मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना ३१:१६सुमारे इ.स.पू. १४५२

    त्यांनीच बलामाच्या सल्ल्यानुसार पेओरच्या प्रकरणात इस्राएली लोकांना याहवेहशी अविश्वासूपणा करण्यास भाग पाडले आणि याहवेहच्या लोकांना पीडेने मारले.

  2. गणना ३१:१७सुमारे इ.स.पू. १४५२

    तर आता सर्व मुलांस जिवे मारा व पुरुषाशी संग ठेवलेल्या प्रत्येक स्त्रीला मारून टाका,

  3. गणना ३१:१८सुमारे इ.स.पू. १४५२

    परंतु जिचा कधीही पुरुषाशी संग झाला नाही ती प्रत्येक मुलगी तुमच्यासाठी राखून ठेवा.

  4. गणना ३१:१९सुमारे इ.स.पू. १४५२

    “जर कोणी एखाद्याला जिवे मारले किंवा जो जिवे मारला गेला त्याला स्पर्श केला त्यांनी सात दिवस छावणीबाहेर राहावे. तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी तुम्ही स्वतःस व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे.

  5. गणना ३१:२०सुमारे इ.स.पू. १४५२

    चामडे, बोकडाचे केस किंवा लाकूड या सर्व वस्तूंसह प्रत्येक वस्त्र शुद्ध करावे.”

  6. गणना ३१:२१सुमारे इ.स.पू. १४५२

    यानंतर एलअज़ार याजक युद्धास गेलेल्या सैनिकांना म्हणाला, “याहवेहने मोशेला दिलेल्या नियमानुसार ही आज्ञा आहे:

  7. गणना ३१:२२सुमारे इ.स.पू. १४५२

    सोने, चांदी, तांबे लोखंड, कथील, शिसे

  8. गणना ३१:२३सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि त्या प्रत्येक वस्तू ज्या अग्नीत टिकतात त्या अग्नीत टाकाव्या, मग त्या शुद्ध होतील. परंतु त्या शुद्धीकरणाच्या पाण्यानेही शुद्ध कराव्या. ज्या वस्तू अग्नीत टिकत नाहीत, त्या शुद्धीकरणाच्या पाण्यात घालून काढाव्या.

  9. गणना ३१:२४सुमारे इ.स.पू. १४५२

    सातव्या दिवशी तुम्ही आपली वस्त्रे धुवावीत म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल, मग तुम्ही छावणीत परत यावे.”

  10. गणना ३१:२५सुमारे इ.स.पू. १४५२

    मग याहवेह मोशेला म्हणाले,

  11. गणना ३१:२६सुमारे इ.स.पू. १४५२

    “तू आणि एलअज़ार याजक व समाजाच्या कुटुंब प्रमुखांनी कैद केलेले सर्व लोक व जनावरे यांची मोजणी करावी.

  12. गणना ३१:२७सुमारे इ.स.पू. १४५२

    लुटीचे दोन समान भाग करावेत. एक भाग लढाईवर गेलेल्या सैनिकांना व दुसरा भाग समाजातील इतरांना द्यावा.

  13. गणना ३१:२८सुमारे इ.स.पू. १४५२

    युद्धास गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून, मनुष्य असो किंवा गुरे, गाढवे किंवा मेंढरे यापैकी याहवेहसाठी खंडणी म्हणून पाचशेमागे एक याप्रमाणे ते वेगळे कर.

  14. गणना ३१:२९सुमारे इ.स.पू. १४५२

    त्यांच्या अर्ध्या हिश्श्यातून ते घे व याहवेहचा वाटा म्हणून तो एलअज़ार याजक याला दे.

  15. गणना ३१:३०सुमारे इ.स.पू. १४५२

    इस्राएली लोकांच्या अर्ध्या हिश्श्यातून माणसे असो किंवा गुरे, गाढवे, मेंढरे किंवा इतर जनावरे यापैकी याहवेहसाठी खंडणी म्हणून पन्नासापैकी एक याप्रमाणे ते वेगळे कर. व लेवी लोक, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार आहेत त्यांना द्यावे.”

  16. गणना ३१:३१सुमारे इ.स.पू. १४५२

    म्हणून याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे मोशे व एलअज़ार याजकाने केले.

  17. गणना ३१:३२सुमारे इ.स.पू. १४५२

    युद्धात सैन्याने घेतलेल्या लुटीतून राहिलेली लूट 6,75,000 मेंढरे,

  18. गणना ३१:३३सुमारे इ.स.पू. १४५२

    72,000 गुरे,

  19. गणना ३१:३४सुमारे इ.स.पू. १४५२

    61,000 गाढवे

  20. गणना ३१:३५सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि 32,000 स्त्रिया ज्यांनी कधीही पुरुषांबरोबर संग केला नव्हता.

  21. गणना ३१:३६सुमारे इ.स.पू. १४५२

    युद्धात लढलेल्यांना मिळालेला अर्धा भाग हा होता: 3,37,500 मेंढरे,

  22. गणना ३१:३७सुमारे इ.स.पू. १४५२

    ज्यापैकी याहवेहची खंडणी 675 मेंढरे होती;

  23. गणना ३१:३८सुमारे इ.स.पू. १४५२

    36,000 गुरे, ज्यापैकी 72 याहवेहची खंडणी होती;

  24. गणना ३१:३९सुमारे इ.स.पू. १४५२

    30,500 गाढवे, ज्यापैकी याहवेहची खंडणी 61 होती;

  25. गणना ३१:४०सुमारे इ.स.पू. १४५२

    16,000 लोक, ज्यापैकी याहवेहची खंडणी 32 होती.