मुख्य मजकुरावर जा

Prophets बद्दल बायबलमधील वचने

655 वचने · 128 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो माझ्याशी बोलत असतानाच मी जमिनीकडे तोंड करून गाढ झोपी गेलो. तेव्हा त्याने स्पर्श करून मला जागे केले व मला माझ्या पायांवर उभे केले.

  2. तो म्हणाला: “क्रोधाच्या अखेरच्या समयात काय घडणार आहे हे मी तुला सांगणार आहे, कारण हा दृष्टान्त नेमलेल्या काळाच्या समाप्तीच्या संबंधी आहे.

  3. जो मेंढ्याचा स्वामी आणि तू पाहिलेल्या मेंढ्याची दोन शिंगे म्हणजे मेदिया व पर्शियाचे राजे आहेत.

  4. तो केसाळ बोकड म्हणजे ग्रीस राष्ट्र होय आणि त्याच्या डोळ्यांच्या मधोमध मोठे शिंग म्हणजे त्या देशाचा पहिला राजा होय.

  5. तुटलेल्या शिंगाच्या जागी बाहेर आलेली चार शिंगे एकाच देशातून उदयास येणार्‍या चार राज्यांचे प्रतिनिधित्व करतात, परंतु त्यांची शक्ती पूर्वीच्या राज्यासारखी नसेल.

  6. “त्याच्या कारकिर्दी नंतरच्या काळात, जेव्हा बंडखोर पूर्ण दुष्टाईत येतील, तेव्हा एक भयानक रूपाचा राजा उदयास येईल, जो कूटप्रश्‍न समजणारा तज्ञ असेल.

  7. त्याचे सामर्थ्य मोठे असेल, पण ते त्याचे स्वतःचे नसेल. तो भयंकर नाश करणार आणि जे काही तो करेल, त्यामध्ये त्याला यश मिळेल. जे बलवान आणि पवित्र आहेत अशा लोकांचा तो नाश करेल.

  8. तो कपटाचा उपयोग समृद्ध होण्यास करेल आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजेल. जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हा तो अनेकांचा नाश करेल आणि राजपुत्रांच्या राजपुत्राच्या विरोधात उभा राहील. तरीही तो नष्ट होईल, परंतु मनुष्याच्या सामर्थ्याने नाही.

  9. “संध्याकाळ आणि सकाळचा दृष्टान्त जो तुला देण्यात आला आहे तो खरा आहे, पण हा दृष्टान्त तू गुप्त ठेव. कारण तो येणार्‍या भविष्यकाळाशी संबंधित आहे.”

  10. अहश्वेरोशचा पुत्र दारयावेशच्या कारकिर्दीचे ते पहिलेच वर्ष होते. दारयावेश हा मेदिया वंशातील होता, तो खाल्डियन राज्यावर राजा करण्यात आला होता;

  11. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मला, दानीएलला, संदेष्टा यिर्मयाहला दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार पवित्र शास्त्रातून समजले की यरुशलेम सत्तर वर्षे उजाड अशा अवस्थेत राहील.

  12. तेव्हा मी याहवेह परमेश्वराकडे वळून प्रार्थना आणि उपवास करून आणि गोणपाट नेसून आणि अंगाला राख फासून त्यांना विनंती केली.

  13. याहवेह माझ्या परमेश्वराला मी प्रार्थना केली आणि पापे कबूल केली: “हे याहवेह, महान व प्रतापी परमेश्वरा, तुमच्यावर प्रीती करणार्‍यांना आणि तुमच्या आज्ञा पाळणार्‍यांकरिता तुम्ही केलेला तुमच्या प्रीतीचा करार पाळता,

  14. परंतु आम्ही पाप आणि चूक केली आहे. आम्ही दुष्ट आणि बंडखोर आहोत; तुमच्या आज्ञांपासून आणि नियमांपासून आम्ही बहकलो आहोत.

  15. आम्ही तुमचे सेवक संदेष्टे जे तुमच्या नावाने आमचे राजे, आमचे राजपुत्र आणि आमचे पूर्वज आणि देशातील सर्व लोकांना तुमच्या नावाने संदेश देत असत, त्यांचे आम्ही ऐकले नाही.

  16. “हे प्रभू, तुम्ही नीतिमान आहात, परंतु आज आम्ही लज्जित झालो आहोत; यहूदीयात राहणारे, यरुशलेमात राहणारे, जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएली लोक आणि ज्यांना तुमच्याविरुद्ध केलेल्या अविश्वासाच्या कृत्यांमुळे सर्व देशांमध्ये तुम्ही घालवून दिले.

  17. हे याहवेह, आम्ही, आमचे राजे, आमचे राजपुत्र, आणि आमचे पूर्वज फार लज्जित आहोत, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  18. जरी आम्ही त्यांच्याविरुद्ध बंडखोरी केली, तरीही याहवेह आमचे परमेश्वर दयाळू आणि क्षमा करणारे आहेत;

  19. आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही आणि त्यांनी आपल्या सेवक संदेष्ट्यांच्या मार्फत दिलेले नियम आम्ही पाळले नाही.

  20. सर्व इस्राएली लोकांनी तुमच्या नियमांचे आज्ञाभंग केले आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यास आपली पाठ फिरविली आहे. “म्हणूनच परमेश्वराचा सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात लिहून ठेवलेले शाप आणि शपथेवरचा दंड आमच्यावर ओतला गेला आहे, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  21. आमच्यावर मोठी संकटे आणून तुम्ही आम्हाला आणि आमच्या अधिपतींविरुद्ध दिलेले वचन पूर्ण केले आहे. संपूर्ण स्वर्गाच्या खाली असे काहीही झाले नाही, जसे यरुशलेमसोबत करण्यात आले.

  22. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आमच्याविरुद्ध लिहून ठेवलेली सर्व संकटे आमच्यावर आली आहेत, तरीही आमच्या अपराधांपासून वळून आणि तुमच्या सत्याकडे लक्ष लावण्यास आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराला विनंती केली नाही.

  23. म्हणूनच याहवेहने कोणताही संकोच बाळगता आमच्यावर संकटे पाठविली, कारण याहवेह आमचे परमेश्वर जे काही करतात त्यामध्ये ते नीतिमान आहेत; तरीही आम्ही त्यांच्या आज्ञा पाळल्या नाहीत.

  24. “आणि आता याहवेह आमच्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या महान हातांनी तुमच्या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले आणि आपल्या नावाची महिमा प्रस्थापित केली, जी आजपर्यंत आहे. आम्ही पाप केले आणि आम्ही चूक केली.

  25. हे प्रभू, तुमच्या पूर्ण न्यायकृत्यांप्रमाणे तुमच्या यरुशलेम नगरांवरून, तुमच्या पवित्र डोंगरावरील तुझ्या विश्वसनीय करुणेमुळे यरुशलेमवरील, तुझ्या स्वतःच्या नगरीवरील, तुझ्या पवित्र डोंगरावरील, तुमचा क्रोध आणि राग दूर करा. कारण आमच्या पातकांमुळे आणि आमच्या पूर्वजांच्या अपराधांमुळे यरुशलेम आणि तुमचे लोक सभोवतालच्या सर्वांना निंदा असे झालो आहोत.