मुख्य मजकुरावर जा

Prophets बद्दल बायबलमधील वचने

655 वचने · 128 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग रिकामी कढई निखार्‍यावर ठेवा ती गरम होऊन तिचे तांबे चमकू द्या, म्हणजे तिची अशुद्धता वितळून जाईल आणि त्याचा थर पूर्णपणे जळून जाईल.

  2. परंतु सर्व प्रयत्न वाया गेले; तिच्यावर बसलेला दाट थर निघाला नाही, तो अग्नीने देखील निघाला नाही.

  3. “ ‘आता तुझी अशुद्धता तर दुराचार आहे. कारण तुला शुद्ध करण्याचा मी प्रयत्न केला, परंतु तू तुझ्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली नाहीस, आता तुझ्याविरुद्ध माझा कोप शांत होईपर्यंत तू शुद्ध होणार नाहीस.

  4. “ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी ते करण्याची वेळ आली आहे. मी आवरून धरणार नाही; मी दया करणार नाही, मी अनुतापणारही नाही. तुझे वर्तन व तुझी कृत्ये यानुसार तुझा न्याय केला जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  5. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  6. “हे मानवपुत्रा, एका झटक्यात तुझ्या डोळ्याचा आनंद मी तुझ्यापासून काढून घेणार आहे. परंतु तू शोक करू नकोस किंवा रडू नकोस वा अश्रू गाळू नकोस.

  7. शांततेने कण्ह; मेलेल्यासाठी शोक करू नकोस. तुझा पागोटा काढू नकोस आणि आपली पायतणे पायातच असू दे; तुझे तोंड झाकू नकोस किंवा प्रथेनुसार शोक करणार्‍यांसाठी आणलेले अन्न तू खाऊ नकोस.”

  8. म्हणून सकाळी मी लोकांशी बोललो आणि संध्याकाळी माझी पत्नी मरण पावली. दुसर्‍या सकाळी मला आज्ञापिल्याप्रमाणे मी केले.

  9. तेव्हा लोकांनी मला विचारले, “या सर्व गोष्टींचे आमच्याशी काय देणे घेणे आहे? तू असे का वागत आहेस?”

  10. तेव्हा मी त्यांना म्हटले, “याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  11. इस्राएली लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझे पवित्रस्थान; तो बलवान गड ज्याविषयी तुम्ही अभिमान बाळगता, तुमच्या डोळ्यांचा आनंद, ज्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, तो मी अपवित्र करणार आहे. तुमची मुले व मुली जे तुम्ही मागे सोडले ते तलवारीने पडतील.

  12. आणि जसे मी केले तसेच तुम्हीही कराल. तुम्ही आपली मिशी आणि दाढी झाकणार नाही किंवा प्रथेनुसार शोक करणार्‍यांसाठी आणलेले अन्न तुम्ही खाणार नाही.

  13. तुम्ही आपले पागोटे आपल्या डोक्यावर आणि तुमची पायतणे तुमच्या पायात असू द्यावीत. तुम्ही शोक करू नये किंवा रडू नये, तर तुमच्या पापांमुळे तुम्ही झुराल व आपसातच कण्हाल.

  14. यहेज्केल तुमच्यासाठी एक चिन्ह असा आहे; जसे त्याने केले तसेच तुम्हीही करा. हे जेव्हा घडेल, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.’

  15. तो मनुष्य आला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, याहवेहचा हात माझ्यावर होता आणि याहवेहने सकाळी तो मनुष्य माझ्याकडे येण्यापूर्वी माझे तोंड उघडले. म्हणून माझे तोंड उघडलेले होते आणि मी आणखी शांत नव्हतो.

  16. याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला याहवेहच्या आत्म्याच्या द्वारे बाहेर आणले आणि खोर्‍याच्या मधोमध ठेवले; ते हाडांनी भरलेले होते.

  17. आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, वर्षाच्या सुरुवातीला, महिन्याच्या दहाव्या दिवशी, शहराचे पतन झाल्यानंतर चौदाव्या वर्षी; त्याच दिवशी याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला तिथे नेले.

  18. तेव्हा आत्म्याने मला उचलून आतील अंगणात आणले आणि याहवेहच्या वैभवाने मंदिर भरले.

  19. परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत.

  20. त्या रात्री याहवेहने दानीएलला दृष्टान्तात ते रहस्य प्रकट केले. तेव्हा दानीएलने स्वर्गाच्या परमेश्वराला धन्यवाद दिला.

  21. मी तिथे उभ्या असलेल्यांपैकी एकाकडे गेलो आणि मी त्याला या सर्व गोष्टींचा अर्थ काय हे विचारले. “मग त्याने मला सांगितले व गोष्टींचा अर्थ समजावून सांगितला:

  22. “येथे हा विषय समाप्त होतो. मी दानीएल, आपल्या विचारांनी व्याकूळ झालो. आणि माझा चेहरा पांढराफटक पडला, परंतु मी ही गोष्ट आपल्या मनात ठेवली.”

  23. मग मी दानीएल, या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा ते जाणून घेण्याच्या प्रयत्न करू लागलो, तेवढ्यात एकाएकी मानवासारखा दिसणारा कोणी एक पुरुष माझ्यासमोर उभा राहिला.

  24. आणि मी उलईपलीकडून आलेली एक मनुष्यवाणी मी ऐकली “हे गब्रीएला, या मनुष्यास त्याच्या दृष्टान्ताचा अर्थ सांग.”

  25. जिथे मी उभा होतो त्या जागेजवळ तो आला, तेव्हा मला धडकी भरली व मी जमिनीवर पालथा पडलो. तेव्हा तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, हे दृष्टान्त शेवटच्या काळाशी संबंधित आहे हे समजून घे.”