तर त्यांनी ठारच केले आणि त्यानंतर अनेकांना पाठविले, त्यातील काहींना त्यांनी चोप दिला व इतरांना जिवे मारले.

  23. कारण दावीद स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना, तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’

  24. तो प्रभूच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल.

  25. जेव्हा मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले, तेव्हा तिच्या गर्भाशयातील बालकाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली.